Skip to main content

मुरुड (जंजिरा) आणि पालीचा बल्लाळेश्वर

लेखक सोत्रि यांनी सोमवार, 20/08/2012 01:01 या दिवशी प्रकाशित केले.
बर्‍याच दिवसांची सुट्टी मिळवण्यात चक्क यशस्वी झालो आणि एका आठवडाभराची सुट्टी घेऊन पुण्याला आलो. चेन्नैच्या उष्णदमट हवामानाला भयंकर वैतागलो असल्यामुळे पुण्यात आल्यावर ढगाळ आणि थंड वातावरणात एकदम दिल खुष झाला. कुठेतरी जवळच्याच शांत समुद्रकिनारी मुक्कामी जाऊन आराम करायचा बेत होता, जास्त ड्राइव्ह करायची अजिबात इच्छा नव्हती. त्यामुळे पुण्याजवळ असलेल्या मुरुड-जंजिरा येथे जायचा प्लान बनवला. मागे एकदा मित्रांबरोबर मुरुड-जंजिरा, व्हाया अलिबाग, केले होते. त्यावेळी अलिबागला हॉटेल पतंग मध्ये भयंकर टेस्टी मासे खाल्ले होते, खासकरून 'तिसर्‍या मसाला'.

म्हणे, जम्मू-काश्मीर हा स्वतंत्र देश

लेखक चिंतामणी यांनी सोमवार, 20/08/2012 00:09 या दिवशी प्रकाशित केले.
आगीत तेल ओतणारी नवीन घटना घडली आहे. इस्लामी देशांची पुन्हा आगळीक जगासमोर आली. म्हणून त्यातून जग धडा घेणार नसला तरी आपण घ्यायला हवा आहे. सध्या भारतभर चालू असलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर या बातमीची गंभीरपणे दखल घेणे आवश्यक आहे. सरकार पातळीवर किती दखल घेतली जाईल माहीत नाही. पण सामान्य नागरीकांना याची जाणीव म्हणून हा प्रपंच. या बातमीची प्रसार माध्यमांनी फारशी दखल घेतली नाही. काही मोजक्याच वर्तमानपत्रात ती छापून आली आहे.

द टायटन

लेखक तुषार काळभोर यांनी रविवार, 19/08/2012 23:35 या दिवशी प्रकाशित केले.
* १. मला फुटबॉलमधलं काही कळत नाही. * २.

मघई

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 19/08/2012 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
वेलीवरची मघई ची पानं पाहताना लक्षात आलं की ही पानं सपाट नाहीत तर शिरेगणीक वेगळ्या झालेल्या प्रत्येक भागाला गोलवा आहे. तो बहिर्वक्र पृष्टभाग प्रकाशाला मस्त खेलवत होता.

जुने तेच सोने की --

लेखक शकु गोवेकर यांनी रविवार, 19/08/2012 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
जुने तेच सोने की---- प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी वाईट व चांगला काळ येत असतो किंवा जात असतो साधारण पणे सन १९६० ते २००० या काळात मी अनेक चांगल्या गोष्टी वाचल्या,लिहिल्या व पाहिल्या,त्या काळी वाचलेल्या काही मराठी कादंबर्या- ययाती , म्रुतुंजय, छावा,असा मी असा मी,अपुर्वाई,राजा शिव छ्त्रपती, श्री.बाबुराव अर्नाळ्कर रहस्य कथा, रेडिओ-आकाश् वाणी पुणे - पुन्हा प्रपंच्,असा आमचा गाव्,युवावाणी, रेडिओ सिलोन -ओवल टीन के साथी-हमीद सयानी,बिनाका गीत् माला-अमिन सयानी दुरदशन वर पाहिलेल्या काही मालीका-(हिंदी) आलीफ लैला,अकबर द ग्रेट,बुनियाद,चंद्रकाता,रामायण्,व्योमकेश बक्शी,महाभारत्,भारत एक खोज्,मालगुडी डेज्,

सुपर३०. ( एक आगळा वेगळा प्रयोग).

लेखक कलंत्री यांनी रविवार, 19/08/2012 23:10 या दिवशी प्रकाशित केले.
रोज वर्तमान पत्र वाचण्यासाठी घेवो अथवा एखाद्या वृत्तवाहिनीचे दर्शन घेवो, भ्रष्टाचार आणि तोही उच्चपदस्थाचा पाहिला की जीव वैतागतो, मनात विचार येतो की या लोकांना इतके कोट्यावधी रुपयांची संपन्नता असताना परत हजारो कोटीची घोटाळा करताना का मी करीत आहे आणि कधी मी थांबणार असा विचार का बरे मनात येत नाही बरे? अश्या विचारांच्या काहिलीत असतांना सुपर३० नावाच्या संस्थेची माहिती मिळाली आणि उन्हात शितळतेचा अनुभव आला. सुपर३० ही संस्था पटना येथे आनंद कुमार नावाचे गृहस्थ चालवतात.

राष्ट्रपतींचा दयाळूपणा -

लेखक विदेश यांनी रविवार, 19/08/2012 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
. नवीन मा. राष्ट्रपती "दयाळू" आहेत की नाहीत, हे मला माहित नाही. जुन्या मा. राष्ट्रपतीनी दयाळूपणा दाखवण्यात "उच्चांक" केला आहे, हे मला विविध माध्यमांद्वारे माहित झाले. आपल्या न्यायव्यवस्थेवर किती विश्वास ठेवावा, हे मला कळत नाही. खालचे न्यायालय, उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय- ह्या तिन्ही न्यायालयांच्या न्यायमूर्तीनी "पूर्ण विचार करूनच" समोरच्या आरोपीला फाशीची शिक्षा दिलेली असणार ना ? असे असतांना, केवळ "दयेच्या अधिकारा"खाली मा. राष्ट्रपती सदर शिक्षा रद्द करण्याचा उच्चांक प्रस्थापित करून जातात- हे खरोखरच अनाकलनीय कोडे वाटते ! मा.

विशिष्ट अभिजाताच्या मंत्रसमाधीचे प्राक्तन

लेखक शरदिनी यांनी रविवार, 19/08/2012 18:41 या दिवशी प्रकाशित केले.
अनन्यशून्या गरळविशिष्टा मंतरलेली चरणप्रतिष्ठा अल्लडढोली धोतरजोडी चित्तरबद्धा जळमंजिष्ठा चपळ्शरीरी आटापीटा अल्फाबीटाग्यामाथीटा शोधनभंजक वरबालंटा कुठे कोणासी सचित्रघंटा अभिजाताची मंत्रसमाधी थिल्लर घोटा अतिकोलांटी कांक्षितबुद्धी धरणललाटी मेंदूक्रांती मेंदूक्रांती शरदिनी १८ ऑगस्ट २०१२ पुणे