Skip to main content

रावणाला कोणी मारला ?

लेखक नाहिद नालबंद यांनी मंगळवार, 25/01/2011 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
एक शिक्षण अधिकारी एकदा एका शाळेत गेला सहजच एका वर्गात शिरला, एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला. बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला. "रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला सारा वर्ग शांत शांत जाहला प्रश्न् पुन्हा एकदा विचारला "मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला - "रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?" मास्तरांनी खुलासा केला - आमचा विद्यार्थी साधा भोळा गांधी अहिंसा ठाऊक त्याला कशाला कोण मारेल रावणाला ? अधिकारी आणखी वैतागला, मुख्याध्यापकांकडे गेला, झाला प्रकार सांगितला, "रावणाला कोणी मारला ? विद्यार्थी सांगत नाहीत" - म
काव्यरस

'द किंग'

लेखक प्रास यांनी मंगळवार, 25/01/2011 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
१९५० चा काळ, अमेरिकेत ज्याकाळात वर्णद्वेष ब~यापैकी वास्तव होते तेव्हा मिश्रवस्ती असलेल्या 'मेम्फिस' शहरामध्ये एक गौरवर्णीय मुलगा खूपदा कृष्णवर्णीयांच्या मौजेच्या ठिकाणी दिसायचा. त्यांच्या म्युझिक क्लब्स मध्ये जायचा, गाण्यांच्या कार्यक्रमात जायचा, इतकंच नाही तर गौरवर्णीयांच्या क्लब्समध्येही 'ज्यूकबॉक्स'मध्ये '~हिदम एन ब्लूज', 'गोस्पेल' आणि 'स्पिरिच्युअल' प्रकारची गाणी ऐकायचा. एरवीही रेडिओला चिकटण त्याला नवीन नव्हत.

शबद गुरबानी

लेखक अरुंधती यांनी मंगळवार, 25/01/2011 18:44 या दिवशी प्रकाशित केले.
काही वर्षांपूर्वी एका पंजाबी स्नेह्यांच्या घरी झालेल्या कार्यक्रमात मी 'मेहरावालेया साइयां रक्खी चरनां दे कोल' हे मला तेव्हा येत असलेले एकमेव पंजाबी भक्तिगीत गायले अन् त्या स्नेह्यांनी खूश होऊन लगेच त्यांच्याकडील उत्तमोत्तम पंजाबी गीतांची कॅसेटच मला भेट म्हणून दिली! शिवाय त्यांच्याकडे असलेले एक पुस्तकही चाळायला दिले. पंजाबी भाषेतील गाण्यांशी माझा तो पहिलाच परिचय! त्या अगोदर हिंदी चित्रपटांच्या काही गाण्यांमधून या भाषेची गोडी जाणवली होती. पण आता ती गाणी नियमित ऐकू लागल्यावर त्यांच्यातील रसमाधुर्य अजूनच आल्हाद देऊ लागले.

भेसळखोरांनी अप्पर जिल्हाधिकाऱ्याला जिवंत जाळले

लेखक छत्रपति यांनी मंगळवार, 25/01/2011 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
पेट्रोल आणि डिझेलमधील भेसळ रोखण्यासाठी गेलेल्या नाशिकच्या अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना भेसळखोरांनी पेट्रोल आणि रॉकेल टाकून जिवंत जाळण्याची क्रूर घटना मनमाडपासून जवळच असलेल्या पाणेवाडी परिसरात घडली. य़ात सोनावणे यांचा मृत्यू झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील मनमाडपासून १० किलोमीटर अंतरावर असलेल्या पाणेवाडी येथे भारतातील सर्वात मोठे पेट्रोल आणि डिझेलचे साठे आहेत. या ठिकाणी पेट्रोल आणि डिझेलमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ होते. ही भेसळ होत असल्याची माहिती अप्पर जिल्हाधिकारी यशवंत सोनावणे यांना कळाली. आपल्या पथकासह सोनावणे या ठिकाणी गेले. त्यावेळी पेट्रोल-डिझेल माफिया यांच्या बाचाबाची झाली.

