Skip to main content

एकटेपणा.....

लेखक रणजीत देशमुख यांनी बुधवार, 02/01/2013 11:35 या दिवशी प्रकाशित केले.
"एकटेपणा"...हा किती ओळ्खीचा वाटतो... रोज रात्री मला अन्धारात येऊन भेटतो.. मग आथवते ती शान्तता..जी सतत माझ्या सोबत असते... अनधारात चालू असते किड्यान्ची किरकिर.. तेवध्यात ऐकू येतो कोणीतरी बोलल्याचा आवाज... आजू बाजूला बघितल्यास तिथे कोणीही नसत.. सोबत असतो तोच तो "एकटेपणा".........(१) रात्री-बेरात्री पडलेल असते ते चान्दण... किती सुरेख दिसते त्यात,बागेतल्या फुलान्ची मान्डणी.. मध्येच येते ती वारयाची झुळुक..जी कानात काही सान्गू इछिते.. पण काहीच बोलत नाही माझ्याशी रुसल्यागत.. न बोलता निघून जाण्याने मी दुखावतो... परत ती माझ्याशी बोलण्याची वाट पाहतो..

तुम्ही खोटंच बोलता : एक निष्कर्ष. :)

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 02/01/2013 07:46 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, तुम्ही खोटं बोलता का ? या प्रश्नांच्या उत्तराचा शोध घेतांना मजा आली. समाजात वावरतांना आपण खोटं बोलत असतो, हे माहिती असूनही 'सत्यं वद' ची हाकाटी पीटतांना पाहून लोकांची गंमत वाटते. संशोधनात एखाद्या गोष्टीच्या निष्कर्षापर्यंत पोहचण्यापर्यंत काही गृहितकं असली पाहिजेत म्हणजे निष्कर्षाकडे पोहचता येते, किंवा निष्कर्षकाडे जाण्याची एक पायवाट तयार होते असे म्हटल्या जाते. काही एक गृहितं संशोधकाने गृहितं धरलीच पाहिजेत.

पौष्टिक धिरडी

लेखक सानिकास्वप्निल यांनी बुधवार, 02/01/2013 05:52 या दिवशी प्रकाशित केले.
. साहित्या: १ वाटी ज्वारीचे पीठ १ वाटी नाचणीचे पीठ १ वाटी बाजरीचे पीठ १/२ वाटी गव्हाचे पीठ १/४ वाटी तांदळाची पिठी १ वाटी बारीक चिरलेली मेथी १/२ वाटी बारीक चिरलेली कांद्याची पात २-३ लसूण पाकळ्या ठेचून घेणे १-२ हिरव्या मिरच्या चिरुन घेणे १/२ टीस्पून जीरे १-१/४ टीस्पून लाल तिखट (आवडीप्रमाणे कमी-जास्तं) १-१/२ टीस्पून धणेपूड मीठ चवीनुसार तेल

मालोर्का

लेखक केदार-मिसळपाव यांनी बुधवार, 02/01/2013 05:18 या दिवशी प्रकाशित केले.
नोव्हेंबर-डिसेम्बर महिन्याचे दिवस होते. जर्मनीत थंडीने काकडून गेलो होतो. तापमान 0 डिग्री च्या आसपास आसवे. अगदी वैतागाल्यासारखे झालेले. त्यामुळे जवळपास जास्त खर्चिक नसलेला पण थोडे उबदार हवामान असलेल्या आणि कमीत कमी वेळेचा प्रवास असणाऱ्या ठिकाणी जाण्याचा विचार मनात घोळत होता. आणि अचानक एक छान वीक एंड ऑफ सिझन ऑफर सापडली. स्पेन देशातील भूमध्य समुद्रात असणाऱ्या मालोर्का बेटावर ३ दिवस दोन वेळचे खाणे आणि विमान प्रवासासह एकूण किंमत प्रवासी १९० युरो. मग काय पटकन बुकिंग केले आणि सपत्निक निघालो. माझ्या गावापासून न्युर्नबर्ग विमानतळावर येवून पोहोचलो.

.............नियती.........

लेखक प्रेमवेडा यांनी मंगळवार, 01/01/2013 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
फार दिवसांपासुन मनात एक प्रश्न सलत राहीला कधी याचे उत्तर मिळेल का? हेच विचारत राहीला उत्तर शोधण्यासाठी माझे मन सदैव झगडत राहीले अनेक उत्तरे मिळवुन सुद्धा ते उत्तर शोधतच राहीले यश आले अखेर 'नेमके' उत्तर मिळवायला पण् हेच नेमके मान्य नव्हते नियतीला अनेक समिकरणे जुळवुन कसेबसे उत्तर मिळवले पण् 'नियती'च ती! तिने सारे प्रश्नच बदलून टाकले.........!!!!!!!!!

