जग सारे सुंदर व्हावे?
जग सारे सुंदर व्हावे?
-----------------------------------------------------------------------------------------------
आज शाळेचा पहिला दिवस होता. अंजली खुशीत होती. तिला मुलं आवडायची. ती एसटीमध्ये बसली होती. बसायला जागा मिळाली तसे तिने डोळे मिटले. तिच्या डोळ्यांपुढे निधीचा चेहरा होता. निधी, तिची मुलगी. नुकताच पहिला वाढदिवस झालेली. नाजूक अन गुटगुटीत.
एसटी थांबली. ती शाळेत निघाली. स्टॅन्डपासून शाळा पंधरा- वीस मिनिटांच्या अंतरावर होती . ढग यायला लागलेले. पण पाऊस नव्हता.
छोटीशी शाळा. पुढे पटांगण असलेली .छान होती. आज फुललेली.
मिसळपाव