माळरान अन् ते दोघे!! -- ४
3
काव्यरस
गझल सम्राटाचे निधन
सुप्रसिद्ध गजल सम्राट जगजित सिंग यांचे आज सकाळी ब्रेन हॅमरेज मुळे निधन झाले. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. अतिशय प्रतिभावान कलाकार होते ते.
चीता तैल, धार्मिक अपराध वगैरे..
काही दिवस हरिद्वारला गेलो होतो.
नाय नाय. प्रवासवर्णन वगैरे काय नाय.. नो वरीज.. तिथे दिसलेल्या एका "चिजे"वर मात्र हलकीफुलकी फुलक्यासारखी पोस्ट काढायचा मोह आवरला नाही. म्हणून गंगेचे फोटो सोडून बाजारभर हिंडून हेच करत होतो.. खास मिपासाठी..
काय?.. सांगतो..
सविस्तर साग्रसंगीत मुद्देसूद अस्ताव्यस्त माहिती देणार्या पाट्या हा पुण्याचा खास मानाचा तुरा आहे अशी माझी आजपर्यंत समजूत होती. पुण्याला पूर्ण मात देण्याइतकी नाही पण तरी चांगलीच कांपिटिसन अश्या पाट्या मला हरिद्वारात दिसल्या.
तर त्यातली काही "ताझा तस्वीरें" इथे पेश करतोय. टिप्पणीची फार आवश्यकता नाहीच.
कधी कधी स्वप्ने छान पडतात ..!!
कधी कधी स्वप्ने छान पडतात
हवी हवी अशी मस्त वाटतात
स्वप्नात आपले वय दिसत नसते
जसे स्वप्न तसे वय होऊन जाते
कधी असतो आपण मस्त तरुण
मन सुद्धा जाते गाणे गाऊन
प्रेम सुद्धां अगदी छान जमून जाते
प्रेमामध्ये मन हरवून जाते
कशी मस्त मस्त ती दिसत असते
अगदी हवी तशी वाटत असते
रंगी बेरंगी फुलपाखरासारखी
मनात कशी झुलत बसते ...?
अशी स्वप्ने अशी स्वप्ने
कशी अलगद अलगद येतात .?
साखर झोपेत कशी
गाणी गाऊन जातात
अशी स्वप्न मोडू नये
असे खूप वाटून जाते
पण
स्वप्नाना शेवट असतो
हे खूप खरे असते
तरीही काही स्वप्ने खूप काही देऊन जातात
तुमचे मन टवटवीत
नि सकाळ छान करून जातात ...!!
मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या मध्यरेल्वे सांगे तुम्ही काळजी घ्या
काळजी घ्या काळजी घ्या तुम्ही काळजी घ्या
चौकीदार नाही त्या रेल्वेफाटकावर काळजी घ्या ||धृ||
नका भानात वाहन चालवू
नका जरा तेथे कधी थांबू
दिसली नाही आगगाडी जरी
जरा वेगात चलावं रुळावरी
सांगतो तुम्हा काळजीनं पुन्हा
दोन्ही बाजूला डोळे उघडून पहा ||१||
लाल सिग्नल तुम्हा नाही दिसला
जरी हिरवा दिवा लागलेला नसला
नका घालू तुम्ही तेथे तुमची गाडी
घातली तर होतील बारा भानगडी
अपघात होईल जीव तुमचा जाईल
कशाला मध्यरेल्वेला धडकता?
Father Complex
Father Complex
५०शी ला आलो होतो,...छंद म्हणुन C++ चा क्लास लावला
ति पण यायची क्लासला....असेल १९-२० ची.....
काळीसावळि..पण उफाड्याची...माझ्या बाजुलाच तिचा कॉम्प होता..
बघितले कि हसायची...क्लास सुटला कि माझी वाट खाली थांबायची.
सारखी माझ्या कडे बघत रहायची.....
मला जरा सार संकोचल्यागत होत होते...काहिस ठीक नव्हत..
कारखान्याच्या कामासाठी मी ३-४ दिवस बाहेरगावि होतो..
३-४ दिवसानि क्लास ला गेलो तर ति खालीच वाट बघत होति..
डोळे रडुन सुजलेले...’सर तुम्हि कुठे होता?
मला किति काळजी वाटत होति तुम्हि आला नाहि म्हणुन"
माझा हात धरत ति म्हणाली...सारच अवघड होत चालल होत
मी बोललो नाहि...ठरवल द्यायची तिला समज..
एकदा
पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली
ज्याचे मी स्वयंघोषित शिष्यत्व पत्करले होते तो माझा गुरु, आद्य आर्किटेक्ट, स्टीव्ह जॉब्स अकाली हे जग सोडुन गेला. संगणक विश्वात स्वतःचे अढळपद निर्माण करूनच.
सोशल आणि व्हर्चुअल जगात त्याच्याविषयी बरीच नविन नविन माहिती ह्या निमीत्ताने कळत होती. बरेच ब्लॉग्स आणि लेख वाचता वाचता कुठेतरी स्टीव्ह विषयी असलेल्या काही चित्रपटांची माहिती मिळाली. त्यात सापडला 'पायरेट्स ऑफ सिलीकॉन व्हॅली'.
तिखट आप्पे
साहित्यः
तयार इडलीचे पीठ
(कसे करायचे त्याची कृती: २ वाटया उकडे तांदूळ, १ वाटी उडदाची डाळ वेगवेगळे १०-१२ तास भिजवणे.
मिसळपाव
