Skip to main content

कशे कावळे येती आणिक...

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 27/09/2010 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
सध्या मिपावरचे धागे कावळ्यांनी शुचिर्भूत झालेत, त्यामुळे आमच्याही डोक्यात कवकवाट सुरु झाली आणि आम्ही एका अप्रतिम गाण्याचे श्राध्द घालून बसलो.. कशे कावळे येती आणिक पिंड शीवूनी जाती पंध्रवड्याची अंगत पंगत पितरांसंगे खाती साप काल मज स्वप्नी दिसला फणा काढुनी उभा राहिला जरा दचकुन जाय उठोनी काळोखाच्या राती सकाळ होता मिपा उघडले मुखपृष्ठावर काक पाहिले कळली नंतर जलावरती मज पितरांची महती लगे एक मी भटजी धरला शीधा दक्षीणे त्याला पुजला उध्दरली मंत्रांनी त्यांने तीन पिढ्यांची नाती अनुभव तुमचा सांगा मजला ह्यासाठी मी धागा रचीला फुटकळ धागे काढत फिरतो अशीच माझी ख्याती

घाल घाल पिंगा वा-या - कमलाकर भागवतांना विनम्र आदरांजली..

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 27/09/2010 21:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी प्रभादेवी येथील जी एम ब्रेवरीज मध्ये नौकरीला असतानाची गोष्ट.. सर जिमि विल्यम आल्मेडा हे आमच्या कंपनीचे अध्यक्ष व कार्यकारी संचालक.. तिथे त्यांना भेटायला नेहमी एक वयस्कर गृहस्थ यायचे.. त्यांचं नाव कमलाकर भागवत. ते जिमीसाहेबांचे दोस्त.

कडधान्यांचे धिरडे -------------

लेखक निवेदिता-ताई यांनी सोमवार, 27/09/2010 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य :--सर्व प्रकारची कडधान्ये (मूग, मटकी, चवळी, हुलगा, मसुर, हरबरे, प्रत्येकी दोनशे ग्रॆम,व तांदूळ एक पावशेर, उडीद डाळ अर्धा पावशेर, जिरे अर्धा वाटी, धने अर्धा वाटी...

फिरायला चला..

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी सोमवार, 27/09/2010 15:01 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी दोन पायांच्या गाडीने मानवाचा प्रवास व्हायचा. त्याला जमेल तितके प्रांत त्यानं ओलांडले. चिनी प्रवासी ह्युआन ए त्सांग आपल्या पाठीवरील अवजड ओझे सांभाळीत आशियाभर फिरला, तेव्हा कोठे भारताचं नालंदा साऱ्‍या जगाला कळून चुकलं. कोलंबसाने अमेरिकेचा शोध लावून अख्ख्या जगावर सत्ता गाजवू शकेल अशा अपरिचित भूमीचा परिचय जुन्या दुनियेला करुन दिला. वास्को द गामा चुकून भारतात टपकला व इथल्या मसाल्याचं वेड जगभर पोचवून गेला.