Skip to main content

पावसाळी ट्रेक

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 06/07/2012 13:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, पावसाळा सुरू होताच भटक्यांना वेध लागतात ते पावसाळी ट्रेकचे. मी युथ हॉस्टेल कांदिवली युनिटचा सभासद असल्याने मला देखिल त्यांचा पावसाळी ट्रेक संबंधीचे वेळापत्रक असलेला मेल आला होता. काही वैयक्तीक कारणास्तव ही बातमी येथे देण्यास उशीर झाला त्या बद्दल क्षमस्व आणि हो !जाउन आल्यवर फोटो आणि वर्णन, अनुभव नक्की नोंदवा बर का? आल दि बेस्ट. टेक केअर. "सेव्ह नेचर सेव्ह फ्युचर" (हा धागा म्हणजे युथहॉस्टेल अथवा कांदिवली युनीटची जाहीरात नाही.

सर्सर आल्या सरीत...

लेखक चैतन्य दीक्षित यांनी शुक्रवार, 06/07/2012 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
सर्सर आल्या सरीत कोणी दोन मैत्रिणी शोधत होत्या एक आसरा, त्या ओल्या क्षणि! डोक्यावरुनी घेत ओढणी चालत भरभर जशा सरी त्या येतच होत्या सर्सर सर्सर ! चेहर्‍यावरती चिंता होती चिंब तनांची मनात गणिते चालू आणिक क्षणाक्षणांची! शोधक नजरा, अंगचोरट्या, थरथर देही ओघळणारे थेंब टपोरे सचिंत तेही! वारा वाहे, उठे शिरशिरी चिंब तनातून ओला श्रावण हळूच डोकावला मनातून! मनात भरता श्रावण कोणा हवा अडोसा? चिंब भिजावे, ओलेती बोलावी भाषा ! त्या थेंबांशी हितगुज व्हावे छान टपोरे अन सृजनाचे मुक्त फुलावे मनी फुलोरे ! म्हणून भिजल्या सरीत अवखळ,दोन मैत्रिणी होउन गेल्या चिंब चिंब त्या थेंब श्रावणी! -चैतन्य दीक्षित

टप टप टप...

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शुक्रवार, 06/07/2012 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
पाऊस थांबून खरं तर बराच वेळ झाला घराचे छत अजूनही गळतेय टप टप टप... --------------- तुला निरोप देऊन परतलो तसाचं बसून आहे बराच वेळ चंद्राने आपले साम्राज्य वाढवायला सुरवात केली टिपूर चांदणे पसरत गेले ते डोळ्यात उतरतांना कां कुणास ठाऊक पण एक आवाज कानात घुमतोय टप टप टप... -------------- बाजुच्या खोलीतला तुझा वावर तसा अजुनही तस्साचं बुद्धीचे मनाशी वाद सुरु झाले एक म्हणे तु नाहीस, अन् एक तु आहेस.. खिडकीच्या काचेवर परत तोच पाऊस.. टप टप टप... -------------- तुझा आवाज घरभर दाटून राहीलाय कोपर्या-तल्या उदबत्तीच्या सुवासासारखा जाणवतोय..
काव्यरस

तुमचीच गोष्ट.... बिन नावाची!!

लेखक अमोघ शिंगोर्णीकर यांनी शुक्रवार, 06/07/2012 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
श्रावण नुकताच संपलेला. सप्टेंबरमधला तो एक दिवस, वेळ सकाळी आठची. "तो" वडाळा स्टेशनवर उभा, आठची पनवेल पकडायला. जसे आपण सगळे इंजिनिअरिंग स्टुडंट्स म्हणवतो, तसाच तो हि नुकताच इंजिनिअरिंग स्टुडंट बनलेला. ट्रॅकजवळील गवताची पाती, नुकताच पडलेल्या उन्हामुळे स्वत:च्या हिरवट-पिवळ्या रंगांच्या दवबिंदूत चकचकीत अविष्कार दाखवित होती. तो फर्स्ट क्लासला उभा. तीन नंबर प्लॅट्फॉर्मवर ८.१० ची अंधेरी पनवेल आली. त्यांच्या समोर लेडीज फर्स्टक्लास आला. "ती" गोरीपान... नाजूक. उभ्या-उभ्याच त्याची नजर तिच्यावर खिळली. अचानक मोबाईलचे सिम ब्लॉक व्हावे तसे झाले. "ती" मात्र स्वत:च्याच धुंदीत.

फॉरेस्ट गंप अन इतर

लेखक शिल्पा ब यांनी शुक्रवार, 06/07/2012 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मिपावर बरंच वैचारीक वादळ घोंघावलं होतं...त्यामुळे हे जरा लाईट कैतरी म्हणुन. आताच नवर्‍याने फॉरेस्ट गंप लावला होता. कितीही वेळा पाहीला तरी नविन काहीतरी आवडत जातं. अगदी निरागस अशा फॉरेस्टच्या आयुष्यात बरंच काय काय होतं...तो त्याला कसा सामोरा जातो. अगदी वेगळा विषय, वेगळी मांडणी अन मुख्य म्हणजे टॉम हॅन्क्सचा अभिनय. तसंच कास्ट अवे सुद्धा. अजुन असे कोणते चित्रपट आहेत जे कितीही वेळा पाहीले तरी आवडतात?

ज्यूलीचे चौघडे

लेखक मन यांनी गुरुवार, 05/07/2012 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
साल १९७५. स्वातंत्र्य मिळालं त्या दिवशी जन्मलेली पिढी ऐन तारुण्यावस्थेत आलेली. तरुण स्वातंत्र्यसैनिक म्हणून मिरवलेल्यांच्या डोक्यावर हलकीशी चंदेरी रेषा उमटू लागलेली. म्हणजेच स्वातंत्र्यपूर्व विचार, समाजमन मागे पडत चाललं तरी अजून पुसलं गेलं नव्हतं. शहरातल्या सर्वसाधारण महाविद्यालयात मुलींचा वावर थोडासा वाढू लागला असला तरी कुणीही अनोळखी भिन्नलिंगी व्यक्तीशी बोलणे म्हणजे अजूनही "जगावेगळी" गोष्ट होती. पोरींशी डायरेक बोलणे हे फिल्मी हिरो नि रोडरोमियोलाच शोभते असा मध्यमवर्गाचा(आणि निम्नमध्यमवर्गाचा) समज. सर्वाधिक संख्येने ह्यांचीच मुले कॉलेजात जात्.श्रीमंतांची संख्या देशातच कमी.

मिंट मॅजीक

लेखक jaypal यांनी गुरुवार, 05/07/2012 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडली, नावा वरुन कळलच असेल या रेसीपीत मिंट (पुदिना) महत्वाचा घटक आहे.

खंड कपारी

लेखक अज्ञातकुल यांनी गुरुवार, 05/07/2012 16:44 या दिवशी प्रकाशित केले.
अभिषेकाचे ओढे नाले वाहुन गेले माघारी शिरी बोडके उरले कातळ हिरवळ सुकली संसारी तळी साचले मुके सरोवर किमया प्रतिबिंबित सारी अगणित लेणी खंड कपारी दिसल्या मजला गाभारी काठ किनारे भिजलेले आकाश पृष्ठ्भर निजलेले रंगात निळ्या लहरींवरती पवनाचे स्पर्श पहुडलेले जड एक कोपरा माझाही काळजात काहुर दडलेले कजळरात्री अंधार नभी चांदणे भ्रमात विखुरलेले .........................अज्ञात
काव्यरस