ऐसपैस अंगण
अंगण म्हणजे घराचंच एक अंग जे घराबाहेर असूनही घराइतकंच जिव्हाळ्याचं असत. ऊन, पाऊस, दव झेलत आकाशाच्या प्रेमात पडलेलं असत. प्राजक्ताच्या सड्याच्या सुगंधी रांगोळीने ते बहरलेलं असत, रातराणीच्या सुगंधाने दरवळलेलं असत, गार गार वार्याच्या झुळूकेने शहारलेलं असत, कधी चंद्रदीपात तेवत असत तर कधी चांदण्यांचं शीतल पांघरूण घेऊन शांत पहुडलेलं असत.
हल्ली वाढत चाललेल्या बिल्डिंगमुळे अंगणं लोप पावत चालली आहेत व आधुनिक घर/बंगल्यांच्या रचनेतील अंगणांचे स्वरूप बदलले आहे. आमच्या उरणमध्ये अजून काही पारंपरिक तर काही बदलत्या स्वरूपातली अंगण संस्कृती कुठे कुठे जपली आहे ह्याच समाधान वाटत.
मिसळपाव
तु नि:शंकपणे गगनात भरारी घे पिल्ला. घाबरू नकोस, आम्ही तुझ्या पाठीशी आहोत.....