Skip to main content

' खिडकीमधुन गच्ची तुझी......!'

लेखक जेनी... यांनी शनिवार, 14/07/2012 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
कटलेल्या पतंगाकडे त्याच्यासोबत नाराज होऊन बघणारी , त्याच्या मदतीने उंच आकाशातले तारे मोजणारी, त्याला भिजवणारी ,त्याच्यासोबत भिजणारी ,त्याच्या मनातली असंख्य गुपितं जपणारी, दारुच्या बाटल्या लपवून घेऊन त्याच्या कटात स्वतःला सामील करुन घेणारी ,रात्रीच्या अंधारात त्याच्यासोबत दिवसभरातला उन्हं सावल्यांचा खेळही थांबवणारी ......गच्ची . ठाण्याच्या आनंद टॉकिज मागे असणार्‍या तीन ते पाच मजली इमारतीच्या गर्दीत आमच्याही इमारती वसलेल्या . जागेच्या भयाण, न सुटलेल्या प्रश्नाला जागलेल्या.

कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली,

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 13/07/2012 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
कै. दारासिंह यांना सादर संगीतमय श्रद्धांजली, फार पुर्वी दारासिंहानी आम्हाला आनंद दिला त्यांच्या फ्लाईंग किक्स व फ्री स्टाईल डावपेचांमुळे. आम्ही फिदा होतो 'लुटेरा' (१९६५) पाहून. त्यात लप्याचे संगीत, सिनेमा फार लक्षात राहिला. त्यातील गाण्यामुळे.... १ पतली कमर नाजुक उमर....... स्त्री वेषातील दारासिंहची नृत्यकला !

मदत: कोडे आणि बुध्यांक चिकित्सा

लेखक चिखलू यांनी शुक्रवार, 13/07/2012 22:57 या दिवशी प्रकाशित केले.
एका IQ टेस्ट बद्दल मला मदत हवी आहे. कंपनीत आजच ही टेस्ट दिली आणि काही कोड्यांची उत्तरे पटकन जमली नाही. डोक्यातून किडा जात नाही, उत्तर आणि लॉजिक समजत नाही तोपर्यंत. ही टेस्ट बुध्यांक काढण्यासाठी वापरली जाते आणि Percentile पद्धतीनुसार निष्कर्ष काढले जातात. पूर्ण नाव रॅवेन् प्रोग्रेसिव्ह मॅट्राईसेस टेस्ट. गुगल वर अधिक माहिती मिळेल. इथे मुद्दाम देत नाही. यात २X२ किंवा ३X३ मॅट्रिक्स असतो, ४ किंवा ९ पैकी एक न दिलेली आक्रुती शोधायची. लॉजिकसाठी आडवे, उभे प्रोग्रेशन जुळले पाहिजे. काही ठिकाणी कर्णानुसारही जुळलेत. खाली दिलेल्या चित्रात एकुण ५ कोडी आहेत. मला २,३ व ५ बद्दल लॉजिक समजले आहे.

घरचा आहेर

लेखक डॉ अशोक कुलकर्णी यांनी शुक्रवार, 13/07/2012 20:00 या दिवशी प्रकाशित केले.
घरचा आहेर पैठणला असतांना तिथल्या खुल्या कारागृहाला आठवड्यातून एकदा भेट द्यावी लागे. भेटी दरम्यान आजारी कैद्यांना तपासून उपचार करणे, आधीच्या भेटीतल्या आजारी कैद्यांची विचारपूस करणे, तुरूंगाच्या किचनला भेट देवून पहाणी करणे, तिथल्या वैद्यकिय अधिका-याशी चर्चा असा सर्वसाधारण कार्यक्रम असे. आवश्यकता वाटल्यास कैदी आमच्या हेल्थ युनिट मधे तपासणीला पाठवले जायचे. तिथं त्यांची तपासणी करून उपचार केले जात. क्वचित प्रसंगी त्यांना दाखल करून उपचार केले जात.

निर्माल्य

लेखक मंदार दिलीप जोशी यांनी शुक्रवार, 13/07/2012 13:50 या दिवशी प्रकाशित केले.
आज माझ्या डायरीत केविलवाणं झालेलं एक गुलाबाचं फूल सापडलं.. तुझ्या वाढदिवसाला घेतलेलं आता बरचसं हिरमुसलेलं डायरीच्या त्याच दोन पानांवर दिसले आठवणींच्या शिंतोड्यांसारखे उमटलेले गुलाबी ठिपके खिडकीबाहेर दिवसा मोहवणार्‍या नेहमीच्याच गुलमोहराने रात्री सावल्यांचे भेसूर आकार नाचवावेत तसे... आपल्या आठवणींच्या जणू तशाच सावल्या झाल्या आहेत आणि नातंही त्या गुलाबासारखं.... वाहिलेल्या दुर्वांचं शेवटी निस्तेज निर्माल्यचं होतं ना गं, कालच्या पूजेची अस्पष्ट आठवण करुन देणारं! - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
काव्यरस

उत्तर सांगा...