अननस + हनी केक

लेखक स्वाती दिनेश यांनी मंगळवार, 25/01/2011 15:33 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या त्सेंटा आजीला आता तुम्ही सगळे ओळखताच, मागच्या आठवड्यात तिने एका पुस्तकात ही रेशिपी वाचली आणि हे करुन पाहूच या असा धोशा लावला. ह्या वयातला तिचा उत्साह पाहून मी आणि आकिम आजोबा पण मदतीला लागलो.केक करताना तिने तिच्या ४० वर्षांच्या अनुभवातून जे बदल केले त्यामुळे तर केक उत्कृष्ट होण्यास मदतच झाली. अर्थातच केक अफाट, अफलातून इ. इ.

जरा हटके भरली वांगी

लेखक रश्मि दाते यांनी मंगळवार, 25/01/2011 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
चला मंड्ळी आज तुम्हाला आम्च्या यु.पी वाल्यांची स्पेशल भाजी कशी करतात ते सांगते,आज संध्याकाळी ताडोबाला जायचे आहे १ १/२ दीवसाच्या जंगल भ्रमंती साठी, त्यासाठी भाऊरायाची खास फर्माईश होती,ही भाजी तुम्ही वांगी,कारली,तोडंली,भेंडी आणी लहान कांदे वापरुनही करु शकता,२-३ दिवस खराब होत नाही म्ह्नुन प्रवासात नेण्यासाठी बेस्ट ही भाजी शीज्त आहे हे गल्लीच्या कोपरयावरुन ही ओळ्ख्ता येते एवढा घमघमाट सुटतो,भाकरी,पराठे किवा पुरी बरोबर मस्त लागते आणी कारली वापरली असल्यास भातात चुरुन ............फ्क्त कारली घेत असाल तर मेथीदाणे वापरु नये भरली वांगी जरा वेगळ्या प्रकार आहे हा नेहमिच्या भरल्या वांग्या एवजी वांगी २५० ग्

हरवलेले खेळ

लेखक मनराव यांनी मंगळवार, 25/01/2011 14:41 या दिवशी प्रकाशित केले.
असंच परवा रात्री लहानपणात रमून गेलं असताना मनात एक विचार आला. लहानपाणी आपण किती तरी छोटे छोटे खेळ खेळलो. विषामृत, लीन्गोर्च्या, लपाछपी, गोट्या, विटी-दांडू, डबा-ऐसपैस, भोवरा... एक न अनेक.रोज वेग वेगळे खेळ खेळायचं ठरवलं असतं तर एखादा खेळ परत खेळण्यासाठी बरेच दिवस लागले असते. अजूनही आठवतं लपाछपी खेळताना, लपण्यासाठी ठरलेल्या, कोणालाही माहिती नसलेल्या त्या जागा, एकमेकांचे शर्ट घालून ज्याच्यावर राज्य आहे त्याला फसवणे.... भोवरा खेळताना, मुद्दाम भोवरा लांब जाऊन फिरेल अशा पद्धतीने मारणे... डबा-ऐसपैस खेळताना सगळ्यांनी एकदमच डबा उडवायला जाणे...

राष्ट्रभाषा??

लेखक स्पा यांनी मंगळवार, 25/01/2011 11:59 या दिवशी प्रकाशित केले.
काल हापिसात आमच्या ग्रुप मध्ये आपली राष्ट्रभाषा कुठली यावरून वाद चालला होता लहानपणापासून शाळेत आपल्याला हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे बिंबवले गेले होते आत्ता पर्यंत पण माझे हेच मत होते, पण जेव्हा गुगलून पहिले तेव्हा धक्कादायक माहिती बघण्यात आली भारतीय कायदा आणि घटनेत कुठेही हिंदी हि आपली राष्ट्रभाषा आहे असे म्हटलेले नाही कायद्यात अशी नोंद मात्र आढळली ( Article 354 specifies that the legislature of a State may by law adopt any one or more of the languages in use in the State or Hindi as the Language or Languages to be used for all or any of the official purposes of that State.[3] Section

अतिथी देवो भव

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 25/01/2011 11:45 या दिवशी प्रकाशित केले.
गुजराथी लोक हे खाण्यापिण्याचे शौकीन लोक. कुठेही जातील तेथे अगोदर जेवण्याखाण्याची काय सोय आहे हे पाहून जातील. ऑफिसातदेखील लंच साठी भक्कम पाच सहा कप्प्यांचा डबा नेतील.