शेजाऱ्याचा डामाडुमा - भारत आणि सख्खा शेजारी मालदीव - भाग १
प्रस्तावना:
माझ्या 'शेजाऱ्याचा डामाडुमा' (http://www.misalpav.com/node/38362) ह्या मालिकेतील नेपाळबद्दलची लेखमाला मिपावर बऱ्याच लोकांनी वाचली. काहींनी इथेच लेखांवर उत्साहवर्धक प्रतिक्रिया देऊन तर काहींनी व्यक्तिगत संदेश पाठवून लेखन आवडल्याचे सांगितले. इथे वाचून काहींनीं अन्य माध्यमांमध्ये लिहाल का अशी विचारणा केली. बरे वाटले, आनंद झाला.
यथावकाश पुढचा देश कोणता, पुढे कधी लिहिणार अशी प्रेमळ दटावणीही झाली. आज -उद्या करता करता बरेच दिवस झाले, लेखन काही पुढे सरकत नव्हते.
मिसळपाव
पुण्यातील ट्रेकींग क्षेत्रात अग्रगण्य असणाऱ्या 'पुणे व्हेंचरर्स' या संस्थेचा आणि माझा घरोबा तसा जुनाच. माझा या संस्थेशी संबंध येण्यापूर्वीही मी ट्रेकींग करीत असे पण पुणे व्हेंचरर्सच्या गोतावळ्यात दाखल झालो आणि ट्रेकींग करण्याची एक नवीन दिशा मिळाली. म्हणतात ना की गुरू मिळाल्याखेरीज तुमचं जीवन समृद्धच होत नाही त्याचप्रमाणं इथं आल्यावर मला देखील अनेक गुरू मिळाले.