Skip to main content

'Lamhe' - A Journey With The Hundred Strings

लेखक अक्षया यांनी गुरुवार, 27/09/2012 14:43 या दिवशी प्रकाशित केले.
आमचा एक इव्हेंट मॅनेजमेंट ग्रुप आहे. जो मोठ्या कलाकारांचे कार्यक्रम आयोजीत करतो. अशाच एका महान कलाकाराचा कार्यक्रमाची साक्षीदार होण्याचे भाग्य नुकतेच मला लाभले. ‘Lamhe A Journey With The Hundred Strings’ असे या कार्यक्रमाचे नाव ठरले. पंडित शिवकुमार शर्मां यांचा हा कार्यक्रम धारवाड मध्ये करायचे ठरले आणि आम्ही तयारीला लागलो.ह्या कार्यक्रमाचे स्वरूप शिवकुमारजींचे फक्त संतूरवादन असे नसून त्यांचा सांगीतिक जीवन प्रवास अर्थात स्वतः त्यांचा कडून ऐकण्याची सुवर्णसंधीही होती..

शुभंकरोति

लेखक तिमा यांनी गुरुवार, 27/09/2012 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
शुभंकरोति काही राजकीय नेत्यांच्या नातवंडांसाठी, पतवंडांसाठी, नवीन 'शुभंकरोति' लिहिण्याची नितांत गरज होती. मागणी तसा पुरवठा! स्कॅमं करोति कल्याणम भूखंड्म जलसंपदा सुष्टबुद्धी विनाशाय ब्रिगेडशक्ती नमोस्तुते || आजोबा, पणजोबा नमस्कार तुम्हीच आमचे तारणहार सर्वांना वाकून नमस्कार दिवा लावला दिल्लीपाशी आमची सत्ता घराण्यापाशी ||
काव्यरस

तीर्थजननी नर्मदा परिभ्रमण परिक्रमा समारोप

लेखक खुशि यांनी बुधवार, 26/09/2012 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
लवकर्च उठलो स्नानपुजा आटपुन ओम्कारेश्वर दर्शनाला गेलो. अजिबात गर्दी नव्हती, शान्तपणे भगवन्तासमोर उभे राहुन मानसपुजा स्तोत्र म्हणून मानसपुजा केली.भगवान शिवजी माझ्या मोरयाचे पिताजी,नर्मदामैय्याचेही पिताजी त्यान्च्याच कॄपेने परिक्रमा पुर्ण झाली.

कानसेन कोण? २०१२ क्र.४

लेखक रेवती यांनी बुधवार, 26/09/2012 19:36 या दिवशी प्रकाशित केले.
रसिकांनो, गणपानंतर मी पुन्हा आले आहे आणखी गाणी घेऊन! तर स्पर्धा सुरु करूयात ब्रेक के बाद.
गाणे क्र विजेता
चिंतामणी
अन्या दातार
निखिल देशपांडे
अन्या दातार
अन्या दातार + निखिल देशपांडे

कानसेन कोण? २०१२ क्र. २

लेखक बहुगुणी यांनी बुधवार, 26/09/2012 17:54 या दिवशी प्रकाशित केले.
दहा मिनिटांच्या विश्रामानंतर बहुगुणी आता या पुढील भागाचं आयोजन करतील.
   गाणे क्रमांक विजेता
चिंतामणी+मैत्र
मराठे
चिंतामणी

कानसेन कोण? २०१२ क्र. १

लेखक रेवती यांनी बुधवार, 26/09/2012 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, आपण बरेचदा खूपश्या गाण्यांची ओळख केवळ मुखड्याच्या वाद्यमेळ्यातून, नाहीतर अंतर्‍यातल्या वाद्यरचनेवरून पटवतो. मेंदूतल्या आठवणीतल्या कुठल्या तरी तारा जुळून गीतांचे शब्द आपोआप सामोरे येतात! तर या स्पर्धेत आपण इथे असाच खेळ खेळणार आहोत, 'कानसेन कोण?' मिपाच्या पाचव्या वर्धापन दिनानिमित्त चाललेल्या सोहोळ्यात 'कानसेन कोण?' स्पर्धेचा समावेश केल्याबद्दल "कानसेन टीम" तर्फे नीलकांत, प्रशांत आणि संपादक मंडळाचे आभार!

चिक्कू हलवा.

लेखक प्रभाकर पेठकर यांनी बुधवार, 26/09/2012 16:51 या दिवशी प्रकाशित केले.
Chikku-Halwa साहित्यः पिकलेले चिकू १/२ किलो. खवा १५० ग्रॅम साखर १०० ग्रॅम वेलची पूड १ लहान चमचा. साजूक तुप २ मोठे चमचे (टेबल स्पून) बदामाचे काप सजावटीसाठी तयारी: चिकूची साले सोलून, बिया काढून मिक्सरमधून वाटून त्याचा लगदा करून घ्या. कृती: कढईत तुप तापवून त्यात चिकूचा लगदा टाकून, मध्यम आंचेवर, परतत राहा. जास्त शिजवावे लागत नाही. पाणी जरा आटले आणि चिकूची कच्ची चव गेली की त्यात खवा टाकून परता. खवा नीट एकजीव झाला की वेलचीपूड आणि साखर घालून परता.