व्यवहारज्ञान (२)
- Read more about व्यवहारज्ञान (२)
- 3 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 2764 views
मि. ऱ्होडस ची नाराजी बहुदा मि. पथेरिकच्या नजरेस आली नसावी, अथवा त्याने जाणून बुजून तिकडे दुर्लक्ष केले असावे. ते पुढे सांगत होते,
"असं बघा मिस. मार्पल.. बर्नचेस्टरच्या डिस्ट्रिक्ट ज्यूरीने हा खून कोणी एक किंवा अनेक अनोळखी व्यक्तींनी केल्याचे सांगून त्यांनुसार चौकशी करण्याचे आदेश दिले असले, तरी पोलीसांच्या दृष्टीने प्रमुख संशयित हा मि. ऱ्होडसच आहे. त्यामुळे त्याला काळजी वाटते आहे की कोणत्याही क्षणी त्याला अटक होईल. त्याच्यासाठी एक - सर माल्कम ओल्ड यांना केस देण्यात आली आहे. ते अशा प्रकारच्या केसेस चे तज्ञ समजले जातात.