Welcome to misalpav.com

पर्यावरणाचे भान

लेखक: आयुर्हित | प्रसिद्ध:
५ जून म्हणजे पर्यावरण दिवस या निमित्ताने पर्यावरणाचे भान सर्व जबाबदार नागरीक जमेल तशी पर्यावरणाची काळजी घेत आहेतच परंतू त्याला एक चळवळ बनवून सर्व नागरीकांना पर्यावरणाचे भान असेल इतपत सुजाण करणे ही सूद्दा आपली सर्व मिपाकारांचीच जबाबदारी आहे. मला माझे जूने दिवस आठवतात व अजुनही मला या विषयावर खूप काही नवीन करावेसे वाटते ते असे.....


किस्से लाईव्ह चे...१

लेखक: माधुरी विनायक | प्रसिद्ध:
हा किस्सा रेडियोवरच्या प्रसारणातला. खरं तर प्रसारण, मग ते थेट असो की मुद्रित, दोन्ही प्रकारांमध्ये सतत नवनवे किस्से घडतंच असतात. असाच एक किस्सा... नेहमीप्रमाणे थेट बातमीपत्रासाठी बातम्या काढणं, तयार करणं, टाईप झालेल्या बातम्या वाचून दुरूस्त करून घेणं अशी लगबग सुरू होती. बातमीपत्र तयार झालं आणि नेहमीप्रमाणे वरीष्ठांना सांगुन मी स्टुडियोमध्ये जायला निघाले. प्रसारणाच्या साधारण पाच मिनिटं आधी मी स्टुडियोमध्ये पोहोचले. सिग्नेचर ट्यून (बातम्या सुरू होण्यापूर्वीचं संगीत), माईक तपासणी असे नित्य सोपस्कार पार पडले आणि मी शांतपणे प्रसारणाच्या वेळेची वाट पाहू लागले. अचानक... मला उचकी लागली. एक...दोन...


पंचविशी - तिआनमेनच्या उद्रेकास्ताची

लेखक: विकास | प्रसिद्ध:
१९८९ साल हे कम्युनिझम/साम्यवादासाठी निर्णायक नसेल कदाचीत पण महत्वाची कलाटणी देणारे वर्ष होते. त्या आधी एक दोन वर्षे तत्कालीन सोव्हीएट राष्ट्राध्यक्ष गोर्बाचेव्ह यांनी पेरीस्त्रॉईका (सामाजीक पुर्नबांधणी) आणी ग्लास्तनोस्त (सामाजीक स्वांतत्र्य/मोकळेपणा) हे शब्द प्रचलात आणले होते आणि हळूहळू रशियाची आर्थिक आणि राजकीय घडण बदलण्यास सुरवात केली होती. पोलंड, हंगेरी, पूर्व जर्मनी, झेकोस्लोव्हाकीया, बल्गेरीया आणि रोमानिया हे देश सोव्हिएट मगरमिठीतून या वर्षी सुटले. असाच प्रयत्न अजून एका ठिकाणी झाला तो म्हणजे माओच्या कम्युनिस्ट चीनच्या तिआनमेन चौकात.


बेडसे लेणी...पुन्हा एकदा(?)

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
वरती शीर्षकात एकदाच्या पुढे प्रश्नचिन्ह टाकलं खरं! पण त्यातल्या अर्थ प्रतीतीचं काम,त्याच्या अधीच्या शब्दानीच चोख बजावलेलं आहे.

पुन्हा..........

हा तो शब्द! हा शब्दच माझं त्या वास्तु-विषयीचं सारं आकर्षण दाखवून देतो. पुन्हा..,पुनःपुन्हा..,नेहमी..,कायम..,शेवटच्या श्वासापर्यंत..,असे वेगवेगळे भाव आणि अर्थ व्यक्त करणारे हे सर्व शब्द बेड्श्यासारख्या वास्तु/कलाकृतींच्या बाबतीत माझ्या ठायी अतिशय एकरूप होऊन जातात.


विमान ,रेल्वे ,बस इत्यादीने प्रवास

लेखक: कंजूस | प्रसिद्ध:
विमान ,रेल्वे ,बस ,टैक्सी यासंबंधी बरे वाईट अनुभव आठवणी आणि बातम्यांसाठी वेगवेगळा अथवा एकत्रित धागा आहे का ?तो असावा असं मला वाटतं . रेल्वे :- या आठवड्यात रेल्वेने त्यांचे जे अधिकृत तिकीट एजंट (RTSA)होते त्यांचे लायसन्स अचानक रद्द केले .देशभरांत जवळपास असे पंधराशे जण होते .त्यांची नावे आणि पत्ते टाईमटेबलमध्ये छापलेले असतात . एकतर यांचा धंदा बुडालाच शिवाय जे लोक रेजर्वेशन सेंटर्सपासून दूर राहतात ,ज्याना येथे वेळेत येता येत नाही ,अथवा असमर्थ आहेत त्यांची पण एक सोय गेली .


