Welcome to misalpav.com

केलं की नाही?

लेखक: साती | प्रसिद्ध:
सध्या एक एक टप्प्यात निवडणू़का आटपत आहेत. राजकारणावर आणि राजकारण्यांवर बोलताना न थकणारे आपण मतदान हक्क मात्र बजावतो का ? या धाग्यावर तुमच्या भागातील मतदानाची तारीख, तुम्ही मतदान केले का, नसल्यास का नाही, असल्यास किती वेळ लागला इ. माहिती लिहिणे अपेक्षित आहे. बघुया कोण किती जबाबदारीने वागतंय ते! आपले मत आपले भविष्य... ढॅण ट डॅण!


मॅटरहॉर्न

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
आल्प्स ! सुमारे १२०० किलोमीटर पसरलेल्या आल्प्स पर्वतराजीला युरोपात अनन्यसाधारण महत्व आहे. युरोपातील अनेक देशांतील नैसर्गीक सौंदर्याला ब-याच अंशी कारणीभूत असलेला आल्प्स हा गिर्यारोहकांच्या दृष्टीने आकर्षणाचा विषय नसला तरच नवल. पूर्वेला ऑस्ट्रीया आणि स्लोवानिया, पश्चिमेला फ्रान्स, जर्मनी, स्वित्झर्लंड आणि लिचेन्स्टाईन आणि दक्षिणेला इटली आणि मोनॅको या देशांमध्ये पसरलेला आल्प्स पर्वतात अनेक मनोहर सौंदर्यस्थळं आहेत तशीच आव्हानात्मक गिरीशिखरंही. आशिया खंडात जे हिमालयाचं स्थान तेच युरोपात आल्प्सचं ! आल्प्सच्या पश्चिम भागातील पर्वतरांग पेनीन आल्प्स म्हणून ओळखली जाते.


बीट सार

लेखक: अनन्न्या | प्रसिद्ध:
साहित्यः दोन मध्यम बीट, एका नारळाचे खोबरे, एक चमचा आमचूर, चार-पाच चमचे साखर, मीठ, दोन चमचे तूप, जीरे, हिंग, सात-आठ लसूण पाकळ्या बारीक करून, लाल तिखट चवीनुसार, कढीलिंबाची पाच-सहा पाने. कृती: बीट कुकरला शिजवून घ्या. सालं काढून बीट्चे तुकडे करून मिक्सरला गुळगुळीत वाटून घ्या. नारळाचे दूध काढून वाटलेल्या बीटमध्ये मिसळा. मीठ, साखर, आमचुर, तिखट चवीनुसार मिसळा. बारीक केलेली लसूण मिसळा. गरजे नुसार पाणी घाला. कढीलिंबाची पाने धुऊन थोडी कुस्करून मिश्रणात टाका. तुपाची जीरे, हिंग घालून खमंग फोडणी करा आणि साराला द्या.


नावात काय आहे? किंवा नावातच सगळे आहे.

लेखक: स न वि वि | प्रसिद्ध:
लग्नानंतर काय काय बदलते ? घर, नाव, आडनाव, चाली-रिती , नाती-गोती, अगदी खाण्या-पिण्याच्या पद्धती सुद्धा … बघायला गेलो तर बरच काही …. गेल्या आठवड्यात ऑफिस ला जात असताना बस मध्ये दोन मुली (कदाचित त्यातील एकीच लग्न-बिग्न ठरले असावे,आणि दुसरी तिला ज्ञानामृत देत असावी- ज्याचा अनुभव तिला असेल कि नाही कुणास ठाऊक ) काही तत्सम बाबींवर चर्चा करत होत्या. त्यातील रंगलेली चर्चा तर फक्त ' लग्ना नंतर नाव बदलावे कि नाही' हीच होती. असे म्हणतात कि मुलाचे नाव राशी वरून ठेवत नाही कारण लग्न नंतर नाव बदलतच.


एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ५ ( अंतिम )

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - १ http://misalpav.com/node/27564 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - २ http://www.misalpav.com/node/27574 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ३ http://www.misalpav.com/node/27582 एस्केप फ्रॉम डाऊन अंडर - ४ http://misalpav.com/node/27588 **************************************** एस्केप फ्रॉम डाऊन अंडर ही लेखमाला आज संपली. ही लेखमाला प्रकाशीत करु दिल्याबद्दल मिसळपाव प्रशासनाचा मी मनापासून आभारी आहे. दुस-या महायुध्दात अनेक साहसगाथा गाजल्या.


ब्रूक्स-भगत रिपोर्ट- १९६२ चे चीन-भारत युध्ध

लेखक: संतोषएकांडे | प्रसिद्ध:
ऑक्टोबर १९६२ साली चीनच्या युध्धात खरा॑ब रीत्या पराजित झाल्या नंतर भारताच्या संरक्षण खात्याने पराजयाच्या कारणांची तपास करण्यासाठी एक विस्तृत रिपोर्ट तैयार करायचं ठरवलं. १९६२ च्या जालंधरच्या ११व्या कॉरच्या कमांडींग ऑफीसर लेफ्टनन्ट-जनरल हेन्डरसन ब्रूक्सला हे काम सोपवीण्यात आलं. त्याने ब्रिगेडीयर पी.एस. भगत यांच्या सहयोगाने विश्लेषणात्मक रिपोर्ट तैयार करून जुलाइ १९६३ला संरक्षण खात्याला सुप्रत केला. ब्रूक्स-भगत रिपोर्ट तत्कालिन सरकारची झोप उडवीणारा होता. युध्धासाठी भारताच्या अपूरत्या तैयारीचे असंख्य दृष्टांत त्यात होते.


