Skip to main content

अस्पृश्यता, आरक्षण आणि पुणे करार

लेखक सोत्रि यांनी शुक्रवार, 13/07/2012 00:38 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या रविवारचा सत्यमेव जयतेचा भाग अस्पृश्यता ह्या सामाजिक विषयाला वाहिलेला होता. शहरी भागात राहणार्‍या बर्‍याच जणांसाठी त्यात दाखविलेल्या बर्‍याच गोष्टी कदाचित धक्कादायक असू शकतील. ह्या भागानंतर बर्‍याच मराठी संस्थळांवर ह्या अनुषंगाने चर्चा झडल्या. मिपावरही कोणाचा रे तू' ह्या शीर्षकाचा लेख आला आणि त्यावरच्या प्रतिसादांमधून एक चर्चासत्र झडले. त्या चर्चेत बहुतकरून सध्याच्या तरुण पिढीतले युवक युवती हिरीरीने सहभाग झाले होते. त्या गदारोळात चर्चा अपरिहार्यपणे 'आरक्षण' ह्या मुद्द्यावर येऊन थडकली.

अनोखी मुलाखत

लेखक निळकंठ दशरथ गोरे यांनी गुरुवार, 12/07/2012 23:12 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आपण भारतीय विज्ञानाचा अभ्यास करतो, पण तो डॉक्टर किव्हा इंजिनिअर होण्याकरिता कधी वैज्ञानिक बनण्याचा विचारही आपण करत नाहीत. वैज्ञानिक बनण्यासाठी विज्ञानाचे मुळापासून संशोधन करणे गरजेचे असते. वैज्ञानिक तयार करणारी ही एक अनोखी मुलाखत. भाग-१ मुलाखत सापेक्षतावादाच्या सिद्धांतानुसार जर एखादी वस्तू मोठ्या पिंडाच्या भोवती फिरत असेल तर त्यावस्तूसाठी वेळ हा हळू होतो.पण मला कळत नाही,दुपारच्या वेळेला आपण कोणत्या पिंडाच्या भोवती फिरत असतो? दुपारचा वेळ म्हणजे तीन घंटे एका घंट्या समान.

सुधागड - एक रम्य सफर

लेखक बज्जु यांनी गुरुवार, 12/07/2012 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
सुधागड (पाली) येत्या २४ ते ४८ तासात मुसळधार पावसाची शक्यता हा वेधशाळेचा अंदाज ऐकून शंकेची पाल चुकचुकलीच, म्हटलं आपण नेमक पावसाळी ट्रेक ठरवतोय, त्यात आठवडाभर पावसाने मारलेली (दडी), भरीत भर म्हणून कि काय हा हवामान खात्याचा अंदाज, म्हणजे पाऊस पडायची शक्यताच नाही. तरीही ट्रेक महिनाभर आधीच ठरलेला होता आणि एकदा का आमचा श्रावण (हो हो श्रावण आमचाच हो, गुरुजीना श्रावण प्रिय असतो त्यापेक्षा अधिक कोणाला असेल काय? ) सुरु झाला कि पार अनंत चतुर्दशी पर्यंत खा_वायला देखील वेळ नाही अशी परिस्थिती.

पॅनिंग...

लेखक मदनबाण यांनी गुरुवार, 12/07/2012 21:07 या दिवशी प्रकाशित केले.
जालावर फोटुग्राफी संदर्भात वाचन करत असताना...मला पॅनिंग हा प्रकार कळला ! वेगवान विषयावर फोकस ठेवुन त्याच्याच गतीने कॅमेरा फिरवायचा...आणि क्लीक करायचे... मग काय होतं ?

नदी

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 12/07/2012 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक होती नदी. नाजुकशी चिमुकली, अवखळ. तारुण्याने मुसमुसलेली, सतत ताजीतवानी असलेली. सागराच्या ओढीने सतत धावतणारी. या अखंड धावण्याचा तिला कधी कंटाळा आला नाही. ना कधी ती दमली थकली. सतत वहात रहाणे हा जणु तिचा धर्मच होता आणि सागरा बरोबर एकरुप होणे हा तिचा ध्यास होता. निळ्याशार आभाळाने तिला कधी भुरळ घातली नाही कि आजूबाजूची हिरवीगार वनराई तिचा निच्श्रय कधी मोडू शकली नाही. खोल दरीत स्वतःला झोकुन देताना ती कधी कचरली नाही की मार्गात दगड धोंडे आले म्हणुन ती कधी अडली नाही. त्यांना एक सफाईदार गिरकी मारुन ती डौलात पुढे जात असे. अनेक लहान मोठे झरे, ओढे, तिच्या मधे येउन मिळत असत.

