Skip to main content

पाहावेसे असे काहीतरी- नितळ!!!

लेखक मस्त कलंदर यांनी शुक्रवार, 24/09/2010 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
नितळ.... आजकालच्या तेच ते रटाळ विनोद दाखवणार्‍या चित्रपटांच्या भाऊगर्दीत हरवलेला एक सर्वांगसुंदर चित्रपट. चित्रपट अगदी सरळधोपट आहे. कुठे फ्लॅशबॅक, धक्कातंत्र, मालमसाला, खलनायक-खलनायिका, दुष्मन जमाना असले काहीही नाही. अगदी तुमच्या आमच्या घरात घडू शकतात तितक्याच साधेपणे घटना घडत राहतात आणि चित्रपट हळूहळू उलगडत जातो.नायिका नीरजा कौशिक ही एक हुशार नेत्रतज्ञ आहे. अनन्य रानडे हा तिचा मित्र. दोघे बंगळुरातल्या एका दवाखान्यात काम करतात. अनन्यच्या आजीचे डोळ्यांचे ऑपरेशन व्हायचेय, त्यासाठी सेकंड ओपिनिअन म्हणून तो तिला आपल्या पुण्याच्या घरी आणतो.

नीळा पक्षी

लेखक शुचि यांनी शुक्रवार, 24/09/2010 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
साठीला आली होती ती. क्षणांची वाळू झरझर झपाट्यानी काळाच्या चाळणीतून गळून जात होती. आताशा रोज तिची कंबर दुखत असे, हाडं कुरकुरत, पायात गोळे येत असत पण अजूनही नीळा मखमली पक्षी दिसायचं नाव नव्हतं. परंतु त्या पक्षाची आस, त्याचं तिच्या मनावरचं गारुड तसूभरही कमी झालं नव्हतं. लहानपणी नीळ्या मखमली पक्षाला भेटण्याचं जितकं वेड होतं त्याहीपेक्षा जास्त वेड आता तिला लागलं होतं. या पक्षाचं गुपीत नक्की केव्हा तिने ऐकलं तिलाही सांगता येणार नाही कारण ते तसं कोणी सांगीतलच नव्हतं तिला. ते तिला मनोमन आकळलं होतं. तिला जोपर्यंत आठवत होतं तोपर्यंत तिला त्याला भेटण्याच्या ध्यासानी झापटलेलं होतं हेच आठवतं होतं.

ती

लेखक कुसुमिता१२३ यांनी गुरुवार, 23/09/2010 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
चौदावं सरुन पंधरावं लागलय तिला.. दाट केसांच्या घट्ट दोन वेण्या घालुन शाळेला निघालीये ती.. तळपत्या सूर्याची किरणं पडताहेत तिच्या कोवळ्या चेहर्‍यावर त्यांना चुकवण्यासाठी मान खाली घालून चाललीये ती.. रस्त्यातून जाणार्‍या एक-दोन आज्ज्यांच्या डोलताहेत माना.. "कशी सालस पोर हो..कधी डोकं वर करुन नाही बघायची!" पण खरं तर मनातुन तिलाही वाटतय कुणीतरी यावं मागून सायकलवरुन अन 'विचारावं' तिला मग निर्दयपणे हसून 'नाही' म्हणावं तिनं त्याला.. पण नाही वाजत सायकलची घंटी मागून! जाऊ द्या..तिला काय त्याची पर्वा.. तिला माहितीये, एक दिवस येणार आहे तिच्या स्वप्नांचा राजकुमार, अन घेऊन जाणार आहे तिला दू.....र देशी विमान
काव्यरस

सामोसे

लेखक निवेदिता-ताई यांनी गुरुवार, 23/09/2010 20:48 या दिवशी प्रकाशित केले.
From माधुर्य
साहित्य:- मटार एक वाटी, बटाटा एक मध्यम,एक कांदा,मिरची-लसूण -आले पेस्ट एक चमचा, कढीपत्ता,मीठ, साखर एक चमचा, म

भक्तीगीतः गणपती त्यांच्या घरी गेले

लेखक पाषाणभेद यांनी गुरुवार, 23/09/2010 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
गणपती त्यांच्या घरी गेले
गणपती त्यांच्या घरी गेले मनाला रुखरुख लावूनी गेले ||धृ|| दहा दिवस थांबले घरी आनंद आणला त्यांनी दारी पुजा अर्चनाने घर पवित्र झाले गणपती त्यांच्या घरी गेले ||१|| म्हटल्या आरत्या मोठ्या आवाजाने ओवाळले निरांजन भक्तीभावाने प्रसादाचे मोदक कितीक वाटले गणपती त्यांच्या घरी गेले ||२|| हर्षाचा उत्सव पुर्ण झाला आता नाच नाचून देहभान हरपता "पुढल्या वर्षी लौकर या" सारे बोलले गणपती त्यांच
काव्यरस

