Welcome to misalpav.com

प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी

लेखक: श्रीकृष्ण सामंत | प्रसिद्ध:
प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं प्रीतीच्या मार्गी भिंत आणणार्यानो कुणी सांगेल कां ही भिंत दूर करूं कशी नैराशेत जखडलेली गीतें असती अनेक मनाचे गीत-वाद्द तुटतां गीत गाऊं कसे नैराशेचा बोझ असेना, पेलता येतो जीवनच बोझ असता,पेलवूं कसा प्रीतीची परंपरा आचरणात आणू कशी चारी बाजू वणवा असतां अंगवसत्र न जळूं देता सांभाळू तरी कसं


लाख म्हणू देत जगाला, ही संगत अटळ आहे

लेखक: श्रीकृष्ण सामंत | प्रसिद्ध:

तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत
मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत
तूझ्या माझ्या मनाचा निर्णय होता भेटण्याचा
जसे बगीच्यात बहार असतां फुलांचा बहरण्याचा

तुझे दू:ख आता माझे,माझे दू:ख झाले तुझे
तुझे हे दोन नेत्र, चंद्र सूर्यासम झाले माझे
लाख म्हणूदेत जगाला,ही संगत अटळ आहे
हातात हात असल्याने, हे हात सुटणे अटळ आहे

अरे, मला जीवनसाथ देणाऱ्या, प्रियतमा
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत
मार्ग कुठेही नेत असो, विचार संगतीचे आहेत
तुझी माझी स्वप्नं आता एका वर्णाची आहेत