Skip to main content

भिगवणचे परदेशी पाहूणे................

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 25/12/2012 13:01 या दिवशी प्रकाशित केले.
काल चुकून काही फोटो जनातले मनातले मधे टाकले. काही लोकांनी अपेक्षेने तो धागा उघडल्यावर त्यांचा अपेक्षाभंग झाला असेल. त्यांची क्षमा मागतो. माझ्यासारख्या तुलनेने नवीन मिपाकराला ते उदार अंतःकरणाने क्षमा करतील अशी आशा आहे. संपादकांना तो धागा येथे हलावायची विनंती केली आहे. श्रेष्ठ, जेष्ठ व मुरलेल्या मिपाकारांची परवानगी न घेता हा धागा भटकंती येथे टाकायचे धाडस करत आहे कारण कलादालन बरेच दिवस बंद आहे. त्याबद्दल मालक क्षमा करतील अशी आशा आहे. अर्थात त्यांनीही दटावल्यास असे धाडस पुन्हा होणार नाही याची सर्वांनी खात्री बाळगावी..... मी फेसबूकवरही फोटो टाकतो व येथेही टाकतो ( माझ्या दृष्टीने चांगले) .

एक रानगोष्ट

लेखक अरुण मनोहर यांनी मंगळवार, 25/12/2012 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक रान ल्याले होते पानांपानांतून मोती गलबला पक्षी तेथे न जाणे कशास करीती एक रान ओले होता चिमण्यांची शाळा भरली पर्णांच्या छत्र्यांमध्ये चिवचीव उजळणी केली एक रान चिंब भीजता धारांच्या बघ पागोळ्या थेंबांनी रांग करूनी रेखिल्या शुभ्र रांगोळ्या एक रान हसते जेव्हा किरणांच्या स्पुल्लिंगांनी सुर्याची पिल्ले पिवळी बुंध्याशी जमती ढिगांनी एक रान रात्री लाजले वारा गात्रांशी दंगा चंद्राची मादक किरणे तशांत लगटली अंगा एक रान करी आक्रोश लपटूनी केशरी ज्वाळा सोडूनी सोयरे गेले पसरला गालिचा काळा एक रान देई आहूती पुरविण्या मानवी लोभा प्रेतासव हिरवे आसू चघळती यंत्रमय दाढा

काळी पिवळी..

लेखक सर्वसाक्षी यांनी सोमवार, 24/12/2012 18:14 या दिवशी प्रकाशित केले.
(पूर्वप्रकाशितः मनोगत दिवाळी अंक २०१२) ’सरदारजी, उजवी कडे वळा आणि बरोब्बर दोन बिल्डिंगच्या मधोमध थांबवा!’ मग टॅक्सी चाळीच्या कायमस्वरुपी सताड उघड्या असलेल्या फाटकातुन आंत शिरायची आणि मी वडीलांच्या हातातुन रुपयाची नोट सरदारजींच्या पुढे करायचो. दचकु नका, ही ६० च्या दशकातली गोष्ट आहे. त्या काळी स्कूटर पेट्रोल पंपावर गेली तर टाकी भरुन झाल्यावर पांचाची नोट देता सुटे पैसे परत येत असत. अर्थातच टॅक्सीचे किमान भाडे तेव्हा एक रुपया होते, कदाचित ८० पैसेसुद्धा असेल. ठाण्यात टॅक्सी हा प्रकार केवळ भिवंडीच्या समाईक फेरीपुरता, शहरात फिरण्यासाठी नाही.

टेडींचे संमेलन......

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 24/12/2012 17:42 या दिवशी प्रकाशित केले.
परवा रस्त्यावर हे रंगीबेरंगी दृष्य बघितले आणि कॅमेरा बाहेर काढायचा मोह आवरला नाही.