कोलंबस

लेखक विनायक प्रभू यांनी गुरुवार, 23/09/2010 18:15 या दिवशी प्रकाशित केले.
मी इडली हॉटेलमधे खात नाही. कारण -९९.९९% सांबार म्हणुन जे फोडणीचे लाल पाणी देतात त्याला सांबार म्हणणे हे खर्‍या सांबाराचा अपमान आहे. ह्यातलीच एक वरायटी म्हणजे कॉळंबो. हे इडली बरोबर पण चालते- चालते काय धावते. हॉटेल मधे २ इडल्यांवर पोट भरते. घरी १२ सहज जातात. म्हणुनच हॉटेल मधे कधी नाईलाजाने इडली खावी लागली तर सांबार चटणी अलग अलग. उगीचच स्वःत ला कमीट कशाला करायचे. चाखुन बघायचे. नाहीतर आपली चटणी परवडली. चट्णी पण बहुतांशी सत्व काढलेल्या पांढर्‍या चोथ्याची असते. ___________________________________________________ ज्यांना भात खायला आवडतो त्यांना भाता बरोबर कोलंबस म्हणजे पर्वणी. आवडी नुसार ह्यातले डाळ

इद-उल-फित्री आणि इंडोनेशियन संस्कृतीचे कांहीं पैलू

लेखक सुधीर काळे यांनी गुरुवार, 23/09/2010 16:05 या दिवशी प्रकाशित केले.
ईद-उल-फित्री आणि इंडोनेशियन संस्कृतीचे कांहीं पैलू इंडोनेशिया हा मुस्लिम बहुसंख्य देश (९०% जास्त) असून या देशाचा सगळ्यात मोठासण आहे ‘लबारान’. लबारान हे ईद-उल-फित्री या सणाचे इंडोनेशियन नाव आहे. या सणाला भारतात रमझान ईद म्हणतात तर अरबी रूप आहे इद्-उल-फित्र. अरब भाषेत Eid म्हणजे आनंदोत्सव, सण साजरा करणे आणि फित्र या शब्दाचा अर्थ आहे उपवासाच्या महिन्याची सांगता. थोडक्यात महिनाभर उपास करून स्वतःला पवित्र केल्यानंतर साजरा केला जाणारा सण म्हणजे लबारान. हा सण रमझान महिन्यातील उपवासानंतर येणार्‍या शावालच्या पहिल्या दिवशी (प्रतिपदेला) येतो. (इंडोनेशियात रमझानला रामादान म्हणतात)

Conditions apply ....

लेखक विशाल कुलकर्णी यांनी गुरुवार, 23/09/2010 15:46 या दिवशी प्रकाशित केले.
यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येइल... तेव्हा तेव्हा मी परत अवतार घेइन... तु सांगितलं होतंस रे कृष्णा... पण विसरलास ना....? conditions apply चा क्लॉज टाकायला...! विसरलास रे देवा... धर्माची तुझी व्याख्या सांगायला, आम्ही अडकलोय.. हिंदु-मुस्लीम अन शिख, इसाईच्या फसव्या चक्रव्युहात का नाही सांगितलीस तेव्हा...? व्याख्या .... मानवतेची .... तुला अभिप्रेत असलेल्या माणुसधर्माची...? विशाल कुलकर्णी
काव्यरस

मनस्वी

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 23/09/2010 14:46 या दिवशी प्रकाशित केले.
"आली साली रांड !" केतन 'किव्हाजच्या' दाराकडे बघत फाडकन म्हणाला आणी माझी मान पण आपसुकच दाराकडे वळली. दारातुन २४/२५ वर्षाची मुलगी सुहास्य वदनाने आत येत होती. अगदी अप्रतिम सौंदर्यवती वगैरे म्हणता येणार नाही पण आकर्षक नक्कीच होती मुख्य म्हणजे मस्त 'फॉर्म' राखुन होती. केत्या भाड्या, एखादी मुलगी जोवर सिंगल असते तोवर तुझ्यासाठी ती अप्सरा असते. एकदा ती दुसर्‍या कोणाला पटली किंवा तुला अप्राप्य आहे हे तुला कळले की तुझ्यासाठी ती लगेच वेश्या कॅटेगरीत मोडायला सुरुवात होते, नाही ? मी वैतागुन म्हणालो. "हाड बे ! तसले काही नाही. हि साली पोरगी 'तसलीच' आहे. रात्रीला ५०००/- घेते मोजुन. " "काय बोलतो ?