लेखक योगप्रभू यांनी शुक्रवार, 13/07/2012 13:32 या दिवशी प्रकाशित केले.
माझे नाव स्थिरबुद्धी. मी जंबूकाचार्यांचा शिष्य. अनाथ सापडलेल्या माझे संगोपन व शिक्षण जंबूकाचार्यांनी केले. अध्ययन संपल्यावर गृहस्थाश्रमात जाण्याची अनुज्ञा देताना आचार्य मला म्हणाले, 'स्थिरबुद्धी. तुला स्वतःचे कुणी नाही. मलाही मेधा या एकुलत्या एक मुलीखेरीज कुणी नाही. तू मेधाशी परिणय करुन हे गुरुकुल चालवावेस असे मला वाटते.' त्यावर मी म्हणालो, 'गुरुदेव! आपण मेधाचाही विचार घ्यावात. मला येथे राहून गुरुकुल चालवणे आवडेल, पण मेधाशी विवाह मात्र अडचणीचा वाटतो. आपण माझे संगोपन केलेत त्याअर्थी आपणच माझे पिता. दुसर्‍या अर्थाने गुरु हा पित्यासमान असतो.

एक होती चाळ...

लेखक निश यांनी शुक्रवार, 13/07/2012 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
आठवणीं आठवता आठवता,अशी माझी चाळ होती दोन खोल्यांच घर आमच,तरी सगळ्या चाळीशी आपुलकी होती. चाळ कधी वाटलीच नाही ती, चाळकरी लोकांच ते एक कुटुंबच होत. परक्या लोकानाही आपलस वाटाव अस मायेच छप्पर होत. नेहमीच येता जाता पाठीवर शाबासकीची थाप होती. चुका केल्या तर कानफडात मारणारी आप्त होती. एका घरात चहा झाला तर दुसर्‍या घरात खाण व्हायच. रात्री आई बाबाना घरी यायला उशीर झाला तर शेजारुन घरपोच जेवण यायच. जाती पातीला इथे नेहमीच दुय्यम स्थान होत. माणसातल्या माणुसकीला नेहमीच पहिल मानाच पान होत. घर जरी लहान असतील तरी मन मात्र मोठी होती. गावाहुन आलेल्या लोकांची इथे रहायची हक्काची सोय होती. संकट आल एखाद्या घ

अनोखी मुलाखत भाग-२

लेखक निळकंठ दशरथ गोरे यांनी शुक्रवार, 13/07/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
अनोखी मुलाखत भाग-२ सूत्रधार: वैज्ञानिक कलेचे अरसिक असतात.जगातील सर्वात सुंदर कलाकृती देखील वैज्ञानिकांना मोहित करत नाही? ह्या बद्दल आपले काय मत आहे? फेन्मन: माझा एक मित्र आहे, तो एक उत्तम कलाकारही आहे.त्याला कलेबद्दल खूप आस्था व प्रेम आहे. तो एकदा माझ्याकडे सुंदर फुल घेऊन आला. माझ्या जवळ आला आणि म्हणाला "किती सुंदर फुल आहे ना?" माझ्या चेहऱ्याकडे पाहून तो पुढे बोलताच राहिला,"कवीच्या डोळ्यांनी पाहशील तरच हे फुल सुंदर दिसेल,जर तुझ्या वैज्ञानिक डोळ्यांनी पाहशील तर हे फुल एक उदासीन वस्तूच दिसेल." तो माझ्यावर खूप रुक्ष होता.

अनपेक्षित ..

लेखक विदेश यांनी शुक्रवार, 13/07/2012 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
. काहीतरी चांगल पोस्ट करायला जातो, नेमकी एरर समोर येते आणि आपण काहीतरी करण्याआधीच पोस्ट अपडेट होते .. अनपेक्षित पेचातून सुटका ! पोस्टला कुणी लाईक केले आहे का पहातो, तो पोस्टला चार शेअर दिसतात .. अनपेक्षित आनंदाचा झटका ! रस्त्यातून जाताना पुढच्यास ठेच- म्हणून शहाणा व्हायला जातो, तर आपल्याला ठेचच लागत नाही तर आपण नेमके समोरच्या खड्ड्यात पडतो .. अनपेक्षित शहाणपणापणाला फटका ! वाहतुकीचा सिग्नल तोडून पुढचे दोघे भरधाव निघाले की, आपणही 'प्रयत्न' करायला जातो आणि नेमके 'त्या'च्या तावडीत सापडतो ..