फ़िस्कल क्लिफ़ आणि त्याचे जगावरचे परिणाम...
गेले बरेच दिवस वर्तमानपत्रांमधून आणि न्यूज चॅनल्सवरून फ़िस्कल क्लिफ़, फ़िस्कल क्लिफ़ वाचत आणि ऐकत होतो.. नाव ऐकून मला पामराला काहीच अर्थबोध होत नव्हता. म्हणून आंतरजालाचा थोडा वापर करून माहिती मिळवली.
एका वाक्यात फ़िस्कल क्लिफ़ म्हणजे २०१२ संपताना अमेरिकन अर्थव्यवस्थेवर होणारे वाईट परिणाम. अमेरिकन सरकारच्या बजेट कंट्रोल ऍक्ट २०११ मधील काही परिणाम दृश्य स्वरूपात दिसण्याची ही एक शक्यता आहे. ३१ डिसेंबर, २०१२ च्या मध्य रात्री पासून मागील वर्षापर्य़ंत असणारा "टेंपररी पेरोल टॅक्स" बंद होणार आहे.
हवा-हवासा खेळ
दोघेही खेळात पार गुंग झाले आहेत. वेळ कुठे गेला त्यांना कळंत नाही. ब्रह्मदेवाचा एक क्षण म्हणजे पृथ्वीवरील शेकडो वर्षे असे म्हणतात. प्रेमी युगुलांच्या बाबतीत असेच काही घडत असावे. दोघांना भान येते तेव्हा जाणवते की ते दोघेही टेबलाच्या खाली आहेत व काही अंतरावर चहु बाजूंनी दिसत आहेत ते आपल्या सहकाऱ्यांचे पाय आहेत. ते बहुदा जेवण करून परतले आहेत आणि हे संस्मरणीय दृश्य नजरेत साठवण्यासाठी टेबलाच्या सर्व बाजूंनी घेराव करून उभे आहेत. दोघेही लाजेने चूर होवून विरुध्द दिशांनी पळतात. आपला बाल्या तर कोटाने तोंड झाकून पळंतो.
भूक
वाढदिवसाला मित्र-मैत्रिणींबरोबर ऐश करुन, पोटाला तडस लागेल इतकं खाऊन, ४-४ सिनेमे पाहून कंटाळा आला आहे. फेसबुकावर वांझोट्या चर्चा करुनदेखील आणि कविता, चित्रे लाईक करुन करुन देखील कंटाळा आल आहे.
बक्कळ फक्त स्वतःपुरता जगून झाले आहे. मागे वळून पहाता फक्त स्वार्थ दिसतो कुरुप हाव दिसते. न संपणारी खरेदी दिसते आणि वखवख दिसते आयुष्यात. उपरती झाली आहे म्हणा ना : (
मुद्द्यावर येते - जर भारतातील एखाद्या संस्थेला मदत करायची असेल तर कशी आणि कोणत्या संस्थेला करावी? भूक हा मुद्दा अथवा अनाथाश्रमास मदत करायची झाल्यास कोणास व कसा संपर्क साधावा?
भारतात असताना रोज पोळी-भाजी घेऊनच बाहेर पडत असे.
झाली माझी गोष्ट
झाली माझी गोष्ट
एक होतं गाव
तिथं होतं पोस्ट
झाली माझी गोष्ट.
काव्यरस
तुम्ही जात मानता का?: विश्लेषण
याआधी: तुम्ही जात मानता का?: सर्वेक्षण
'जात मानणे' या वाक्प्रयोगाला व्यापक अर्थ आहे. मानवी व्यवहार आणि त्याची जात याची सांगड तुम्ही घालता का? आयुष्यातील विविध प्रसंगी तुमच्या आयुष्यात जातीचे स्थान काय आणि किती आहे? वगैरे विविध पैलू या विषयाला आहेत. यावर विविध माध्यमांतून विविध मते मांडली जातात. मात्र तुमच्या-माझ्यासारख्यांच्या प्रत्यक्ष दुनियेत 'जात' हे एक सत्य आहे. या सत्याने आपल्या आयुष्यात किती प्रभाव टाकला आहे हे पाहण्यासाठी हे सर्वेक्षण.
हे सर्वेक्षण परिपूर्ण आहे, सर्वार्थाने व्यापक आहे वगैरे दाबा अजिबात नाही.
"ते" - ३
"ते" -१
"ते" -२
आणि आणि देवा रे .. बाजूला कोणीच नव्हत.. आजूबाजूला रान माजलेलं होतं. तोंडात माती गेलीये .. समोर तीच ती भयाण गढी . शिरीष कुठे गेला? ते बस स्थानक ? ते गाव ? काहीच कळेनासं झालेलं .. मी त्या माणसामागे पळतोय.. आता मला मला पर्यायच नाहीये .. कोणीतरी वाईट पाठलागावर सुटलेलं आहे .. मी एका टेकाडावर चढलोय ... मी काय करतोय मला कळत नाहीये.. तो माणूस आता समोरच बसकण मारून रडतोय .. भयानक पाऊस सुद्धा पडतोय.. त्याला जाऊन विचारू का.. मदतीसाठी त्याला हाक मारावीच लागेल..
सेब कि चटपटि तरकारी...
साहित्यः
१. हिरवी सफरचंद - २
२. कांदा - १ (पातळ उभा कापुन)
३. लसुण पाकळ्या - २ (पातळ कापुन)
४. सुख्या लाल मिरच्या - ३
५. आख्खे धणे - १ चमचा
६. बडिशेप पावडर - १ चमचा
७. आमचुर पावडर - १/२ चमचा
८. तिळाचि पावडर - १ चमचा
९. हळद - १/२ चमचा
१०. हिंग / मीठ / मोहरि - चवीनुसार
११. तेल - १ पळि
१२.पिसे
सुखाच्या घडीला निभावू कसे
निळ्या आसमंती शशीचे हसे
नसे स्वप्न हे नाही आभासही
मिटे पापणी ना असे हे पिसे
स्पर्श अस्पर्श खोल आत कोषातले
आस वेल्ह्या नभाचे तरंग वेगळे
ओलवेली तृषा तृप्त परस अंगणी
कोण गाथा रुधीरास सांगते भले ?
..........................अज्ञात
काव्यरस
आजचा सवाल आणि त्याचे होणारे परिणाम (स्वतःवर आणि त्यामुळे इतरांवर)
मी काही वर्षांपासून आयबीएन लोकमतवर आजचा सवाल नियमितपणे पहात आहे. आधी विरंगुळा म्हणून, नंतर माहितीपर कार्यक्रम म्हणून आणि हल्ली तर व्यसन लागल्यासारखं १० वाजता ते पहायला टीव्ही चालू करतो. माझ्या घरचे त्या सूत्रसंचालकावर जाम वैतागतात - किती आक्रस्ताळेपणाने, तावातावाने आणि हातवारे करुन तो बोलतो ह्यावर. घरच्यांना मराठी मालिका, काही हिन्दी मालिका - बडे अच्छे, कुछ तो लोग वगैरे सोबर वाटतात आणि त्यापुढे आजचा सवाल फार जहाल कार्यक्रम वाटतो.
मलाही आजकाल सूत्रसंचालकाबरोबर त्यातली पाहुणे मंडळी आक्रस्ताळी वाटायला लागली आहेत.
मिसळपाव