वैतागवाडी मॅनेजमेन्ट

लेखक: शुचि | प्रसिद्ध:
ऑफिसमधील काही डोक्यात जाणार्‍या गोष्टी - (१) Yup/Nope dudes. औपचारीक इमेल मध्ये सुद्धा Yup/Nope" शब्दांची पखरण करणारे महाभाग. (२) अजून एक प्रकार म्हणजे जे माहीत आहे तेच घोळवून सांगत, माहीतीपूर्ण असण्याचा आव आणणारे सहकारी. प्रकल्प पुढे न्यायला, नव्या मुद्द्यांवर चर्चा करण्याऐवजी, जे स्वतःला माहीत आहे तेच घोळवत बसणारे अन मांडत रहाणारे. (३) "बड्डे" हा एक वैतागवाणा प्रकार. दर महीन्याला, आमच्याकडे ३-४ "बड्डे ग्रीटींग्स" वर शुभेच्छा लिहाव्या लागतात. कोणाचं कोणी गचकलं तर "शोकसंदेश" ची कार्डे. काल तर कमाल झाली, एकीचा कुत्रा गचकला तर ते कार्ड "शोकसंदेशाकरता" आलं.


नेदरलँड्स - Keukenhof / क्युकेनहॉफ

लेखक: सानिकास्वप्निल | प्रसिद्ध:
ये कहाँ आ गये हम, यूं ही साथ साथ चलते....ह्या गाण्यात ट्युलिप्सचा बहर बघून आपल्या ही कधीतरी असा बहर बघायला मिळाला पाहीजे असे वाटून गेले होते. पहिल्या नेदरलँड ट्रीपमध्ये ऑगस्टमध्ये गेलो असल्यामुळे हा बहर बघता आला नाही म्हणून रूखरुख लागली होती. साधारण स्प्रिंग सुरु झाला की दोन महिने हा बहर Keukenhof / क्युकेनहॉफमध्ये बघायाला मिळतो. ह्यावेळेस अगदी पक्कं ठरवले की जायचेच आणी लगेच झुतरमिअरस्थित मित्राला फोन केला आणी ट्युलिप्स गार्ड्न कधी उघडते हे विचारुन घेतले. २० मार्च ते १८ मे २०१४ पर्यंत ट्युलिप्सचा बहर सगळ्यांना बघता येईल असे तो म्हणाला.


माहिती हवी आहे-.........सहकारी सोसायटी.

लेखक: चौकटराजा | प्रसिद्ध:
खालील विषयांवर निश्चित अशी माहिती कुणाकडे असल्यास हवी आहे. सहसा बिल्डर गाळा धारकाना पार्किंग वाटून देतो. यात स्टिल्ट खाली पार्किंग हवे असेल तर काही पैसे आपल्या करारात न दाखवता रोखीने घेतो. नंतर काही काळाने इमारतीचे खरेदी खत करून सहकारी गृहरचना संस्था स्थापन केली जाते. काही कालाने दुचाक्यांची संस्ख्या वाढते .अशी वेळ आल्यास चारचाकी बाहेर हकलण्याचे दडपण जनरल बॉडीचा ठराव करून किंवा अनधिकृत्त पणे धमकी वगैरे देऊन आणण्यात येते. अशा स्थितीत बिल्डरने केलेले वाटप वा जनरल बॉडीने केलेला ठराव यात कायदेशीरित्या महत्ता कोणाची.(who supercedes whom ?


हत्ती गेला आणि शेपूट राह्यलं...

लेखक: माधुरी विनायक | प्रसिद्ध:
पूर्वा म्हणजे धमाल मस्ती, पूर्वा म्हणजे अखंड बडबड आणि चैतन्याचा धबधबा... पूर्वा म्हणजे आमचं एकुलतं एक कन्यारत्न. वय वर्ष साडेचार. तिला नाचायला आवडतं, गायला आवडतं. आई-बाबा जेवायला बसले की त्यांना जेवण वाढायला आवडतं, फोटोसाठी वेगवेगळ्या पोझेस द्यायला आवडतं... ही ‘आवडतं’ प्रकारातली यादी खूप मोठी लांबलचक आहे. त्यामुळे त्याविषयी अधनं-मधन बोलत राहूच. तर अशी ही आमची कन्या बोलतेही भरपूर आणि अनेकदा अगदी सहज आमची विकेटही काढते. परवा असेच आम्ही बाईकवरून चाललो होतो. मुलुंड ते शिवडी असा प्रवास. तिच्यासाठी तो सुद्धा तसा जास्तच.