Welcome to misalpav.com

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - १० (अंतिम)

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
के-२ : द सॅव्हेज माऊंटन ही लेखमाला आज संपली. ही लेखमाला प्रकाशीत करु दिल्याबद्दल मिस़ळपाव प्रशासनाचा मी मनापासून आभारी आहे. एव्हरेस्टच्या तुलनेत के २ हे चढाईसाठी कठीण आणि के २ वरील संदर्भग्रंथही तुलनेने ब-याच कमी प्रमाणात उपलब्ध आहेत. या लेखमालेच्या निमीत्ताने माझ्या संग्रहातील पुस्तके आणि इंटरनेटवरील लेख पुन्हा वाचण्याचा योग आला. ही लेखमाला आपल्याला कशी वाटली हे जरुर कळवा ********************************************************************************************* के २ च्या इतिहासात १९८६ आणि २००८ ही दोन वर्षे सर्वात घातकी म्हणून नोंदली गेली आहेत.


माझं मत कुणाला.....

लेखक: निलरंजन | प्रसिद्ध:
माझं मत त्याला रे ज्याने ईकास केला त्याला नाही ज्याने मला नुस्ताच झुलविला त्याला नाही ज्याने मला नुस्ता रडविला माझं मत त्याला रे ज्यानं मला घडविला माझ मत त्याला रे जो शोभलं त्या पदाला सगळीकडे त्याच्या नावाचा डंका मी पिटविला माझं मत त्याला रे माझं मत त्याला.... विडंबन: माझ आभाळ तुला घे(टिंग्या)


पुष्पांजली

लेखक: डॉ सुहास म्हात्रे | प्रसिद्ध:
घरच्या बागेतून आणलेली पुष्पांजली (श्रम आणि श्रेय घरच्यांचे, मी केवळ कॅमेर्‍याचे बटण दाबण्याचा धनी !


गुरुजिंचे भावं विश्व! भाग-१०

लेखक: अत्रुप्त आत्मा | प्रसिद्ध:
मागिल सर्व भागः- http://misalpav.com/node/25298 http://misalpav.com/node/25318 http://misalpav.com/node/25527 http://misalpav.com/node/25626 http://misalpav.com/node/26585 http://misalpav.com/node/26703 http://misalpav.com/node/26846 http://misalpav.com/node/26933 http://misalpav.com/node/27236 विवाहातल्या या सर्व सायंकालिन घडामोडींना,क्रिकेटच्याच रूपकात नाव द्यायचं तर पहिल्या (रन---रेट वाढवणार्‍या) पंधरा ओव्हर असच द्यावं लागेल.


रामजन्मोत्सव

लेखक: प्रसाद गोडबोले | प्रसिद्ध:

