Skip to main content

वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं

लेखक बहुगुणी यांनी शुक्रवार, 17/08/2012 23:21 या दिवशी प्रकाशित केले.
हळू हळू येतेय बिनपावली तुझ्या खांद्यामागे सकाळ सोनसळी पांढूरल्या तावदानात धीट होत, सूर्य येतोय आत उशीवर बरसताहेत तुझे केस तू अजूनही झोपेतच आहेस! वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला! येतील हलत्या पडद्यामागे सूर्याची किरणे फडफडणाऱ्या पापण्यामागे स्वप्नांचे फिरणे झोपेत तुझे स्वप्नांना बिलगणे सुखाचे क्षण आठवून ओठांचे विलगणे वाटतं, जागवावं, कुशीत घ्यावं सांगितलेलं गुपित, पुन्हा सांगावं बघ, मी सकाळ देतोय तुला हा दिवसही घे, माझ्या फुला!

धडा पहिला.

लेखक गणपा यांनी शुक्रवार, 17/08/2012 20:59 या दिवशी प्रकाशित केले.
विषय तसा थोडा नाजुकच. कितीही टाळायचा म्हटला तरी कधी ना कधी त्याला तोंड द्यावे लागणारच याची कल्पना ही होती. पण म्हणुन ती वेळ इतक्यातच येउन ठेपेल असा अंदाज नव्हता. तस पाहिलं तर मागे 'थ्री ईडियट्स' पहातानाच (टायटलमध्ये स्पर्म्सची कार्टुन रेस दाखवली आहे ती पाहुन ) हे काय म्हणुन तिनं विचारलं. परत त्याच चित्रपटात शेवट जवळ येताना जो धुमाकुळ चालु होता तेव्हा ही चेहेर्‍यावर बर्‍याच प्रश्नचिन्हांचं जाळं पसरलेलं होत. त्यावेळी काही तरी थातुर मातुर उत्तर देउन टाळलं होतं. पण नांदी तेव्हाच झाली होती. गेल्या आठवड्यात एका सॅनिटरी नॅपकीन ची जाहिरात पाहुन बराच काळ तुंबलेला प्रश्न बाहेर आलाच.

झटपट वऱ्हाडी ठेचा :

लेखक कुलमयु यांनी शुक्रवार, 17/08/2012 17:58 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य: ८-१० लाल मिरच्या देठ काढून,(काश्मिरी /ब्याडगी मिरची,) ३-४ पाकळ्या लसूण, एक लिंबू , एक दीड चमचा साखर, चवीपुरते मीठ इ. कृती: लाल मिरच्या मिक्सरमधून बारीक कराव्यात. मंद आचेवर कढईमध्ये बारीक केलेल्या मिरच्या लसणाची पेस्ट घालावी. मिरची भिजेल एवढेच पाणी घालून शिजवावे. पाणी आटत असताना त्यात एक चमचा साखर, लिंबू रस आणि मीठ घालून मिश्रण वाफवावे झालेले मिश्रण एका बाऊलमध्ये काढून त्यात २ चमचा तेल घालून मिश्रण एकजीव करावे. किमान अर्धा तास अथवा जास्त वेळ मुरून द्यावे ते अधिकच रुचकर लागते.

(पुन्हा) स्मृतिचित्रांच्या निमित्ताने

लेखक ऋषिकेश यांनी शुक्रवार, 17/08/2012 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या विकांताला सहज म्हणून स्मृतिचित्रे हातात घेतले. आणि कितव्यांदातरी वाचु लागलो. नेहमीप्रमाणे याहीवेळी जरावेळ वाचु म्हणून हातात घेतलेलं हे पुस्तक संपवल्याशिवाय खाली ठेवलं नाही. आणि दरवेळी नव्याने काहितरी शिकवणार्‍या या पुस्तकातून नवे प्रश्न समोर उभे रहातात.

टिनपाट

लेखक नाना चेंगट यांनी शुक्रवार, 17/08/2012 13:10 या दिवशी प्रकाशित केले.
टिनपाट हा शब्द फार लहानपणी कानावर पडला आणि मनात घर करुन बसला. बिनकामाची, क्षुल्लक असलेली वस्तुचा उल्लेख करायला टिनपाट हा शब्द वापरला जातो हे कळालं. बरेच दिवस तो शब्द तोंडात घर करुन होता. मधल्या काळात आय असेल ते असो पण तो शब्द काही कानावर आला नाही. काही शब्द नंतर कधीतरी आठवतात आणि आपल्याच आयुष्यातले काही संदर्भ जागे होतात. दहावीच्या सुट्टीत सहज शाळेजवळून चक्कर मारत चाललो होतो. परिक्षा संपलेल्या होत्या त्यामुळे शाळा रिकामी पडलेली होती. आत डोकावून पाहिले तर कुणी नाही. आत जावे की नाही अशा विचारात असतांनाच ती दिसली.

" आई "

लेखक कुलमयु यांनी शुक्रवार, 17/08/2012 08:19 या दिवशी प्रकाशित केले.
एक नाव जिचे मी अस्तित्व आहे जिची मी ओळख आहे एक नाव जिचे मी स्वप्न आहे जिची मी इच्छा आन्कांक्षा आहे एक नाव जिच्या आयुष्यातील मी एक आनंद आहे एक नाव जिने मला हसायला शिकवले अन रडायला शिकवले एक नाव जी माझ्या दु:खात बुडालेली आहे एक नाव जिच्या ओंजळीत आकाशही ठेंगण आहे एक नाव जी मला प्रत्येक संकटातून मार्ग काढून जपत आहे एक नाव जिने मला ह्या जगात आणल्याचे उपकार आहे हो, तेच एक नाव जिचा मी प्राण आहे फक्त आणि फक्त " आई "
काव्यरस

हल्लीच्या भूतांचे हॉरर पिक्चर .......

लेखक कुलमयु यांनी शुक्रवार, 17/08/2012 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
सौ बरस गुज़रे रात हुए ! सौ बरस गुज़रे दिन हुए !. परवा मी रात्री टी.व्ही बघत होते... हॉरर पिक्चर लागला होता... तेव्हा मला सहजच भूत या विषयावर लिहावास वाटल ... पांढरी साडी , प्रमाणाबाहेर लांबसडक मोकळे केस सोडलेले ( कोणते तेल वापरत होते काय माहित ??? :D ) , फारसा मेकअप नसलेला (दिसायला सुंदर पण मेकअप बिघडलेला :P ) हातात मेणबत्ती घेऊन जाणारी (कुठे जाते ती कुणास ठाऊक ??) , मग तिच्या गाण्याच्या आवाजाच्या दिशेने जाणारा नायक अस काहीस तर काही तंत्रमंत्राचा वापर करून घालवण्याचा प्रयत्न (आता बघा हं!