Skip to main content

एक ठुमरी, एक भावना, एक राग : अनेक कलाकार.

लेखक मनोज श्रीनिवास जोशी यांनी रविवार, 08/07/2012 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
लग्नानंतर नववधूला “बिदा” करणे हा भारतीय कुटूंबामधला एक अतिशय नाजूक ,कोवळा , भावोत्कट क्षण ! आयुष्याचा एक अध्याय पूर्ण करून नवा अध्याय सुरु करायला सासरी निघालेली मुलगी. आई –आणि ती मुलगी रडून आपल्या भावना व्यक्त करतात . पण दुर्दैवाने सगळ्यांनाच असे रडून मोकळे होता येत नाही. मग हया भावना व्यक्त करण्यासाठी कविता गाण्यांचा आधार घेण्यात येतो.

एका अस्सल मर्दाची कहाणी

लेखक प्राध्यापक यांनी रविवार, 08/07/2012 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
बोरिस पलेवोय या सोविएत लेखकाच एक सुंदर पुस्तक "स्टोरी ऑफ रीयल मॅन"नुकतच वाचण्यात आल्,एका अस्सल देशभक्ताची ही कहाणी आहे,हि कादंबरी एका खर्‍या व्यक्तीरेखेवर बेतलेली आहे.तो व्यक्ती म्हणजे अलेस्केइ मेस्सेरेव्ह जन्म २० मे १९१६,रशियातील एका सामान्य कुटुंबातला.

एक असामान्य पोलिस अधिकारी हरपला

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 08/07/2012 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
आज माजी पोलिस उपायुक्त श्री. अरविंद पटवर्धन यांच्या मृत्युची बातमी वाचली आणि ३०-३५ वर्षांपूर्वीच्या श्रीकांत सिनकर लिखित मुंबई सी आय डीच्या तपास-चातुर्यकथा डोळ्यापुढे साकारल्या. सिनकरांच्या आवड्त्या अधिकार्‍यांपैकी एक अधिकारी श्री. अरविंद पटवर्धन. सी आय डी मध्ये अधिकारी असूनही एका खोलीत साधेपणाने राहणारा, निस्पृह व गणवेशाच्या आत माणूस जपणारा आणि गुन्हेगारातही माणूस शोधणारा व त्याला पुन्हा माणसात आणायचा प्रयत्न करणारा हा असामन्य मनुष्य. पोलिस कारकिर्दीत पटवर्धन साहेब गाजले ते आर्थिक गुन्ह्यांचा महाकठिण़ तपासांसाठी.

वारीसोबत चार पावलं....

लेखक मन यांनी रविवार, 08/07/2012 10:12 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी नेमकं लवकर उठून शुचिर्भूत होताच समोर दिंडी चाललेली दिसली. त्यावर ज्ञानेश्वर ,तुकाराम ह्यांचेही फोटो दिसले, वारिचे रिंगण बहुदा बनवले जात होते. मनातल्या मनात त्यांच्यासोबत चार पावलं फिरुन आलो. "जे न देखे रवी" मध्ये प्रथमच लिहीत आहे. जगण्याचा पाया, चालण्याचे बळ मझिया मना देइ भगवंता. तुझिया कृपेने झालो मी अमर मेलो मी तक्त्क्षणी उरलो हा नश्वर. तुझ्या दर्शनाने होई चित्त शांती माझे अंगा येइ चंदनाच्या ज्वाळा ज्वाळा ह्या शांत, बुडविती अनंता आता काय होणे सांगी पांडुरंगा ठाकलो उभा दारी तुझ्या वाजवी टाळ सजवी मृदुंगा टाळ हा हाताचा मृदुंग देहाचा नेउनी पालखी पोचवी असीम आनंदा ---मनोबा---
काव्यरस

मिपावरील संगणकतज्ञांना आवाहन

लेखक सर्वसाक्षी यांनी रविवार, 08/07/2012 09:38 या दिवशी प्रकाशित केले.
आजच्या वर्तमानपत्रात 'आपला संगणक सुरक्षित आहे की बाधीत?' अशी बतमी वाचली. डी एन एस सर्वर बदलुन टाकणारे खलयंत्र जर आपल्या संगणकात शिरले असेल तर सोमवारपासून असे बाधित लोक जालावर दाखल होण्यास मुकतील, त्यांना आपल्या सेवादात्याशी संपर्क साधुन नव्याने जुळणी करावी लागेल असे म्हटले आहे. आपला संगणक बाधीत झाला आहे किंवा नाही हे पाहण्यासाठी काही संकेतस्थळांची नावेही दिली आहेत. सोमवारी जेव्ही एफ बी आय लुच्चे सर्वर बंद करुन टाकेल तेव्हा बाधीत संगणकाला जालावर प्रवेश मिळणार नाही. नुकत्याच एका स्थळावर गेलो असता माझा संगण़क व जाल सुरक्षित असल्याचा निर्वाळा मिळाला.

"अ लॉट कॅन हॅपन ओव्हर कॉफी"

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शनिवार, 07/07/2012 14:49 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्यापैकी बर्‍याचजणांना CCD अर्थात कॅफे कॉफी डे माहीत असेलंच. म्हणजे आहेच. तर त्यांची जी टॅगलाईन आहे " A Lot Can Happen Over Coffee" बर्‍याच दिवसापसून डोक्यात भणभणत होती. म्हणजे असं की, काय नक्की सांगायच असेल यांना, असं काय काय घडू शकतं फक्त एका कॉफीवरून...... असे एक न एक अनेक विचार होते. पण कोणास माहीत होतं की, ते काय काय होतं हे जाणून घेण्यासाठी कोणीतरी असावं लागतं.. मी स्वतः आतापर्यंत कधीच तिथे गेलेलो नाही. त्या महागड्या कॉफ्या पिण्यापेक्षा आमच्यासारखी भटकी माणसे, एखाद्या टपरीवरच्या चहात स्वर्गसुख शोधतात.... आयुष्य अगदी सुरळीत चालू होतं. घर - नोकरी - मित्र - जोपासलेले छंद (चांगले)...