Skip to main content

तुम्ही कोण होणार ?

लेखक सस्नेह यांनी मंगळवार, 01/01/2013 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असताना ‘बाळाचे पाय पाळण्यात दिसतात ‘ असे कुठेतरी वाचले होते. हे वाचून मी (माझ्या)लहानपणी कोणत्याही बारशाला गेले किंवा नवीन बाळ झाले आहे, अशा घरी गेले, की पाळण्यातल्या बाळाचे पाय पाहण्याचा प्रयत्न करीत असे. पण ते बेटे दुपट्यात लपेटून इतक्या बंदोबस्तात ठेवलेले असत की त्यांचे नखही पाहायला मिळत नसे. एकवेळ शनिवारी संध्याकाळी देवळातल्या मारुतीच्या पायाचे दर्शन होणे सोपे, पण पाळण्यातल्या बाळाचे पाय ? नाव नको ! पुढे पुढे, ती एक म्हण आहे अन त्याचा अर्थ, बाळ मोठेपणी कोण होणार ते समजते, हे समजले. तसेही अलीकडे पाळणे बघायला मिळणे कठीणच.

किल्ले राजगड

लेखक साबु यांनी सोमवार, 31/12/2012 23:38 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या २२-२३ तारखेला राजगड्ला जाण्याचा योग आला होता...राज्गडाचे आणि गडावरुन काढलेल्या प्तचि डकवत आही.. सर्व मिपाकराना नवीन वर्शाच्या हार्दिक शुभेछा!!! १.गडाच्या वाटेवर...मुले शाळेत जाताना..पाठिमागे राजगड. . २.बालेकिल्ला... . ३.सन्जीवनी माची..

विखुरलेला चंद्र - अंतिम

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी सोमवार, 31/12/2012 19:51 या दिवशी प्रकाशित केले.
तिला माहीत होते तिला जावेच लागेल ति थांबली नाही अन् मीही अडवू शकलो नाही तू गेल्यानंतर इथे फार काही बदलले नाही मीही तसाचं, तो शिकाराही तसाचं, अन् हा किनाराही तसाचं ---- अजूनही शिकारा पाण्यावर तसाचं डुलतोय शिकार्‍याची वल्हे तशीचं पाण्यावर लपलपतायत तश्याचं छोटुल्या लाटा पसरवतायत पाण्यावर झुलणार्‍या तार्‍यांचे ते शेपूट ते अजूनही तसेच मोहक आहे ----- पण तो चंद्र, तो बिचारा नभाच्या त्या मागच्या कोपर्‍यातून ठिकर्‍या ठिकर्‍या होऊन पाण्यावर वाहत वाहत किनार्‍याला लागतोय ------ जातांना तेवढे चांद्रकण घेऊन गेली असतीस... ~~~(समाप्त)~~~ |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (३१/१२/२०१२)
काव्यरस

नवा स्टोल

लेखक जयवी यांनी सोमवार, 31/12/2012 16:56 या दिवशी प्रकाशित केले.
आईच्या कपाटात कारभार कारभार करतांना सापडलेला दोरा आणि त्याची केलेली कलाकारी :) नेटावर नेटाने क्रोशाचे नवीन प्रकार सर्च करतांना सापडलेलं डिझाइन खूपच आवडलं आणि नवीन वर्षाच्या पार्टीसाठी स्टोल उत्साहाने विणला :) . .

काही चीजाळलेले प्रयोग

लेखक अनुप कुलकर्णी यांनी सोमवार, 31/12/2012 13:15 या दिवशी प्रकाशित केले.
त्याचं झालं असं की डॉमिनोजनी चीज बर्स्ट पिझ्झा चालू केला आणि आम्ही त्याच्या प्रेमातच पडलो.. एकावर एक वेगवेगळे पिझ्झे पोटात रिचवता रिचवता आमच्या ध्यानात आलं की हे प्रेम पिझ्झा या प्रकाराबद्दल निर्माण झालेलं नसून, तुकडा मोडताच त्याच्या पोटातून वाहत येणाऱ्या वाफाळत्या क्रिमी चीज बद्दल आहे. या साक्षात्कारातून आणि देशाभिमानातून एक कल्पना सुचली, की हे वाफाळते चीज भारतीय पदार्थांच्या पोटातून बाहेर पडले तर... आणि यातून साकार झाले... काही चीजाळलेले प्रयोग! प्रत्यक्ष लिखाण सुरु करायच्या आधी ही गोष्ट नमूद करावीशी वाटते की हे सारे नेहमीचेच पदार्थ आहेत; बदल आहे तो फक्त चीजचा! त्यामुळे साहित्य,कृती इ.

