Welcome to misalpav.com

आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं?

लेखक: सार्थबोध | प्रसिद्ध:
आई-बाप; आई-बाप, म्हणजे नक्की काय असतं? आयुष्य जगण्यासाठी; देवाने दिलेलं, अॅडव्हान्स पाठबळ असतं तुमच्या प्रत्येक दिवसात, त्यांनी आपलं स्वप्न पाहिलेलं असतं तुमच्या जन्मापासून; त्यांच्या मरणापर्यंत, त्यांनी आपल आयुष्य खर्चलेल असतं आई; तुमच्या आयुष्याच्या, गाडीच; योग्य दिशा देणार स्टीअरींग असतं अचानक आलेल्या संकटात सावरायला, बाप म्हणजे “अर्जंट ब्रेक” चा पर्याय असतं आईच प्रेम हे; रोजच्या आयुष्यात, कामाला येणार बँक बॅलन्स असतं बाप म्हणजे; गरजेच्या वेळी मिळणारा, तुमचा बोनस किंवा वेरीएबल पेमेंट असतं आई म्हणजे; तुम्हाला सतत जोडणार, मोबाईलच नेटवर्क असतं कधी नेटवर्क थकले; तर बाप, अर्जंट “


विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी

लेखक: drsunilahirrao | प्रसिद्ध:
तुझ्या न्यायालयी आता पुन्हा मी हारलो दावा पुरेसा धूर्त मी नाही, कुठे जमला मला कावा राज्ये ,तुझी सत्ता, तुझे हे कायदे सारे अता माझ्याविरोधी तू हवा तो फैसला द्यावा तुझ्या नावात रे दडला किती संहार हा देवा अता सारे मवाली हे तुझा बघ बोलती धावा ! जणू की उंट हे सगळे पटावर खेळती युद्धे कुणी येथे सरळ नाही, कुणी उजवा कुणी डावा ! विखुरल्या वेदना येथे सुगंधासारख्या राणी.. फुलांचा जन्म हा अवघा अता तू वेचुनी न्यावा प्रतीक्षेतुन या सार्या युगे आली युगे गेली तुझी वचने, तुझ्या शपथा : भरवसा काय सांगावा डॉ.सुनील अहिरराव


तू

लेखक: चाणक्य | प्रसिद्ध:
कधी तुझी याद....संधीप्रकाशात आणि मग खळबळ....कुठेतरी आत चिंब जणू तू....चिंब पावसात ओला ओला शहारा....चिंब शरीरात उरी काहिली काहिली....जरी चांदरात होई काळीज निखारा....तुझ्या विरहात मन पाखरू पाखरू....फडफडे पिंज-यात आणि पिंज-याची चावी....जगाच्या हातात कधी मेघ दाटू येता....काळ्या आकाशात तुझी चाहूल चाहूल....मातीच्या वासात कधी तुझा वारा....भरे माझिया शिडांत कधी माझी लाट....नेई तुला सागरात दूर देशी तू....तरीही मनात ठायी ठायी तूच....मन-देश अंतरात


एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ४

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
टँगची पुढची टॉर्पेडो रूम अर्धवर्तुळाकार होती. नौसेनीक मॉमसेन लंग्ज चढवत असतानाच पॉल लार्सन आपल्या जखमी सहका-यांवर उपचार करण्यात मग्न होता. सुदैवाने टॉर्पेडो रुममध्ये त्याला जास्तीचं मेडीकल किट सापडलं होतं. पाणबुडीतील हवा झपाट्याने दुषीत होत होती. दृष्यमानताही काही फूट अंतरापर्यंतच उरली होती. बॅट-यांमध्ये हळूहळू पाणी झिरपू लागलं होतं. इमर्जन्सी दिवेही मध्येच बंद पडू लागले होते. लेफ्टनंट मेल एनॉसच्या डोक्यात एक वेगळीच कल्पना चमकली. कंट्रोल रूममध्ये पाणबुडीच्या तोफेकडे जाणारी हॅच उघडता आली तर बाहेर पडणं शक्यं होतं.


कोकिळ कुहू कुहू बोले...

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
कोकिळ कुहू कुहू बोले... कोकिळाचा फक्त आवाज मंजूळ असून चालत नाही. त्याचे अन्य वर्तन तसेच लाघवी व हवे हवेसे वाटावे असे असले तर त्या कूजनला दाद मिळते. 2 निसर्गतः काही वैशिष्ठ्ये प्रत्येकाला मिळालेली आहेत. त्यात कोकिळा आपली अंडी इतर पक्षांच्या खोप्यात सोडून ती वाढवण्याची जबाबदारी परस्पर सोपवण्याच्या कृतीतून अगोचरपणाची झाक दिसते. मित्रांनो, सोबतच्या या चित्र फितीतून जीवन संघर्ष प्रवृत्ती जन्मजात कशी असते याचे उदाहरण डकवले आहे.