माडगं- मराठवाड्यातील पाककृती

लेखक वामन देशमुख यांनी सोमवार, 24/12/2012 17:34 या दिवशी प्रकाशित केले.
माडग्याचे साहित्य: तांदूळ- एक मोठी वाटी तूरडाळ- एक वाटी हळद- पाव चमचा मीठ- चवीनुसार माडग्याचे साहित्य फोडणीचे साहित्य: शेंगदाण्याचे तेल/ साजूक तूप मोहऱ्या जिरे पाककृती: तांदूळ धुवू

गोंय (गोवा) - पाटणें बीच - २

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 24/12/2012 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा म्हणजे झिंग, गोवा म्हणजे कैफ! ....... दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर जाग आली ती रिसोर्टमधील झाडांवर गुंजारव करणार्‍या पक्षांच्या किलबिलाटाने. त्या दिवशी धाकट्याचा वाढदिवस होता. मग तो झोपलेला असतानाच त्याच्यासाठी केक आणायला मोठ्या मुलाला घेऊन बाहेर पडलो. रिसेप्शनवर केक कुठे मिळेल त्याची चौकशी केली आणि २-३ किमीवर असलेल्या एका गावात मॉंजिनीज आहे असे कळले. आनंदाने तिकडे निघालो. त्या गावात पोहोचल्यावर त्या गावाचे नाव कळले आणि आनंद द्विगुणित झाला. त्या गावाचे नाव होते चावडी.

देह आत्म्याचे मंदीर

लेखक अरुण मनोहर यांनी सोमवार, 24/12/2012 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
उभे भक्कम पायावर एक राजस आहे घर तेथे भगवंताचा वास, देह आत्म्याचे मंदीर देणे लाभले इश्वरी चमत्कार खरोखरी त्याचे लोभस रुपडे काया रेशमी गोजीरी चार खांबांचा निवारा दोन नेत्रांचा पहारा आत्माराम तेजोमय राही धरूनी पिंजरा नको भरू ते धूराने नको माखू काजळीने प्राणज्योतीचे देऊळ ठेवी त्याला निगुतीने देह आत्म्याचे मंदीर दिव्यतेजाचे ते घर उरे मूठभर माती जाता प्राणपक्षी दूर लक्ष चौ-यांशी फ़े-यांत आला मानवी देहात नको घालू रे करंट्या देणे इश्वरी, कच-यात
काव्यरस

मराठी रंगभूमीवर शोककळा

लेखक लीलाधर यांनी सोमवार, 24/12/2012 09:36 या दिवशी प्रकाशित केले.
सरत्या वर्षात अजून काय काय पहावे लागणार आहे हे एक गुढच आहे. सकाळी सकाळी एक दु:खद बातमी कानावर आली. मराठी रंगभूमीवरील प्रख्यात अभिनेता आनंद अभ्यंकर, अक्षय पेंडसे व पेंडसे यांचा दीड वर्षीय चिरंजीव यांचे अपघाती निधन.... मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवर उर्से टोल नाकयाजवळ रात्री १२.०० च्या सुमारास समोरून येणार्र्या टेंम्पोचा ताबा जाउन डीव्हायडर पार करून तो टेंम्पो त्यांच्या गाडीवर येउन धडकला आणि पुढे काय झाले असेल याचा विचार करणेच खरेच कठीण होउन बसलेय...

ख्रिसमस फ्रुट केक

लेखक Mrunalini यांनी सोमवार, 24/12/2012 03:24 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्यः मैदा - १ कप Brown sugar - पाऊण कप बटर - १ कप (room temprature) बेकिंग पावडर - १ टि स्पुन अंडी - २ मिक्स्ड ड्राय फ्रुट्स (बदाम, मणुका, आक्रोड, ड्राय प्लम, जर्दाळु, काजु, ऑरेंज पील कँडी, ड्राय चेरी) चोको चिप्स - २-३ चमचे रम इसेन्स - १ टि स्पुन व्हॅनिला इसेन्स - १ टि स्पुन Baking sheet केक मोल्ड कृती: १. मैदा व बेकिंग पावडर एकत्र २ वेळा पिठाच्या चाळणीने चाळुन घ्यावे. २. सर्व ड्राय फ्रुट्स व चोको चिप्स एका भांड्यात घेउन त्यात १-२ चमचे मैदा टाकुन मिक्स करावे. ह्यामुळे केक मधे ड्राय फ्रुट्स खाली न बसता सगळीकडे पसरतात. ३.