Skip to main content

वीज वितरण कंपन्या आणि ग्राहक

लेखक चैतन्यकुलकर्णी यांनी सोमवार, 09/07/2012 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
विजवितरण कंपनी सध्या ५०० रू. पेक्षा जास्त बील असेल व वेळेवर भरले नाही तर कोणतीही पुर्वसुचना न देता वीज जोडणी तोडत आहे. किमान १५ दिवसांची नोटीस देणे बंधनकारक असताना ती न देता वीज कायदे पायदळी तुडवले जात आहेत. उद्योंगाकडे लाखोंची थकबाकी असताना त्यांना वितरणचे कर्मचारी सहाय्य करतात. आज दुपारीच माझ्यासमोर घडलेली घटना आहे. एका कुटूंबाचे बील ३ जुलैला देय (रू. ५०० पेक्षा जास्त) होते व त्यांनी काही अडचणींमुळे ते मुदतीत भरले नाही तर वीज वितरण कर्मचा-याने काहीही ऐकून न घेता वीज तोडली व त्यांना २५ रू. दंड व बील भरून कार्यालयात भेटण्यास सांगितले. वस्तुत: नवीन बील भरेपर्यंत बील भरले तरी चालते.

"कोणाचा रे तू?"

लेखक चिगो यांनी सोमवार, 09/07/2012 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
"कोणाचा रे तू...?" गावात बालपण गेलेल्या कुणालाही हा प्रश्न नवीन नसावा. ह्या प्रश्नाच्या उत्तरावर तुम्हाला मिळणारी वागणूक ठरत असे. वाटलं होतं, की शहरे, उच्च शिक्षण संस्था, उच्च पदस्थ नोकर्‍या इ. मध्ये कुठल्याही व्यक्तीला मिळणारी वागणूक कदाचित त्याच्या/तिच्या बौद्धीक प्रतिभेवर निर्धारीत असेल. पण काल "सत्यमेव जयते" बघितल्यावर कळले, की भारत असो वा इंडीया, अजूनही "कोणाचा रे तू" ह्याच्या उत्तरावर बरंच काही निर्भर आहे.. "सत्यमेव जयते" च्या बर्‍याच आधी, लाबशाराप्र अकादमीमध्ये, "इंडीया अनटच्ड" ही डॉक्युमेंटरी बघितली होती. खरे तर स.ज. पेक्षाही ही फिल्म जास्त सत्यदर्शी आहे.

टोमॅटोची चटणी किंवा भाजी

लेखक मराठमोळा यांनी सोमवार, 09/07/2012 11:03 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, काय भाजी करावी हे बराच वेळ विचार करुन पण नाही सुचले तर हा प्रकार नक्की करुन पहा, स्पेशली पुरुष मंडळीसाठी ही पाकृ. बायको भाव खाऊ लागली की स्वतः स्वयंपाक घरात घुसाव आणी ही पाकृ करावी. तुमची कॉलर ताठ झालीच पाहिजे. लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी ही टोमॅटोची चटणी किंवा भाजी.

बस लागणे

लेखक तुषार काळभोर यांनी सोमवार, 09/07/2012 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
तर.... मागील सोमवारी मी नवीन नोकरीच्या ठिकाणी रुजू झालो. याआधीच्या ठिकाणी मी दुचाकीवर जायचो. या नविन ठिकाणी मला कंपनीतर्फे बसची सोय करून देण्यात आली आहे. मला लहानपणापासून 'बस लागणे' हा त्रास/आजार आहे. आणि तो केवळ बसपुरता मर्यादित नाही. चारचाकी गाडी (मारुती-८०० पासून ते फोर्ड एण्डेव्हर पर्यंत), एसी चालू ठेवून वा बंद ठेवून, खिडकी उघडी वा बंद ठेवून, उपाशी पोटी वा भरल्यापोटी कोणत्याही परिस्थितीत मला त्रास होतो. बर्‍याचदा १-२ किमी अंतरातही त्रास होतो, तर क्वचित २०० किमी सुद्धा मला त्रासरहित प्रवास करता येतो. तर असा त्रास का होतो? त्यावर काय उपाय करता येतात?

हिंदी मराठी प्रशासकीय नावे

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 09/07/2012 02:31 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो आपण बरेचदा शासकीय कार्यालयांवर इंग्रजी खेरीज हिंदी (केंद्र शासनाच्या अखत्यारीत असल्यास) व मराठी (राज्य शासनाच्या अखत्यारीत असल्यास) नावे वाचतो पण बहुतांश वेळा त्यांच्या इंग्रजी नावांचा व्यवहारात उपयोग होतो. पण लक्ष देऊन वाचल्यास भारतीय भाषांतील नावे कधी फार मजेदार तर कधी फार कंटाळवाणी वाटतात. उदा. पुण्यातील बायपास रस्त्याचे मराठी नाव - कात्रज देहूरोड बाह्यवळण महामार्ग (सलग १० वेळा म्हणायला गेल्यास कच्चा पापड पक्का पापड सोपे वाटेल).