आडनावाच्या आडून...

लेखक: मार्मिक गोडसे | प्रसिद्ध:
शाळेचा पहिला दिवस. ५ वी चा वर्ग. वर्गशिक्षिका जोशीबाई. वर्गाची 'ओळखपरेड' चालू होती.एक-एक विद्यार्थी उभे राहून आपली ओळख करून देत होता.मी उभा राहीलो (उंची कमी असल्यामुळे उभा आहे का बसलेला आहे ह्यात विशेष फरक पडत नव्हता व बाकहि उंच होते.) मीही माझी ओळख करून दिली. सगळ्या वर्गाची ओळखपरेड पूर्ण झाल्यावर बाईंनी माझ्याकडे बघितले व म्हणाल्या 'गोडसे' माझ्यासमोरील पहिल्या बाकावर बस. पुढून तिसर्या बाकावरून थेट मी पहील्या बाकावर आलो. पहिल्या बाकावरचा हुशार शिंदे तिसर्या बाकावर फेकला गेला. सापशिडीचा खेळ म्हणावा तर मी कोणतेही फासे टाकले नव्ह्ते. उंचिचे म्हणावे तर तोही माझ्याइतकाच उंचीचा होता.


खालील मराठी वाक्यातील व्याकरण विषयक त्रुटी सांगा आणि सुधारणा सुचवा

लेखक: माहितगार | प्रसिद्ध:
खाली काही मराठी लिहिण्याचा प्रयास झालेली साधी वाक्ये आहेत. त्यात सुधारणा सुचवून हव्या आहेत पण मुख्य म्हणजे मराठी व्याकरणाच्या अंगाने विश्लेषण करून हवे आहे. १) पल्लवी जोशी एका भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाहिनी मध्ये काम करणारी अभिनेत्री आहेत । २) विल्यम Drummond (13 डिसेंबर इ.स. 1585 - 4 डिसेंबर इ.स. 1649) "Hawthornden " नावाचे,, एक द स्कॉटिश कवी होता. ३) हेन्री Wadsworth Longfellow (फेब्रुवारी 27, इ.स. 1807 - मार्च 24, इ.स. 1882) हे एक अमेरिकन शिक्षक आणि कवी होता. ४) सॅम्युएल बटलर (फेब्रुवारी इ.स.


दुधी - सोडे (ड्राय प्रॉन्स) रस्सा

लेखक: दिपक.कुवेत | प्रसिद्ध:
सोडे (ड्राय प्रॉन्स): Sode रस्सा: Rassa साहित्यः १. दुधी - १/२ कि. २. सोडे - १ वाटि ३. कांदा उभा चीरुन - १ मध्यम ४. ओलं खोबरं - १/२ वाटि ५. लसुण पाकळ्या - ४ ६. आख्खे धणे - १ चमचा ७. जीरं - १/२ चमचा ८. सुख्या लाल मिरच्या - २ ९. हळद - १/२ चमचा १०. मसाला - २ चमचे (टिप नं १ बघा) ११. तेल १२.


एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
टँगमधून निघालेला शेवटचा चोवीसावा टॉर्पेडॉ परत फिरला होता आणि आता भस्मासुराप्रमाणे टँगच्याच दिशेने झेपावत होता ! काहीतरी भयानक घोटाळा झाला होता. टॉर्पेडोचं रडार जाम झालं असावं किंवा त्याच्या दिशादर्शक यंत्रणेत असलेला गायरोस्कोप बिघडला असावा. काहीही असलं तरी त्याच्या तडाख्यातून पाणबुडी वाचवणं हे आद्य कर्तव्य होतं ! " इमर्जन्सी स्पीड !" ओ'केनने आज्ञा सोडली, " ऑल अहेड इमर्जन्सी ! राईट फुल रडार ! पाणबुडी वळवा ! पूर्ण वळवा !" इंजीनरुम मध्ये चीफ इलेक्ट्रीशियन जेम्स कल्प पाणबुडी वळ्वण्यासाठी लागणारी आवश्यक विद्युत शक्ती पुरवण्याचा आकांती प्रयत्न करु लागला !


डॉ. बाबासाहेब आंबेडकर

लेखक: सचिन७३८ | प्रसिद्ध:
भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची आज जयंती. त्यांना विनम्र अभिवादन आणि कोटी-कोटी प्रणाम. जय भीम !!! उध्दरली कोटी कुळे । भीमा तुझ्या जन्मामुळे ।। Babasaheb