Skip to main content

मैत्रीच्या नाण्याची दुसरी बाजू --- एक कडवाहट सच

लेखक कुलमयु यांनी गुरुवार, 16/08/2012 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
ऑगस्ट महिन्यातील पहिला रविवार "मैत्री दिन" म्हणून ओळखला जातो.प्रत्येक वेळी आपण मैत्रीचे गोडवे कायम गात असतो पण त्याच "कडवाहट सच" पण पाहू कधीतरी. मैत्रीतच कधी स्वार्थही दडलेला असतो.(सगळ्याच नाही),मला एक जाहिरात आठवली "जो तेरा है वो मेरा है, जो मेरा है वो तेरा है " पण सध्या उलट आहे "जो तेरा है वो मेरा है जो मेरा है वो भी मेरा है " अशी सद्यस्थिती आहे .हल्ली सोशल नेट्वर्किंगच्या माध्यामातून बिझनेसच्या फायद्यासाठी मैत्री करतात. त्यात गुन्हा नाही उलट मैत्री मदतच करेल . पण जो त्यात मदत करू शकत नाही म्हणून त्याची मैत्रीची किंमंत शून्य करावी हे चूक आहे. माझ्या अनुभवात मी कायम स्वार्थच अनुभवला.

मिपा नाबाद ५ !

लेखक तर्री यांनी गुरुवार, 16/08/2012 20:49 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या प्रोफाइल मध्ये कालावधी ४ वर्षे ४७ आठवडे दाखवतो आहे. म्हणजे मिपाला पाच वर्षे होत आली किंवा झाली ! हे म्हणजे एखाद्या जिंदादिल मित्राचे अचानक साठीशान्तीचे निमंत्रण यावे तसे आहे. मस्ती करता करता ५ वर्षे लोटली पण ! मधल्या काळात मिपाची भावंडे निघाली हे समजले पण आपला जीव येथेच रमतो. दोन द्याव्या दोन घ्याव्या आणि मज्जेत राहावे तर मिपा वर! मिपा बाल्यावस्थेतून शैशवात पाउल ठेवते होते आहे. हे शैशव सदा सर्वकाळ राहावे.

छिद्रान्वेषी वैतागसम्राटाची डायरी ( भाग २)

लेखक भडकमकर मास्तर यांनी गुरुवार, 16/08/2012 19:35 या दिवशी प्रकाशित केले.
१ जानेवारी : आत्ता रात्रीचे बारा वाजताहेत. सकाळपासून कालच्या पार्टीचा हॅंगओवर. म्हणजे उलट्या, मळमळ तर आहेच त्यात जुलाबही...रजाच पडली. रात्री डॉक्टरकडे जावं लागलं... नवीन कुठलीतरी स्ट्रॉन्ग औषधं दिली.. वर चारचौघांत " पिणं कमी करा" हा सल्ला. आता औषधं घेतल्यावर जुलाब बंद झालेत तर आता अंगावर रॅश आल्यासारखी वाटतेय... आणि लिहिताना खाज येतेय सर्व त्वचेवरती... म्हणजे ऍलर्जी नक्की कोणत्या गोळीची हेही आता कळणार नाही.. *** चा फोनही लागत नाहीये आता.. आता बसा खाजवत.. असा हा वर्षाचा पहिला दिवस... वै ता ग.... ५ जानेवारी : ही स्वप्नं म्हणजे एक त्रास असतो.

पार्टी

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 16/08/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
पार्टी हा शब्द खरं म्हणजे पूर्वी फक्त हिंदी सिनेमांमध्येच ऐकला आणि पाहिला. एका मोठ्या दालनामध्ये स्त्री-पुरुष हसत-खेळत, गप्पा करत हातातल्या उंची मद्याचा आस्वाद घेत झुलत आहेत; काही उत्साही कार्यकर्ते मंद-मंद संगीताच्या तालावर मोहक नृत्य करत आहेत वगैरे अशी ती अगदी ठोकळेबाज दृष्ये असत. मग मध्येच नायक किंवा नायिका एखादे गाणे सुरु करत असे आणि पार्टी अधिक रंगात येत असे.

बैंगन मसाला करी

लेखक सस्नेह यांनी गुरुवार, 16/08/2012 14:14 या दिवशी प्रकाशित केले.
परवा बाजारात फिरताना उन्हाळ्यात गायब असणारी हिरवीगार ताजी रसरशीत कुडची वांगी दिसली. म्हटलं, चला, होऊन जाऊदे झणझणीत कोल्हापुरी बैंगन मसाला करी ! वांगी घेऊन घरी गेले अन लगेच तयारीला लागले.

किरकिरे लोक

लेखक सांजसंध्या यांनी गुरुवार, 16/08/2012 12:38 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या आजूबाजूला अनेक त-हेचे लोक असतात. यामधे काही लोक असे पाहण्यात आलेत ज्यांना आपल्याविरुद्ध कट शिजतोय असं सारखं वाटत राहतं. दोन व्यक्ती एकमेकांशी बोलताना हासताना पाहील्या कि यांना वाटतं कि आपल्यालाच हसताहेत. सूचक असं ग्रुपमधे कुणी काही बोललं कि यांना वाटतं आपल्यालाच टोमणा मारलाय.. त्यांच्यातही अनेक उप त-हा असतात असं वाटतंय. म्हणजे असं काही वाटू लागलं कि अस्वस्थ होणारे पण बोलून न दाखवणारे, काही मात्र थेटच भांडायला उठणारे तर काही ति-हाइताकडे तक्रारी करणारे. यांच्याशी कसं वागावं हे समजत नाही. इग्नोर केला तरी प्रॉब्लेम, समजावून सांगावं तरी प्रॉब्लेम !

ताम्हिणी घाट

लेखक प्रचेतस यांनी गुरुवार, 16/08/2012 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
काल सकाळी ऑफिसमध्ये ध्वजवंदन करून हिंजवडी-माण-घोटावडे-अंबडवेट-पौड मार्गे मुळशी ताम्हिणीत भटकंती करून आलो. त्यादरम्यान टिपलेले काही फोटो. १. चाचिवली गावाजवळून दिसणारा मुळशी जलाशय २. दावडीचे उपकेंद्र ३. मुळशी जलाशय ४.

हिमरंग

लेखक शरद यांनी गुरुवार, 16/08/2012 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
3

सरदार अजितसिंह यांना आदरांजली

लेखक सर्वसाक्षी यांनी बुधवार, 15/08/2012 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
ajit singh सरदार अजितसिंह यांचा जन्म नवान्शहर तहसिलातील खट्करकलान येथला. जन्मदिवस दिनांक २ फेब्रुवारी १८८१. ज्या कुळात जन्म घेतला ते सिंधु कुल म्हणजे साक्षात क्रांतिचा कल्पवृक्ष. सरदार अजितसिंहांचे वडील सरदार अर्जुनसिंह हे प्रखर राष्ट्रवादी आणि आधुनिक विचारसरणीचे. आपले ईंटर आर्ट्स चे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी शिक्षकाची नोकरी सुरू केली.