Skip to main content

दिशाहीन विरोधी पक्ष?

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 25/01/2011 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
युपीए-२ आले आणि डाव्यांशिवाय बनलेले हे सरकार बरेच काही करेल अशी आशा जागृत झाली. मात्र प्रत्यक्षात एकच नव्हे तर अनेक आघाड्यांवर सत्ताधारी कोंडीत सापडले. खरं तर ते तसे सापडले असते. मात्र सध्या विरोधी पक्षाने एखादा मुद्दा हाती घ्यावा आणि तो पूर्णत्त्वास न नेताच दुसरीकडे वळावे असे चालले आहे. गेल्या काहि दिवसांत भ्रष्टाचारासंबीधी अनेक प्रकरणे उजेडात येऊ लागली. राष्ट्रकूल घोटाळा, आदर्श घोटाळा वगैरेंबरोबरच ३जी घोटाळ्याने तर भ्रष्ट्राचार मोठ्या प्रमाणात पुढे आला. (प्रथेप्रमाणे) विरोधी पक्ष आक्रमक झाला. जेपीसी साठी रान माजवले पण पुढे?

थत्त्यांचा प्रहार

लेखक अवलिया यांनी मंगळवार, 25/01/2011 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
आमचे परम मित्र नितीन थत्ते हे वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असतात त्याचबरोबर आपली मते निर्भीडपणे मांडत असतात. त्यांचा आम्हाला आवडणारा गुण म्हणजे जे बरोबर असेल त्याला सहमती देतांना ते मागेपुढे पहात नाहीत. त्यांच्या मतांचा उल्लेख करत प्रजासत्ताक दिना संबंधी मागील वर्षी काय चर्चा ब्लॉगधारकांमधे झाली होती याचा गोषवारा दैनिक प्रहारने दिला आहे. यात मिसळपावचा उल्लेख आहेच बघा काय म्हटले आहे
मिसळपाव’ हा काही रूढार्थाने ‘अनुदिनी’सारखा ब्लॉग (एकेकटय़ाचा असतो तसा) नव्हे. तो चर्चा-कट्टा आहे.

एका झाडाचा मृत्यू ..[?]

लेखक प्रकाश१११ यांनी मंगळवार, 25/01/2011 07:51 या दिवशी प्रकाशित केले.
हे प्रचंड पिंपळ झाड खूप जुने पुराने माझ्या लहानपणापासून जसेच्या तसे तरणे बांड सतत फुलत आपल्याच नादात हरवून स्वप्नात पाखराना आपल्या मांडीवर खांद्यावर जोजावत कित्येक पाखरांच्या पिढ्या त्याच्या खांद्यावर जगल्या ,वाढल्या, हरवून गेल्या दरवर्षी त्याला पालवी फुटते तारुण्याची झळाळी सोनसळ भूषवित आपल्याच तोर्यात आत्ममग्न ..!! तो उभा आहे मठात जुन्या वाड्यात त्याचा भोवती बांधून कट्टा किती पोरे म्हातारी झाली माणसे बदलली पिढ्या बदलल्या हां आपल्या दिमाखात उभा परवाच वाडा पाडून टोवर बांधायचे ठरवलेय पिंपळाच्या मुसक्या बांधून ठेवल्यात दोरखंडाने शुभमुहूर्त बघून त्याला फासावर
काव्यरस

महामानव

लेखक chipatakhdumdum यांनी मंगळवार, 25/01/2011 02:38 या दिवशी प्रकाशित केले.
महामानव डॉ. आंबेडकर यांचे भारत स्वतंत्र होण्यामध्ये काय योगदान होते, त्यांनी स्वातंत्र्यलढ्यामध्ये कोणती कामगिरी बजावली होती, त्यांनी ब्रिटीशांविरुध्द भारत ( अर्थात त्यावेळी हिंन्दुस्थान ) बद्द्ल कोणती निश्चित मते मांडली होती , या संदर्भात काही माहीती मिळेल काय ? हा पहीला भाग झाला. वाचने आत्तापर्यंत जवळपास साडेनउशे, प्रतिक्रिया ओके ओके. आता आपण मुद्यावर येउया. भारताच्या राज्यघटनेत अशी तरतुद आहे की जर एखाद्या राज्यामध्ये कोणत्याही पक्षाला बहुमत मिळाल नाही आणि त्यामुळे कोणत्याही गटाला पक्षी पक्षाला सरकार बनवता आल नाही तर राष्ट्रपती राजवट लागू होउ शकते.

