संस्कार
परवा घडलेल्या एका प्रसंगानं डोक्यात ठाण मांडून ठेवलंय. त्यानंतर दररोज तो प्रसंग डोळ्यापुढे येऊन काहीतरी चुकल्यासारखं वाटतंय म्हणून तुमच्यासमोर मांडतोय.
बिल्डिंगमधून मी, माझा ८ वर्षाचा मुलगा आणि त्याची आजी असे बाहेर पडत होतो. मुलगा नेहमीप्रमाणे धावत सर्वात पुढे होता. बाहेर आल्या आल्या त्याला वर्तमान पत्रातून येणारी पत्रकं असतात तसला एक कागद (इथल्याच कुठल्यातरी बिजनेसच्या जाहिरातीचा) पडलेला दिसला. त्याने तो उचलला. मी पुढचा मागचा विचार न करता त्याच्या अंगावर ओरडलो "जमिनीवरचा कचरा कशा उचलतोस?" त्याची आज्जीपण त्याला समजावत म्हणाली "अरे असं जमिनीवर पडलेले कागद तू कशाला उचलतोस?
मिसळपाव