दोसतार - २८
मागील दुवा : http://misalpav.com/node/45780
या
प्रश्नावर घाटे सरांना बाउन्सर च्या अपेक्षेने पुढे आलेल्या बॅट्स्मनला एकदम सरपटी बॉल यावा तसे झाले असेल. टंप्याच्या त्या शंकेने सरांचीच काय पण वर्गातल्या सगळ्यांचीच विकेट घेतली होती. तास संपल्याची घंटा झाली . घाटे सरांची सुटका झाली. त्या दिवशी शाळा सुटताना टम्प्याची शंका सगळ्यांच्या घरी गेली.घरी जाताना कोपर्यावर शितल्या आणि आळीतली आणखी दोनतीन जण, सायकलवर बांबू घेऊन आलेल्याला काहीतरी सांगत होते. कसला तरी मांडव घालायचे चालले होते. काहीतरी चालले होते.
मिसळपाव