पिंकी प्रामाणिक
पिंकी प्रामाणिक या नावाच्या खेळाडूने सध्या धुमाकुळ घातला आहे. खरे तर त्निने धुमाकुळ घातला आहे म्हणण्यापेक्षा मिडीयाने घटनांना धुमाकुळाचे रूप दिले आहे. खरे तर पिंकी ही भारताला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळवून देणार्या चमुतील एक खेळाडू. एक भारतीय नागरीक आनि सर्वात मुख्य म्हणजे एक 'माणूस'! तिच्यावर एका महिलेने बलात्काराचा (लग्नाचे वचन देऊन फसवल्याचा) आरोप केला आहे व पिंकी ही स्त्री नसून पुरूष आहे असाही दावा केला आहे. या दाव्याची सत्यता पडताळणे हे कोर्टाचे कामच आहे आणि ते झालेच पाहिजे.
मिसळपाव
'अनुराग कश्यप डोक्यावर पडला आहे' इथपासून ते 'येवढा चित्रपट लोकांनी का नाकारला?' अशा दुसर्या टोकाच्या प्रतिक्रियेपर्यंतच्या गप्पा 'गँग्ज ऑफ वासेपुर' ह्या चित्रपटाबद्दल ऐकत होतो. स्वतः अनुराग कश्यप आणि ज्यांना चित्रपटातले नक्की कळते (आसे आम्हाला वाटते) अशा दोन चार समीक्षकांनी देखील वासेपुरचे कौतुक केल्याने, आता नक्की भानगड आहे तरी काय हे बघणे आलेच होते. काल मग एकदाचा हा चित्रपट पाहिला. चित्रपटाची कथा म्हणाल तर एका वाक्यात संपणारी आहे.