तंदूर कोळंबी

लेखक मराठमोळा यांनी गुरुवार, 12/07/2012 06:41 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, महत्वाची सूचना: मुख्य पानावर सारखे माझे नाव आणि धागे दिसल्याने कुणाला त्रास होत असेल तर सॉरी.. :) काही गोष्टी अनिवार्य असतास. समजून घ्याल अशी मायबाप वाचकांकडून अपेक्षा. कोळंबीचा हा माझा सर्वात आवडता प्रकार आहे. तंदूर कोळंबी नुसतं म्हंटल तरी तोंडाला पाणी सुटतं. पटकन साहित्य घ्या. साहित्याचा अन कृतीचा फोटु न दाखवता हाटेलसारखं डायरेक्ट फायनल डिशच तुमच्या समोर ठेवणार हाय. :) साहित्यः १. पावशेर कोळंबी २. एका लिंबाचा रस ३. लाल तिखट १-२ टे.स्पून ४. काश्मिरी लाल तिखट १ टे.स्पून ५. एक पळी वितळलेले बटर ६. आलं पेस्ट १ टे.स्पून ७. लसूण पेस्ट १ टे.स्पून ८.

चैत्यगृहे

लेखक प्रचेतस यांनी बुधवार, 11/07/2012 23:56 या दिवशी प्रकाशित केले.
चैत्यगृहे- महाराष्ट्रातील गिरीकुहरांत खोदली गेलेली ही सुंदर गिरिशिल्पे. चैत्यगृह म्हणजे प्रार्थनामंदिर किंवा अचूकपणे सांगायचे झाले तर स्तूपयुक्त प्रार्थनामंदिर. स्तूप हे बुद्धाच्या स्मरणार्थ उभारले गेले. अशोकाच्या अहिंसक आक्रमक धर्मप्रसारानंतर तर प्रचंड संख्येने स्तूप उभारले गेले. सर्वसाधारणपणे बुद्ध किंवा बुद्धाच्या श्रेष्ठ अनुयायांच्या अवषेशांवर स्तूप उभारले जात.

न देखे रवी

लेखक शरद यांनी बुधवार, 11/07/2012 20:34 या दिवशी प्रकाशित केले.
न देखे रवी, ते देखे कवी ! कवींनी आपले कौतुक करण्यासाठी हे खरडले का ? शक्य आहे.कौतुक इतर कोण करणार हो ? कुठल्याही साहित्य संमेलनाला जा. कवी संमेलनाला तुडुंब गर्दी. पण समाजवादी पक्षात जसे नेते जास्त.. अनुयायी कमी, तसे इथे कवी जास्त, ऐकणारे कमी. असो. मी आज कवितांबद्दल लिहणार नाही.(कोणी हु s s श्श्य.. केले ?) पण ही कविता करणारी मंडळी कवितेतर लिखाण करतात तेव्हा खरी बहार येते. शांताबाई शेळके, प्रवीण दवणे,वसंत बापट वगैरे लोक जेव्हा ललित,स्फुट लेखन करतात तेव्हा खरी मजा येते. येथे गण-मात्रांचे, लांबी-उंचीचे बंधन नसाल्याने कसे ऐसपैस लिहतात. तशात गप्पांची आवड असेल तर मोकळेच सुटलेले असतात.

सरप्राईज टेस्ट आणि गोंधळलेला परिक्षक.

लेखक गणपा यांनी बुधवार, 11/07/2012 20:19 या दिवशी प्रकाशित केले.
मधली सुट्टी संपली आणि नव्या तासाचा टोला पडला. विज्ञानाच्या बाई वर्गात शिरल्या तसा पोरांचा कलकलाट थांबला. बाईंनी पुस्तक उघडुन नवा धडा शिकवायला घेतला. आजचा धडा होता 'मुळं'. बाईंनी फळ्यावर जमतील तशी चित्रं काढत वेगवेगळ्या मुळांचे प्रकार सांगीतले. उदाहरणं ही दिली. लेकीच्या मनात बाईंची परिक्षा घेण्याची लहर आली. उत्तर माहित असतानाही कार्टीन बाईंना प्रश्न टाकला. "टिचर स्वीट पोटॅटो इज अ स्टेम ऑर रुट?" कुणी रताळं 'मुळ' की 'खोड' असं विचरल्यावर पटकन बेधडक 'मुळ' उत्तर आलं असतं. पण 'स्वीट पोटॅटो' म्हटल्यावर चटकन गोंधळ उडणे स्वाभाविक आहे.