अर्ज है की..
मी एक अर्ज भरत होते. तो इतका किचकट होता की,तो भरता भरता माझी दमछाक होत होती. संपूर्ण नाव, पत्ता-घरचा, पत्ता-ऑफीसचा, तात्पुरता, कायमचा.
मग फोन नंबर. घरचा, ऑफीसचा, लँडलाईन, मोबाईल. मग पतीचे संपूर्ण नाव,ऑबलिक/पित्याचे संपूर्ण नाव. आईचे माहेरचे, सासरचे संपूर्ण नाव. आधार नंबर, पॅन नंबर.. मसणं नि माती. सतराशे साठ चौकशा. हा अर्ज फाडून टाकून, पेन फेकून देऊन, बाणेदारपणे घरी निघून जावं आणि मस्तपैकी एसी लावून झोपून जावं असा विचार मनात आला. पण तसं करणं शक्य नव्हतं. अर्ज भरणं भाग होतं. त्यात माझाच फायदा होता.
असं नेहमीच होतं.अर्जाचा फॉर्म भरायचा मला नेहमीच कंटाळा येतो. बँकेत जा, अर्ज.
मिसळपाव