अतिरेकी देवो भव !
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/15544120.cms
अतिथी देवो भव अर्थात अतिथीला देव मानणारे व्हा अशा अर्थाचा वेदातला एक श्लोक आहे. आपल्या सरकारने त्यात थोडा बदल करुन अतिरेकी देवो भव केला आहे की काय अशी शंका येणारी ही बातमी.
ही खोटी असू दे अशी इच्छा.
पण ह्या नराधमाला रमझान आहे म्हणून सुकामेवा, भेजा फ्राय, मलई असल्या अन्नाची रेलचेल असणारे खाणे दिले जात आहे अशी ही बातमी आहे. सामान्य लोकांनाही असले खाणे परवडत नसेल. आणि अन्य कैद्यांनाही असले खायला दिले जात नसेल ते ह्या नररत्नांना कुठल्या कारणाने दिले जाते?
मिसळपाव
पुस्तकाचे नावः प्रे (सावज)
मूळ लेखकः मायकल क्रायटन
अनुवादकः प्रमोद जोगळेकर
प्रकाशकः मेहता पब्लिशिंग हाऊस
किंमत : रु. ३००/-
मायकल क्रायटन हे नाव आता मराठी वाचकांना अपरिचित राहिलेले नाहिये.
जुरासिक पार्क, लॉस्ट वर्ल्ड, डिस्क्लोजर, काँगो अशा कित्येक कादंबर्या मायकेल क्रायटनने लिहिल्या आहेत व त्याच्या कादंबर्यांवर बेतलेले हॉलिवूड मधील हे इंग्रजी चित्रपटही अतिशय गाजलेले आहेत. अतिशय थरारक अशी कथानकाची रचना करणारा लेखक म्हणून मायकल क्रायटन सर्वांना परिचित आहेच.
आज नेताजी सुभाशचंद्र बोस यांची ६७वी पुण्यतिथी.
सशस्त्र क्रांतिच्या पर्वाचा कळस ठरलेल्या, आझाद हिंद सेनेच्या पराक्रमाने आपल्या ध्येयाच्या अगदी जवळ येउन ठेपलेल्या - मोइरांग येथे येथे १४ एप्रिल १९४४ रोजी तिरंगा फडकावणार्या नेताजींना स्वतंत्र हिंदुस्थान पाहायचे भाग्य लाभले नाही. मात्र साम्राज्यावर निर्णायक घाव हा नेताजींच्या आझाद हिंद सेनेचाच होता.
नेताजींच्या ६७ व्या स्मृतिदिनी नेताजींना सादर प्रणाम