Skip to main content

बादशाही ऑम्लेट

लेखक चाफा यांनी शनिवार, 22/12/2012 23:39 या दिवशी प्रकाशित केले.
बादशाही ऑम्लेट : साहित्य अंडी - २ कांदे - १ मध्यम आकाराचा आलंलसूण पेस्ट - १ चमचा मिरच्या - ५-६ बारीक चिरलेल्या सोया सॉस - १ चमचा चिलीसॉस ( ग्रीन ) - १ चमचा तेल - गरजेनुसार जिरं - चिमूटभर मोहरी - चिमुटभर मीठ - चवीपुरते कॄती : प्रथम अंडी एका भांड्यात फोडून घ्यावीत, त्यानंतर त्यात सोया सॉस व चिलीसॉस मिसळून ती व्यवस्थित फेटून घ्यावीत त्यानंतर एका लहान भांड्यात चमचाभर तेल टाकून त्यात बारीक चिरलेल्या मिरच्या, आलं लसूण पेस्ट व्यवस्थीत परतून घ्यावी ( मिश्रण जास्त घट्ट होता कामा नये ) मिरच्या व आलं लसूण पेस्ट व्यवस्थित परतल्यागेल्यावर त्यात जिरं व मोहरी टाकून गॅस बंद करावा जिरं मोहरी फुलून आल्या बर

झिंगा खिचडी

लेखक jaypal यांनी शनिवार, 22/12/2012 19:29 या दिवशी प्रकाशित केले.
साहीत्य १०/१२ मोठे झिंगे(कोळंबी) १/२ चमचा हळद १ लिंबु १ वाटी घट्ट फेटलेल दही. ३ ते ४ चमचे मिठ ३/४ चमचे आल लसुन पेस्ट १०/१५ काजु ३ लाल टोमॅटो ४/५ कांदे पुदिना कोथिंबीर हिरव्या मिरच्या ४/५ १०० मि.ली. तेल ४ चमचे साजुक तुप लाल ति़खट आवडीप्रमाणे सुमारे ३०/४० मिनीटे भिजवलेला ३ वाट्या तांदुळ (बासमती असल्यास उत्तम) खडा मसाला ७/८ काळी मिरी, १ मोठी वेलची, तमालपत्र, ५/६ लवंगा. गरम पाणि अंदाजे ६/७ वाट्या. झिंगे/कोलंबी धागे काढुन स्वच्छ धूउन घ्या.

निवृत्त

लेखक शैलेंद्रसिंह यांनी शनिवार, 22/12/2012 12:49 या दिवशी प्रकाशित केले.
[एकसे बढकर एक महारथी पत्रकार जमलेत, पंतप्रधानांची पत्रकार परिषद कव्हर करायला प्रत्येकाचा उत्साह ओसांडुन वाहतोय. अचानक पत्रकार परिषद भरविण्याचं कारण कोणालाच कळेना, त्यामुळे उत्कंठा शिगेला. तेव्हढ्यात पंतप्रधानांचे आगमन. सगळीकडे शांतता. पंतप्रधान माइकपुढे येतात] पंप्र: मित्रहो... प्रस्तावना करत नाही. मी निवृत्त होणार आहे. [सगळे अवाक, हे काय भलतंच] पंप्र: तुमच्या सगळ्यांच्या मनात काय प्रश्न आहे हे मी जाणतो. मी निवृत्त का व्हायचं ठरवलं हेच कळत नाहीये ना? [पत्रकारांची होकारात्मक शांतता] पंप्र: माझ वय ८४ वर्ष. गेल्या ६० वर्षापासुन राजकारणात सक्रिय आहे.

प्रयोग..

लेखक चाफा यांनी शनिवार, 22/12/2012 01:55 या दिवशी प्रकाशित केले.
फार पुर्वी लिहीलेली एक कथा सापडली, ती जशीच्या तशी इथे टाकत आहे ( सुचत असून बदल करत नाही ) ;) फॉर अ चेंज यावर काकु करूया :) ********* शेवटचा पेशंट आटोपल्यावर मी आपली आवरा आवर सुरू केली. दिवसभराच्या माझ्या कामामुळे मला थकवा जाणवायला लागला होता. रोजचे तेच पेशंट त्याच त्या प्रकारची प्रश्नोत्तरे.., आता कंटाळा यायला लागला होता या सर्वाचाच. आयुष्यात चॅलेंजींग असं काहीतरी घडावं असं प्रत्येकालाच मनाच्या कोप-यात कुठेतरी वाटत असतं, मी ही त्याला अपवाद नव्हतो. पण रोजची ती रटाळ बडबड त्याच ठरवून दिलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळवणे.......... वैताग होता सगळा.

गाजर-मिरचीचे चटकदार लोणचे

लेखक सानिकास्वप्निल यांनी शुक्रवार, 21/12/2012 22:44 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्यः २-३ गाजर सालं काढून, उभे तुकडे केलेले ३-४ हिरव्या मिरच्या चिरुन घ्याव्यात (मिरच्यांचे प्रमाण,गाजर किती घ्याल त्याप्रमाणे वाढवावे किंवा आवडीप्रमाणे कमी-जास्त) २ टेस्पून लिंबाचा रस १ टीस्पून लाल तिखट १/२ टीस्पून हळद १-१/४ टीस्पून मेथीदाणे वाटून पूड केलेली १-१/४ टीस्पून मोहरीची डाळ मीठ चवीप्रमाणे तेल

असे का?

लेखक विनायक प्रभू यांनी शुक्रवार, 21/12/2012 18:20 या दिवशी प्रकाशित केले.
"तुला हा रोजचा अनुभव असेल"? ??? "तरी सुद्धा तपासुन पहा". ???? तुला एक मुलगा मला पण एकुलता. ????? "अगदी स्वतः च्या घरातुन सुरु कर". ????? "मी म्हणतो ते पटते का बघ". काय पटायला पाहीजे? काय तपासु? "मी अगदी जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे काळजी घेतली. कधी मारले नाही. ओरडले नाही. अगदी जास्त हट्ट केल्यावर थोडेसे डोळे वटारणे ह्या वरच थांबलो. एवरीथींग बाय बुक. तरी सुद्धा असे का हे कळत नाही. नेमके काय कळत नाही? "नाही म्हणजे नाते संबंधात मुलाचा ओढा आईकडे जास्त असतो आणि मुलीचा बापाकडे. असे का? तुझा काय अनुभव? दहा च्या पट्टीवर तुझ्या आणि तुझ्या मुलाच्या संबंधाला मार्क किती? आणि आईला किती"? मला ६/१०.

गोष्ट एका माणसाची - १

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 21/12/2012 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
|| ॐ || पावसाची रिपरिप अजुनही थोडी चालु होती . गेला आठवडाभर पाऊस काही ऐकायच नाव घेत नव्हता . सारे ओढे नाले अगदी भरभरुन नर्मदामाईला मिठी मारत होते . नर्मदेच्या प्रचंड प्रवाहाचा खळखळाट इथे ही ऐकु येत होता . इतकया दुरवरही ...अगदी स्पष्ट ...त्यात आजच्या ह्या जराश्या उघडीपी मुळे जणु रातकिड्याना जागे केले होते अन तेही सुरात सुर मिळवायचा प्रयत्न करत होते त्याला शेजारच्या पिंपळपानांच्या सळसळीचीही सोबत होती . सार्‍यानाच जणु लय सापडली होती . हवे मध्ये प्रचंड गारवा भरुन राहिला होता. नुसताच गारवा नव्हे तर तिथेही निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केली होती . मातीचा, झाडांचा, पानांचा, गवतांचा,....