||श्रीरामसमर्थ ||

||जय जय रघुवीर समर्थ ||

आज रामनवमी :) रामनवमीच्या सर्व भाविकांना शुभेच्छा ! घरी नेहमी प्रमाणे रामजन्मोत्सवाचा कार्यक्रम झाला ...हा कार्यक्रम म्हणजे एक सोहळाच असतो ... अगदी गल्लीतले लोकही घरी उपस्थिती लावतात ... घरातीलच ७-८ पोरं त्यांचा कल्ला त्यातुन मग गल्लीतली ... दंगाच :) इतक्या आरत्या असतात तरीही कोणालाच कंटाळा येत नाही जो तो तल्लीन होवुन गात असतो ... ही आमच्या घरातील रामरायाची मुर्ती ( अंधारात फोटो घेताना चित्र थोडे ब्लर झाले :( असो) ही साक्षात रामदास स्वामींच्या नित्यपुजेतील एक मुर्ती आहे असे आजोबा सांगायचे .... शिवाय ह्या मुर्तीत आणि गडावरील मुर्तीत कमालीचे सार्धम्य आहे ( असे मला वाटते)
उत्कट साधुनि शिळा सेतू बांधोनी ।लिंगदेह-लंकापुरि विध्वंसूनी ॥ कामक्रोधादिक राक्षस मर्दूनी ।देह-अहंभाव रावण निवटोनी ॥ १ ॥ जय देव जय देव निजबोधा रामा । परमार्थे आरती सद्भावें आरती परिपूर्णकामा ॥ध्रु० ॥ प्रथम सीताशुद्धी हनुमंत गेला ।लंका दहन करुनी अखया मारिला ॥ मारिला जंबूमाळी बुवनीं त्राहाटीला । आनंदाची गुढी घेउनियां अला ॥ जय० ॥ २ ॥ निजबळें निजशक्ति सोडविली सीता ।म्हणुनी येणें झालें आयोध्यें रघुनाथा ॥ आनंदें वोसंडे वैराग्य भरता ।आरति घेउनि आली कौसल्या माता ॥ जय० ॥ ३ ॥ अनहत ध्वनि गर्जति अपार ।अठरा पद्मे वानर करिती भुभुःकार ॥ अयोध्येसी आले दशरथकुमार ।नगरीं होत आहे आनंद थोर ॥ जय० ॥ ४ ॥ सहज सिंहासनीं राजा रघुवीर ।सोSहंभावें तया पूजा उपचार । सहजांची आरती वाद्यांचा गजर ।माधवदासा स्वामी आठव ना विसर ॥ जय० ॥ ५ ॥
(पाठ आहे पण लिहिण्याचे कष्ट नको म्हणुन अंतर्जालावरुन साभार चोप्य पस्ते :) ) मुळात रामयण हे प्रतिकात्मक आहे असे लहान पणापासुन ऐकत आलो आहे , तदनुषंगाने एक लेखही वाचला होता खुप वर्षांपुर्वी ... पण आता ही आरती ऐकताना आता त्यातले थोडेफार कळते ...उमगते. श्रीराम हे आत्मा आहेत , सीतामाई महामाया , लक्ष्मण हे विवेकाचे प्रतिक , भरत शत्रुघ्न हे अनन्य भक्तीभावाचे प्रतिक ....तर मारुतीराया आपला मारुतीराया साधनेचे , उपासनेचे प्रतिक आहे (आणि म्हणुनच मारुतीरायाला इतके प्रचंड महत्व आहे स्वरुपसंप्रदायात !! अगदी प्रभु रामही म्हणतात "हे मारुतीराया , माझ्या पंचप्राणांनी तुझी आरती ओवाळली तरी तुझे उपकार फिटणार नाहीत !") ... लंका ही लिंगदेहाची प्रतिक आहे , सारे राक्षस हे काम क्रोधाधिक विकारांचे तर रावण हा साक्षात देहअहंभाव , देहबुध्दीचे प्रतिक ! हे असे घनघोर युध्द आहे ... आजही चालु आहे ! अनहत ध्वनी गर्जति अपार ... अठरा पद्मे वानर करती भुभु:कार ....अयोध्येसी आले दशरथ कुमार ....नगरी होत आहे आनंद थोर .... आपला देह ही अयोध्यापुरी , त्यात आता आत्मतत्वाची जाणीव आणि विवेकाचे आगमन झाले आहे , अनहतध्वनी (म्हणजे कोणताही आघात न करता उमटणारे ) उमटत आहेत... अंगावर अगणित रोमांच उभे राहिलेत ... आनंआचे डोही आनंद तरं अशी अवस्था झाली आहे ... सहज सिंहासनीं राजा रघुवीर | सोSहंभावें तया पूजा उपचार ||... सोSहंभावें...सोSहंभावें...... अहाहा !! दीपोत्सव
जय देव जय देव जय आत्मारामा । निगमागम शोधितां न कळे गुणसीमा ॥ ध्रु० ॥ नाना देही देव एक विराजे । नाना नाटक लीला सुंदर रूप साजे । नाना तीर्थी क्षेत्रीं अभिनव गति माजे । अगाध महिमा पिंडब्रह्मांडीं गाजे । जय देव० ॥ १ ॥ बहुरूपी बहुगुणी बहुतां काळांचा ।हरिहर ब्रह्मादिक देव सकळांचा ॥ युगानुयुगीं आत्मराम हा आमुचा । दास म्हणे महिमा न बोलवे वाचा । जय देव० ॥ २ ॥
आज रामनवमी ! रामदासस्वामींचीही जयंती !! त्यांनी लिहिलेल्या अनेक आरत्यां पैकी ही वरील आरती माझी सर्वात आवडती ! दोनच कडव्यात विषय कट !! दास म्हणे महिमा न बोलवे वाचा ... दास म्हणे महिमा न बोलवे वाचा .... याउपर आता काय बोलणार ? (तसेच सद्गुरुंची ...जय देव जय देव जय करुणाकरा , आरति ओवाळु सद्गुरु माहेरा ही आरतीही अप्रतिम आहे , त्याविषयी नंतर कधीतरी ) राम
आरती रामदासा ।भक्तविरक्त -ईशा ॥ उगवला ज्ञानसूर्य ।उजळोनी प्रकाशा ॥ ध्रु० ॥ साक्षात शंकराचा ।अवतार मारुती ॥ कलिमाजीं तेचि जाली ।रामदासांची मूर्ती ॥ आरती० ॥ १ ॥ वीसही दशकांचा । दासबोध ग्रंथ केला ॥ जडजीवां उद्धरीले ।नृप शिवासी तारिलें ॥ आरती० ॥ २ ॥ ब्रह्मचर्य व्रत ज्याचें ।रामरूप सृष्टि पाहे ॥ कल्याण तिहीं लोकीं ।समर्थ सद्गुरु पाहे ॥ आरती० ॥३ ॥
ram (http://www.samarthramdas400.in ह्या साईट वरुन साभार ... इथे समर्थांचे बरेचसे साहित्य दृकश्राव्य स्वरुपात उपलब्ध आहे !) आरत्या संपतात ...मंत्रपुष्पांजली होते ...तिर्थप्रसाद वाटला जातो ... मग उपास आणि महाप्रसादाच्या नावाखाली मस्त शाबुदाण्याची खिचडी बटाट्याची भाजी असा तुडुंब बेत होतो .... दुपारची वेळ ...आता सारे पेंगुळलेत ... काही जण आधीच वामकुक्षी आसनात विराजमान झालेत ... देवघरात आता फक्त राम आहे आणि मी त्याच्या समोर शांत तेवणारी समई ... मंद उदबत्तीचा धुपाचा रेंगाळणारा सुवास (आणि माझ्या समोर लॅपटॉप :P) ...श्रीराम जय राम जय जय राम च्या ट्युटर शांत स्वरात वाजत आहे ... आणि बागेतल्या कोकिळाचा अधुन मधुन येणारा आवाज सोडले तर बाकी पुर्ण शांतता ... कदा वोळखीमाजि दूजें दिसेना | मनीं मानसीं द्वैत कांहीं वसेना | बहूतां दिसा आपुली भेटि जाली | विदेहीपणें सर्व काया निवाली || जय जय रघुवीर समर्थ _______________________________________________________________________________________ (मलाकाही काडी मात्र अक्कल नाही जे काही मोडके तोडके उमगले ते लिहिले .... अधिकार नसता लिहिले | क्षमा केली पाहिजे || )