नवीन नाटक - "गांधी आडवा येतो"

लेखक श्रीगुरुजी यांनी सोमवार, 31/12/2012 13:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्राध्यापक बुद्धीभास्कर एक विद्वान आणि प्रथितयश प्राध्यापक. संध्या (पत्नी), माया (डॉक्टर असलेली मुलगी) व (श्याम) मुलगा असे त्यांचे चौकोनी कुटंब. त्यांचा मुलगा कोणत्याच नोकरीत टिकत नसल्याने प्राध्यापक अस्वस्थ आहेत. महाविद्यालयातल्या आपल्या एका विद्यार्थिनिशी अतिप्रसंग केल्याचा आरोप त्यांच्यावर येऊन त्यांना सध्या निलंबित केले आहे व त्या प्रकरणाची एक समिती चौकशी करत आहे. यामुळे घरात तंग वातावरण आहे. अचानक मुलगी त्यांच्यावर बॉम्बगोळा टाकते.

केमिकल कॅस्ट्रेशन..

लेखक गवि यांनी सोमवार, 31/12/2012 13:02 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीमधे झालेला धावत्या बसमधला बलात्कार आणि त्यामधे त्या निरपराध मुलीच्या शरीराशी केल्या गेलेल्या विकृत मारहाणीने घेतलेला तिचा बळी हे सर्व अगदी ताजं आहे आणि त्याविषयी आधीच खूप चर्चा आणि आंदोलनं झाली आहेत, चालूही आहेत. या प्रसंगाची धग, बोच , अपराधीपणा कुठेतरी सर्वांनाच जाणवतो आहे. प्रत्येक व्यक्तीने, जास्त करुन पुरुषाने स्वतःलाच यासाठी अंशतः जबाबदार धरावं की नाही हा मुद्दा खूप वेगळ्या प्रकारचा आहे. सध्या कोणीही त्या दिशेने विचार करण्याच्या मनःस्थितीत नाही.

वक्तृत्व स्पर्धा. ( मदत हवी आहे )

लेखक बन्याबापू यांनी सोमवार, 31/12/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या महाविद्यालयात वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले आहे.वक्तृत्व स्पर्धेचे विषय आहेत :- स्त्री-भृणहत्या,भारतातील परदेशी गुंतवणूक,बालमजुरी-एक समस्या,डॉ.पतंगरावजी कदम-एक आदर्श नेतृत्व.मला जाणकारांकडून जाणून घ्यायला आवडेल कि मी यातील कोणत्या विषयाची निवड करू ? जेणेकरून परीक्षकांवर प्रभाव पडेल.जो विषय निवडला आहे त्याची सुरुवात कशी करावी.वक्तृत्व कसे असावे ? भाषा कशी असावी ? त्यासंबधी काही सुचना आपण कराव्यात हि विनंती.आपण मदत कराल अशी अपेक्षा आहे. ( काही दिवसांनी हा धागा संपादक मंडळींनी उडविला तरी काही हरकत नाही.धन्यवाद )

तुझा कुणी केला घात…

लेखक आर्णव यांनी सोमवार, 31/12/2012 12:19 या दिवशी प्रकाशित केले.
नियतीची पालखी असुरी हातात अंधाराचे सावट, दिन असो रात प्रतिकुलतेचा येथे नाते झंझावात तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात प्रयत्नांची शर्थ जेव्हा व्यर्थ क्षणात विषण्ण विचारांचे तांडव मनात व्यर्थ तुझ्या कार्माविना तुझा अश्रुपात तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात काळोखाच्या काजळीच्या मन विळख्यात छोटासा ही धक्का येथे भासतो आघात दैवाची नाराजी ही की फळे कर्मजात तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात थैमान अविचारांचे सतत काळजात आपुलेच ओठ आणि आपुलेच दात तरी बळ झुंझायाचे तुझ्या मनगटात तुझा कुणी केला घात, तुझा कुणी केला घात

निरोपाचा क्षण

लेखक नाना चेंगट यांनी सोमवार, 31/12/2012 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
जपून जा. पोचल्यावर पत्र पाठव, गाडीतून उगाच उतरु नकोस. वेळच्या वेळी जेवत जा. जीवाला घोर लागेल असा वागू नकोस. अभ्यास नीट करत जा. खुशाली कळवत जा. रात्री लवकर झोपत जा. तुला भान रहात नाही. वाचत तर वाचत बसतोस. सकाळी लवकर उठत जा. अंघोळ नीट करत जा. दोन मिन्टात पाणी अंगावर घेऊन बाहेर पडू नको. आईच्या सुचनांचा भडीमार चालू होता. आणि मी हसत हसत अग हो आई किती काळजी करतेस. मी आता मोठा झालो आहे. आई म्हणायची असू दे माझ्यासाठी लहानच आहेस. पहिल्यांदा इतक्या लांब चालला आहेस. काळजी वाटते. आईच्या डोळ्यात पाणी तरारले होते आणि मी हसत होतो. हसु नको. जे सांगितलं ते नीट लक्षात ठेव.