आधारकार्डाचा आधार सर्वांपर्यंत पोहोचलाय?
सरकारने आधार कार्ड सर्वच महत्त्वाच्या गोष्टींसाठी अनिवार्य केले आहे. शाळेच्या प्रवेशापासून ते गॅस कनेक्शन पर्यंत प्रत्येक ठिकाणी आधारकार्ड अत्यावश्यक आहे. परंतु ते देशाच्या सर्व भागात उपलब्ध झाले आहे का? शहरी भागात उपलब्ध असेलही परंतु अनेक खेडेगावात अजूनही आधार कार्ड उपलब्ध नाही. जिल्ह्याच्या ठिकाणी जेथे आधार कार्ड दिले जाते तिथेही योग्य सुविधा नाहीत. संपूर्ण दिवस घालवून नंबर लागतो. बरं, एवढा वेळ घालवून सर्व खटाटोप केला तर ते आपल्या पर्यंत वेळेत पोहोचते का?
माझे आधारकार्ड मिळायला दीड वर्ष लागले. अर्थात ते मिळाले हे ही नसे थोडके!! गॅस एजन्सीत मी ते वेळेवर देऊ शकले नाही.
मिसळपाव