खोबरे+खसखस पोळी (संक्रात स्पेशल)
साहित्यः सारणासाठी: ओल्या नारळाचा चव दोन वाट्या, खसखस अर्धी वाटी, गूळ दीड वाटी, अर्धा चमचा वेलची पावडर.
पारीसाठी: कणिक तीन वाट्या, रवा एक वाटी, तेल पाव वाटी,मीठ.
क्रुती: खसखस भाजून पावडर करून घ्यावी. खोबरे व गूळ एकत्र करुन मोदकाप्रमाणे सारण करावे. सारण तयार झाल्यावर त्यात खसखस पावडर आणि वेलची पावडर मिसळावी.
सारण तयार करण्यापूर्वी कणिक, रवा एकत्र करून त्यात तेल आणि चवीला मीठ घालून घट्टसर कणिक मळावी. सारण तयार होईपर्यंत कणिक भिजत राहू द्यावी. सारण गार झाले की मिक्सरला बारीक करून घ्यावे. कणिक फूड्प्रोसेसरला मऊ करून घ्यावी. सारणाच्या गोळीच्या दीड्पट (अंदाजे) पिठाची गोळी घ्यावी.
मिसळपाव

“नवीन झोपडपट्ट्यांची आणि पर्यायाने व्होटबॅंकेची तजवीज आता सरकारने केली आहे. तेव्हा ह्या नवीन वर्षात झोपडपट्ट्यांचे स्वागत करायला तयार राहा.”, चिंतोपंत तणतणत चावडीवर प्रवेश करत.
“नाहीतर काय?