संवाद…

लेखक मेघनाद यांनी मंगळवार, 01/01/2013 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
संवाद हा मानवी जीवनात किती महत्वाचा आहे ना! संवाद साधल्याशिवाय तुमच्या मनात काय आहे हे समोरच्या व्यक्तीला समजू शकत नाही, त्यामुळे त्याच्या कडून तुम्हाला हवी ती क्रिया घडत नाही. पण हाच संवाद हल्लीच्या काळात किती कमी होतो आहे, आता असं म्हणायचं मुख्य कारण आहे ते टेलीव्हीजन. सध्या प्रत्येक घरात साधारणपणे हे उपकरण असतेच असते. मग काय ह्याच्या मागून येणारे फायदे आणीं तोटे देखील घरात शिरतात.

अंतू बर्व्याचं अर्थशास्त्र - १

लेखक आदूबाळ यांनी मंगळवार, 01/01/2013 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
अनेक वर्षं मिपावर "मुखस्तंभ रहाणे" ही महत्त्वाची जबाबदारी पार पाडल्यानंतर लेखनाचा पहिलावहिला प्रयत्न. दिग्गजांनी पहिलटकरणीला सांभाळून घ्यावे, ही विनंती! -----------------------------------------------------------------------------
उन्हाळ्यात कुठली तरी मुंबईची दुय्यम नाटक कंपनी झापाच्या थेटरात 'एकच प्याला' घेऊन आली होती. संच जेमतेमच होता. पहिला अंक संपला. बाहेर सोड्याच्या बाटल्यांचे चीत्कार सुरू झाले. किटसनच्या प्रकाशात अंतूशेटची मूर्ती दिसली. अंतूशेट फरक्यापवाल्या मॅनेजरशी चर्चा करत होते. "कशी काय गर्दी ?" "ठीक आहे !" "प्लान तर मोकळाच दिसतोय.

अवसान, हिंमत, धाडस एक गोष्ट

लेखक मन यांनी मंगळवार, 01/01/2013 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार मागे, कोणे एके काळी घडलेली; पंचतंत्रात असते तशीच, त्याच काळातली ही एक गोष्ट. जंगलातले ससे चपळ झाले की सिंह सुस्तावले सांगता येणार नाही. पण येनकेन प्रकारे सिंहांना सशांची शिकार करता येणे अवघड होउ लागले; दुरापास्त होउ लागले. नव्या सावजांना कसे शोधता येइल ह्याबद्दल विचार करत हळूहळू खंगत जाणारे ते सिंह चिंतित बसले होते.ते फारच अश्क्त दिसू लागले होते. इतक्यात आलेल्या मानभावी सेवकाने, कोल्ह्याने त्यांचे लक्ष विचलित केले.

पेठा

लेखक गणपा यांनी मंगळवार, 01/01/2013 14:38 या दिवशी प्रकाशित केले.
समस्त जालिय-स्नेह्यांना आणि आप्तेष्टांना नवं वर्षाच्या गोड गोड शुभेच्छा !!! साहित्य :  १/२ ते ३/४ किलो कोहळं (अ‍ॅशगार्ड) १/२ किलो साखर. १-२ चमचे खायचा चुना. तुरटी. गुलाब/केवडा वॉटर.

स्वप्नातल्या देशा

लेखक मृत्युन्जय यांनी मंगळवार, 01/01/2013 14:19 या दिवशी प्रकाशित केले.
"सपने मे देखा एक सपना, वो जो है ना अमिताभ अपना..............." ऐकत होतो आणि खरोखरच अमिताभ आला. सुरुवातीच्या चहापाण्याच्या चार गप्पा झाल्यावर (म्हणजे फक्त गप्पाच झाल्या. पुणेकर आहे म्हटले मी. साले लोक न बोलावता घरी येणार वर यांच्यासाठी चहा करा हे कोणी सांगितले आहे?" ) अमिताभन्ने चाचरत मुद्द्याला हात घातला. पिक्चर काढतो आहे म्हणाला. मला हिरो होण्यासाठी गळ घालत होता. आधी ष्टोरी विचारायच्या बेतात होतो पण मग साशंक मनाने आधी उरलेली स्टारकास्टच विचारली. तर म्हणाला तुम्ही हिरो, अभिषेक साइड हिरो, ऐश्वर्या हिरोइन, जया तुमच्या आईचा रोल करेल आणी मी खलनायक. नाही म्हणले तरी मला ठसका लागला.