Skip to main content

'उरा'तली सर!

लेखक मेघवेडा यांनी मंगळवार, 03/07/2012 21:11 या दिवशी प्रकाशित केले.
नेमेचि येतो मग पावसाळा. पाऊस आला की मान्सूनइतकाच मुसळधार बरसणार्‍या वर्षाकवितांचा पाऊसातच आपली माझी एक बारकीशी सर. :) परवा मुंबईत मान्सूननं आगमनाची वर्दी दिल्याचं वाचलं. मागोमाग विविध सोशल नेटवर्क्सवर उष्म्यानं जीवाची काहिली झालेल्या तमाम मुंबैकरांनी नि:श्वास टाकल्याचंही वाचलं. मनात पाऊसकवितांची उजळणी सुरू झाली. आणि बोरकरांच्या एका द्विपदीवर मन येऊन अडलं ते तिथंच उरलं. त्यातून निर्माण झालेली ही 'उरातली' सर!
काव्यरस

गोल साडीची आधुनिकता

लेखक रामदास यांनी मंगळवार, 03/07/2012 21:10 या दिवशी प्रकाशित केले.
नऊवारी पातळापासून पाचवारी गोल साडी हा प्रवास हेच मुळी फॅशनच्या दुनियेतील धीट विधान आहे यावर आजच्या काळात फारच थोडी माणसं विश्वास ठेवतील. एकेकाळी मुलगी गोल साडी नेसते या कारणासाठी लग्नं मोडली आहेत. गोल साडी म्हणजे पाचवारी साडी. नऊवारी ते पाचवारी हे सामाजिक स्थित्यंतराचे माप झाले. वाराचे -चाळीस इंचाचे माप-जाऊन पन्नास वर्ष झाली. मोजमाप मीटर-सेंटीमीटरमध्ये सुरू झाले. साडी नव्या मापाने साडेपाच मीटरची झाली.

जुनी गोष्ट...

लेखक विदेश यांनी मंगळवार, 03/07/2012 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
चिमणे चिमणे दार उघड, म्हणत कावळा थांबत होता बाळाला तीट लावत लावत.. चिमणीचा वेळ जात होता शेणा-मेणाच्या त्यांच्या घरात पाऊस दंगा करत होता बाळ मजेत आईच्या कुशीत, रंगीत स्वप्नात शिरत होता ! ...पावसाची वाट पहात पहात, चिमणी खूपच थकली आहे दाराबाहेरच्या कावळ्याने, मान बाजूला टाकली आहे जुनी गोष्ट..नव्या पिढीतली आई बाळाला सांगत आहे बाबाचा जीव सिमेंटच्या घरांत वरखाली टांगत आहे !

कळले ते अंडे

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 03/07/2012 17:18 या दिवशी प्रकाशित केले.
थकल्या भुकेस पटकन केवळ कळले ते अंडे नेमक्यावेळी पचका करूनी जळले ते अंडे खरपूस वास, तोंडी पाणी, भट्टी जमली वाट्टं परंतु केकच्या झाकणामागे हसले ते अंडे गणिताच्या पेप्रात मी दिली उत्तरे सारी तरी पेपरावरती शेवटी उरले ते अंडे कठोर तपाच्या नंतर देवा मनभावे स्मरले. विश्वाचे इंगीत म्हणूनी दिसले ते अंडे रंगत चढल्या मैफिलीत मग मीही घेतली तान पण स्टेजवर बसल्याबसल्या झेलले ते अंडे **सध्याच्या अंडे महोत्सवाच्या निमित्ताने पटकन काही स्फुरले. वृत्त वगैरेवर अजिबात विचारही केलेला नाही

आई बाप खरे गुरुंचेही गुरु.

लेखक निश यांनी मंगळवार, 03/07/2012 15:58 या दिवशी प्रकाशित केले.
आईबापा विना कोण गुरु मोठा ? पायी असे त्यांच्या देव विसावला. झिजवी देह सदा आई व बाप दुजा गुरु काय करील असे तप? बोट धरुनिया दाखविती जग, स्वसुखे सारुन बाजुसी , जगती आई बाप. करती मोठा त्याग विनामोबदला, असती गुरु माझे आई व वडिल. आई बाप आहेत देवाचेही देव तेच आहेत गुरु पुजनिय. निशदास म्हणे , शोधु नये कधी बाहेरचा गुरु. आईबाप खरे गुरुंचेही गुरु. आईबाप खरे गुरुंचेही गुरु.

महाराष्ट्र सी ई टी

लेखक JAGOMOHANPYARE यांनी मंगळवार, 03/07/2012 14:28 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्र सी ई टी इंजिनियरिंग आणि मेडिकलसाठी महाराष्ट्रात सी ई टी घेतली जाते, तिची माहिती हवी आहे. ही परिक्षा कधी असते? किती मार्कांची व किती पेपर असतात? इंजिनियरिंग व मेडिकल दोन्हीला एकच पेपर असतो का? इतर माहिती, तयारी कशी करावी वगैरे.