कै. व्यंकटेश माडगुळकारांना साहित्यिक आदरांजली. भाग 1

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:

28 ऑगस्ट या कै. व्यंकटेश माडगुळकारांच्या पुण्यतिथीच्या दिवशी त्यांना साहित्यिक आदरांजली.

लोणी गावातील सांप्रत (ऑगस्ट २००९ मधील) परिस्थितीचा वृतांत (पुनर्संपादित 27 मे 2014)भाग 1

संकलक - विंग कमांडर शशिकांत ओक

काही काळापुर्वी माझ्या हाती 'चित्रे आणि चरित्रे' या नावाचे कै. व्यंकटेश माडगुळकरांचे पुस्तक हाती आले. (उत्कर्ष प्रकाशन पुणे.


रस्त्यांवरील अपघात आणि वाहन संस्कृती

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
गोपिनाथ मुंडे यांचे काल सकाळी रस्यावरील अपघातात दुख्खःद निधन झाले. भारतभरात रोज दररोज शेकडो अपघात होतात. गोपिनाथ मुंडेंसारखा जाणता नेता काळा आड होतो तेव्हा देशाची मह्त्वपूर्ण हानी होते तेव्हा आपण हळहळतो आणि आपापल्या दिनक्रमास लागतो. गोपिनाथ मुंडे यांच्या अपघातात दोन पैकी एक किंवा दोन्ही वाहनचालकांची त्रुटी (अथवा चूक) असू शकते त्या बद्दल दिल्ली पोलीस तपास करेलच. पण या निमीत्ताने तरी सर्वच भारतीयांनी आपली वाहन चालवण्याची संस्कृती तपासून पहावयास हवी असे वाटते. बर्‍याच जणांना स्वतःच्या भरधाव आणि बेदरकार वाहनचालवण्याचे मोठे कौतुक असते त्यांच्या लेखी सांभाळून वाहनचालवणारे वेडे असतात.


महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं !

लेखक: आशु जोग | प्रसिद्ध:
राजसाहेब ठाकरे हे महाराष्ट्राला पडलेलं एक कोडं आहे ! राजसाहेब ठाकरे यांचे राजकारणात उतरण्याचे ध्येय काय ! त्यांना खरच महाराष्ट्रातील वजनदार नेत्याचा आशीर्वाद आहे का... राज यांच्या नवनिर्माणाच्या नेमक्या कल्पना काय आहेत. शिवसेनेपेक्षा काही वेगळेपण मनसेमधे आहे का ! माझ्या शिवाय सरकार बनू शकणार नाही असे ते का म्हणतात. ज्या महानगरपालिका, नगरपालिकेमधे त्यांची सत्ता आहे तिथे कारभार कसा चालतो... गुंडाना, खंडणीस्वारांना किंवा त्यांच्या पत्नीला ते उमेदवारी देतात का ? तशी दिल्यास सुशासन आणण्यावर त्यांचा विश्वास आहे असे मानायचे का....


तिचे अभंग…।

लेखक: वटवट | प्रसिद्ध:
तिचे अभंग…। आयुष्याची जेंव्हा, होते उजळणी, तिच्या आठवणी, खंडीभर..! तीच तीच असे, निळ्या ह्या आकाशी, स्पंदने उराशी, तिचीच रे..! कसे तिचे असे, मधाळ बोलणे, मिठाने चोळणे, जखमांना..! उगाच एवढी, केली उठाठेव, तिच्या डोळी देव, दिसायचा..! काय काय सांगू, काय रे व्हायचे, मोर नाचायचे, ग्रीष्मातही..! ऋतुन्नी केवढा, मांडला गोंधळ, पदरात जाळ, श्रावणाच्या..! इवल्याश्या देही, किती उलाढाल, तिच्या लेखी झालं, काही नाही..! ह्याचीही तक्रार, कधी मी ना केली, झोळी हि भरली, आठवांनी..! अशात नेहमी, हवे ते ना घडे, अश्रुंचेच सडे, जागोजागी..! नको ते घडले, इथेही नेमके, चांदण-चटके, काळजाला..! शेवटची भेट, काळजाला पेट,