कळी जपताना....

लेखक: स्मिता श्रीपाद | प्रसिद्ध:
केवळ चार वर्षाचं छोटसं पिल्लु.... आत्ताशी कुठे शाळेच्या फुलपाखरी विश्वात प्रवेश केलेला..... सगळं जग खुप गोड आणि रंगिबेरंगी वाटणारं वय.... आणि अचानक तिच्या आयुष्यात काहितरी वेगळच घडत....काय घडलं ? कसं घडलं ?


विष्णूजी की रसोई...अनाहिता कट्टा वृत्तांत

लेखक: भावना कल्लोळ | प्रसिद्ध:
डिसक्लेमर : मधुमेह किंवा गोडाची एलर्जी असलेल्यांनी या शिकरण टाइप धाग्यापासून लांबच रहावे. कॉल्लिंग अनाहीतास ……… असे करून आमच्या इरोपस्थित मृणालिनी बाईनि त्या भारतवारीला येत आहेत तरी आपण सर्वंजणीनी भेटुन कट्टा करायचा आहे हो अशी दवंडी दिली अनाहिता मध्ये. मग काय… पोरगी माघारपणाला येत आहे (जरी नेरूळ सासर असले तरी) आमच्यासाठी तर माघारपणाला येत आहे म्हंटल्यावर आम्ही साऱ्या मुंबैकारणी स्वागताला हजरच. :dance: तर स्वागत हि शेवटी थोडे राजेशाही वाटायला हवे म्हणून " विष्णुजी कि रसोई, ओवळे नाका, ठाणे ठिक सकाळी ११ वाजता" येथे करण्याचे आयोजिले.


कार्तिकस्वामी व कुमार वयातील स्त्रीद्वेष्टेपणा

लेखक: शुचि | प्रसिद्ध:
कार्तिकस्वामी ची अनेक नावे आहेत - सुब्रह्मण्य, स्कंद, कुमार, गुहा, षडानन वगैरे. त्याची ज्या रुपात जास्त भक्ती होते ते म्हणजे "कुमार" रूप. आदी शंकराचार्यरचित सुब्रह्मण्य भुजंगाष्टकातही खालील श्लोक येतो - इहायाहि वत्सेति हस्तान्प्रसार्या- ह्वयत्यादराच्छङ्करे मातुरङ्कात् | समुत्पत्य तातं श्रयन्तं कुमारं हराश्लिष्टगात्रं भजे बालमूर्तिम् || १८|| जेव्हा शंकरानी बाहू पसरून प्रेमाने हाक मारली तेव्हा घाईघाईत आईच्या मांडीवरून उठून शंकरांकडे धाव घेणार्या व त्यांना अत्यंत प्रेमाने मिठी मारणार्‍या कुमार (रूपातील) कार्तिकेयाचे मी ध्यान करतो.