Skip to main content

AREA 51 to Nageshware

लेखक नावात्_काय्_आहे यांनी बुधवार, 26/12/2012 15:11 या दिवशी प्रकाशित केले.

नागेश्वर ट्रेक

“ trek “ ह्या शब्दाचा मराठी अर्थ काय आहे ? नाही ना पटकन आठवत आहे , मला पण नाही आठवल . जिसका कोई नाही , उसका google होता है यारो . असा म्हणून मी पटकन " google “ वर search मारला , आणि आपण किती इंग्लिशळेलो आहे , याची जाणीव झाली .असो , ट्रेक चा मराठी अर्थ 'अवघड प्रवास' असा काही तरी search result मध्ये आल .तसा तो अर्थ , मला काही पटला नाही .

गाजराचं रसरशीत लोणचं

लेखक जयवी यांनी बुधवार, 26/12/2012 14:40 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या आईची ही रेसिपी. एकदम सोप्पी आणि हमखास सुपर डुपर हिट होणारी आहे. Pickle साहित्य : मस्त लाल गाजरं - ५-६ लसूण पाकळ्या ५-६ मीठ चवीप्रमाणे गूळ - चवीप्रमाणे लिंबाचा रस - चवीप्रमाणे केप्र कैरी लोणचं मसाला - ४ टॅबल स्पून फोडणीसाठी तेल - चांगलं वाटीभर मोहरी हिंग कृती: १. गाजरं अगदी बारीक चिरुन घ्यायची. हे सगळ्यात महत्वाचं !

नरवीर तानाजी मालुसरे "वीरगाथा"

लेखक अनिल तापकीर यांनी बुधवार, 26/12/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
(नरवीर तानाजी मालुसरे ह्यांच्यावर काव्य करायचे ठरविले आणि सुरुवात करून संपविले तेव्हा लक्षात आले कि हे लिखाण तर पोवाड्यासारखे झाले आहे पण पोवाडा नाही मग याला नाव काय द्यावे हे समजेना थोडा विचार करून "नरवीर तानाजी मालुसरे वीरगाथा " असे केले ते योग्य कि अयोग्य आहे ते माझ्या सर्व सदस्य मित्र आणि वाचक मित्रांनी ठरवावे काही ठिकाणी लय साधण्यासाठी एकेरी उल्लेख आला आहे त्याबद्दल क्षमस्व.) उमरठे गावचा एक वीर| राजांचा होता सुभेदार | करूनी पराक्रम थोर | जाहला जगी अमर || राजांचा खास शिलेदार| बालपणीचा त्यांचा मैतर | सोडूनि सारं घरदारं | बनला स्वराज्याचा चाकर || वीर मोठा रुबाबदार | मिश्या होत्या पल्ल
काव्यरस

गाजर व बीटरूटचा पराठा

लेखक रेवती यांनी बुधवार, 26/12/2012 06:14 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: कणीक, तेल, मीठ, साखर, किसलेली गाजरे व सोलून किसलेली बीटरूटस् एक मोठा बाऊल प्रत्येकी, ३ हिरव्या मिरच्या व पेरभर आलं यांची पेस्ट (चवीनुसार प्रमाण कमी जास्त करावे), लिंबूरस व कोथिंबीर. कृती: चमचाभर तेल व किंचित मीठ घालून कणीक थोडी घट्ट भिजवावी. तेलाचा हात लावून बाजूला झाकून ठेवावी. आता एका पातेल्यात एक टेबलस्पून तेल तापवावे. त्यात आलं, मिरचीची पेस्ट परतावी. अर्ध्या मिनिटानंतर भाज्यांचे कीस घालावेत. एक वाफ आल्यावर मीठ, साखर, लिंबूरस घालावे. हलकेच एकत्र करून मिश्रणाला पुन्हा एक वाफ आणावी व कोथिंबीर घालावी. आता हे सारण ताटलीत पसरून गार करावे.

काही चित्रे, काही प्रेक्षक, काही संवाद... (भाग १)

लेखक चित्रगुप्त यांनी बुधवार, 26/12/2012 04:07 या दिवशी प्रकाशित केले.
काही चित्रे, काही प्रेक्षक, काही संवाद... स्थळ: युरोपातील एक मोठे चित्र- संग्रहालय व प्रदर्शन. पात्रे: महाराष्ट्रातून आलेली काही टूरिस्ट मंडळी: १. तळवळकर मास्तर: जुन्या पिढीचे वास्तववादी चित्रकार, आर्टस्कूलचे निवृत्त प्रिन्सिपाल. २. डी. कुमार: नव्या पिढीचा आधुनिक चित्रकार. ३. सात्विक गुरुजी: माध्यमिक शाळेतील संकृत - कम- इतिहास- कम -पीटी- कम- चित्रकला शिक्षक. ४. गणूशेठ: गावातील एक श्रीमंत, शौकीन व्यापारी. ५. कुसुमकलिका : लेखिका- कवियत्री. ६. सदानंद : एक रसिक, समंजस जाणकार. ७,८,९ . श्री व सौ.

ड्रॅगनच्या देशात १० - शांग्रीला (पृथ्वीवरचा स्वर्ग) : यांगत्सेचे पहिले वळण व लीपींग टायगर गॉर्ज

लेखक डॉ सुहास म्हात्रे यांनी मंगळवार, 25/12/2012 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
=================================================================== ड्रॅगनच्या देशात: ०१...

बलात्कार थांबतील कसे..?

लेखक सौरव जोशी यांनी मंगळवार, 25/12/2012 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
दिल्लीत जे घडल ते मन सुन्न करणार होत, त्यानंतरच नाट्य तर अतिशय घ्रुणास्पद! सरकारने तर असंवेदनक्षीलतेचा आणि नपुसकतेचा कळस गाठला पण नुसता की बोर्ड बडवून निषेध करणे कधी पटले नाही आणि करणारही नाही पण हे सगळ खोल आतमध्ये कुठेतरी एक घाव करुन गेल जो घाव सहजासहजी भरुन निघणार नाही. गेल्या काही वर्षात युरोप आणि युके मधील वास्तव्यात सर्वात भावलेली गोष्ट म्हणजे एकंदर समाज आणि राजकारण यांची संवेदनक्षीलता आणि माणुसकी. कोणताच समाज किंवा राष्ट्र हे परिपूर्ण नसते हे जरी कितीही खर असल तरी जे काही आज काल भारतात चालु आहे ते भयानक आहे.