युरोपांश - स्विट्झर्लंड
- Read more about युरोपांश - स्विट्झर्लंड
- 41 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 12892 views
तीन दिवस पॅरीस मध्ये येता-जाता आयफेल टॉवर नजरेस पडत होता. आज पॅरीस सोडताना सारखी त्याची बिचार्याची आठवण येत होती. पण थांबणं शक्य नव्हतं. आता स्विट्झर्लंड बोलावत होतं.
पॅरीसच्या गॅरे दे लिऑन रेल्वे स्टेशनावरून प्रवास सुरु होणार होता. युरेल पास कार्यांन्वित करावयाचा होता. युरोपातील सर्वच मुख्य स्थानकं एखाद्या ऐतिहासिक वास्तूप्रमाणे भव्य आणि दिव्य आहेत. स्थानकावरील स्वच्छ्ता, प्रवाशांच्या सेवा सुविधा आणि मुख्य म्हणजे दिशादर्शक पाट्या वाखाणण्याजोग्या आहेत. हल्ली बरेच दिवसांत बोरिबंदर स्थानकावर जाण्याचा प्रसंग आला नाही पण लहानपणी पाहिलेले बोरीबंदर स्थानक आठवते.