सायंकाळी तुताऱ्या वाजतील
सायंकाळी तुताऱ्या वाजतील, तोफा हि परवानगी असती तर उडवल्या असत्या, जोर जोरात उर बडवून मोठ्याल्या गर्जना करण्यात येतील कि पहा बाळासाहेबांची इच्छा पूर्ण केली वैगरे वगैरे..
चालत सुटलो तर शंका समाधान होऊन खरा धबधबा दिसेल या विचाराने महेश पुढे चालायला लागला. अव्याचा नाईलाज झाला. त्याला त्याची शंका सोडवेल असा कोणीच दिसेना. अर्थात त्याने काही फारसे बिघडणार नव्हते. अव्याला दिवसभरात पुन्हा एखादी नवी न सुटणारी शंका सुचेल आणि ती कोणीतरी सोडवेल याची खात्री होती.धबधबा दिसणार या विचारानेच सगळे पुन्हा ताजेतवाने झाले. गेलेला चा दम परत आला . मलूल झालेल्या फुग्यात पुन्हा हवा भरल्यावर दिसावा तसे आमचे चेहरे पुन्हा चमकू लागले.