आज्ञार्थी वाक्ये आणि व्यक्तीस्वातंत्र्य

लेखक शुचि यांनी मंगळवार, 25/01/2011 00:05 या दिवशी प्रकाशित केले.
खूपदा एका गोष्टीचे कौतुकमिश्रीत नवल वाटले आहे - जर आपण एखाद्या अमेरीकन व्यक्तीस विचाराल "मी अमूक एक गोष्ट करू का?" तरी त्याचे उत्तर तू हे कर अथवा हे करू नकोस असे न मिळता " I will do so & so" किंवा "No. I will not do so & so" असे मिळते. विशेषतः या अशा दाखल्याचा भरपूर (व्यक्तीगत)विदा माझ्याकडे उपलब्ध आहे. म्हणजे जेव्हा जेव्हा मी हा प्रश्न विचारला आहे तेव्हा तेव्हा अमेरीकन (जन्म/संगोपन आदिने अमेरीकेत असलेल्या) व्यक्तीने मला बहुधा याच अर्थाचे उत्तर दिले आहे. बालसंगोपनाची काही उदाहरणे पहाण्यात आली - एका मध्ये मुलगा त्याच्या बॅगकडे लक्ष देत नव्हता.

पंगा

लेखक प्रास यांनी सोमवार, 24/01/2011 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुलाखालून खूप पाणी वाहून गेलय आता तरी विद्यार्थीदशेत पंगेगिरी अशी ब~याचदा केलीय. तसं त्यातलं काही अंगलट आलं नाही पण अनुभवसम्रुद्ध मात्र नक्की करून गेलं. आयुर्वेद महाविद्यालयात प्रथम वर्षात शिकत असतानाची गोष्ट. परिक्षा महिन्याभरावर आलेली, जर्नल्स लिहीण, ती तपासून घेण, परीक्षेत काय विचारलं जाईल याचा माग काढण वगैरे वगैरे सगळे उद्योग चालू होते. एरवी मी शिक्षकांच्या फार गुड बुकात नसलो तरी ब्याड बुकातही नसायचो (असं तेव्हा मला वाटायचं.) शिक्षकांना सतावणे वगैरे व्हायचं ते त्यांना सोडवायला त्रास होईल अशा शंका विचारण्याने किंवा चालू वर्गात थोडी भंकस करून त्यांचा जीव मेटाकुटीला आणण असंच.

काका हलवायाकडची जिलबी..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 24/01/2011 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
परंतु आज नीलकांताने मुखपृष्ठावर, आज काही काळ मिसळपाववर भीमसेनांच्याच संबंधी धागे यावेत आणि ज्यांना ज्यांना त्यांच्या विषयी लिहायचे असेल त्यांनी तसे लिहावे असं म्हटल्यामुळे लिहायला बसलो आहे, परंतु खरं तर काहीच लिहायला सुचत नाही..सारा दिवस कसाबसा गेला परंतु आता रात्र मात्र अंगावर येऊ पाहाते आहे. अक्षरश: ओक्साबोक्षी रडावसं वाटत आहे, पण धड रडूही येत नाही. गेल्या दोनचार दिसापूर्वी मीच त्यांच्याकरता मारे विमान वगैरे मागवलं होतं, अर्थात त्यांचा त्रास, अंथरुणातल्या हालअपेष्टा संपाव्यात म्हणून. परंतु वास्तव इतकं सोपं नसतं.