Welcome to misalpav.com

के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ९

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
३ ऑगस्ट पहाटे ५.०० विल्को वॅन रुजेनला झोपेतून जाग आली ! गेल्या अठ्ठेचाळीस तासांपासून रुजेन के २ वर खुल्या आकाशाखाली वावरत होता. छत्तीस तासांपूर्वी त्याने पाण्याचा शेवटचा घोट घेतला होता. मात्रं अद्यापही तो जीवंत होता ! खाली उतरून जाण्याला दुसरा पर्याय नव्हता ! रुजेनने दगडाच्या कडेकडेने खाली जाणारी वाट पकडली. पहाडाच्या कडेने जाणारा धोकादायक मार्ग आणि आदल्या रात्री त्याला धडकी भरवणारी कपार ( क्रिव्हाईस ) टाळण्याचा त्याचा विचार होता. बेस कँपवर असलेल्या क्रिस किंकलला लाल ठिपक्यासारखा दिसणारा गिर्यारोहक पुन्हा हालचाल करत असल्याचं दृष्टीस पडलं होतं.


सुख म्हणजे नक्की काय?

लेखक: समीरसूर | प्रसिद्ध:
आजकाल हा प्रश्न मला सारखा पडतोय. सुख म्हणजे नक्की काय? प्रत्येकाची सुखाची व्याख्या निराळी असते हे अगदी खरं. पण कधी कधी मनाला होणारा मनमुराद आनंद म्हणजेच सुख का? परवा मी दुपारी जेवायला बसलो. झणझणीत वांग्याची भाजी (खान्देशी इष्टाईल), ज्वारीची भाकरी, साधं वरण, कांदा-टोमॅटोची भाजलेले शेंगदाणे घालून केलेली गार-गार कोशिंबीर...अहाहा. दोन भाकरी कुस्करल्या, त्यात साधे वरण घातले आणि त्यात झणझणीत भाजी घातली. थोडे लाल लाल तेल घेतले. आणि गारेगार कोशिंबीरीसोबत हाणायला सुरुवात केली. माझ्या उदरात नेमक्या किती भाकरी गडप झाल्या हा हिशेब न सांगणेच इष्ट ठरेल. जेवण झाल्यानंतर माझे मन अगदी प्रसन्न झाले.


गोची...

लेखक: माधुरी विनायक | प्रसिद्ध:
संध्याकाळची वेळ... साधारण साडेसहा-पावणेसातचा सुमार. मी माझ्या नेहमीच्या बस स्टॉप वर उभी होते. काही वेळाने बस आली आणि मी बसमध्ये चढले. चक्क पुढचा स्टॉप येण्यापूर्वी बसायला जागा सुद्धा मिळाली. कंडक्टर साहेबांना पास दाखवून नेहमीप्रमाणे बॅगमधून पुस्तक काढलं आणि वाचू लागले. साधारण एखादा स्टॉप मागे पडला असेल आणि शेजारी उभ्या बाईकडे लक्ष गेलं. ती गर्भवती असल्याचं दिसत होतं. अर्थात राखीव जागेवर ती बसू शकली असती, पण तोवर बसमध्ये चांगलीच गर्दी झाली होती. कदाचित धक्के खात पुढे जाण्याऐवजी इथेच थांबावं, असा विचार तिने केला असावा.


भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र”

लेखक: आयुर्हित | प्रसिद्ध:
आदरणीय डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी आज भारतीय जनता पक्षाचे “निवडणूक प्रतिज्ञापत्र” सादर केले आहे, ज्यात जमेल तिथे विदेशी अर्थपुरवठा वापरून पण त्याच्या कुबड्या न बनवता भारतीय अर्थपुरवठा व भारतीय साधनसामुग्री वापरून श्रेष्ठ भारत, सशक्त भारत आणि दृढ भारत बनवण्यासाठी पक्षाने धोरण सुनिश्चित केले आहे.


हर्षा भोगले यांचे IIM-Ahmadabad मधील भाषण

लेखक: साधा मुलगा | प्रसिद्ध:
एकदा you tube वर फिरत असताना प्रसिद्ध क्रिकेट समालोचक हर्षा भोगले यांचे IIM A मधील भाषण ऐकले. खरे तर पहिले मी या भाषणाचा एक तुकडा पाहिला. जो ‘talent Vs attitude’ अशा नावाने होता. तो पाहिल्यावर मला संपूर्ण भाषण बघण्याचा मोह आवरला नाही.हर्षा हे स्वतः या संस्थेचे विद्यार्थी होते. ते पट्टीचे वक्ते असल्याने त्यांनी अतिशय कौशल्याने हे भाषण फुलवले आहे. हे भाषण जुने म्हणजे ३० जुलै २००५ चे आहे. भाषणाचा विषय आहे, “achievers of excellence”.


३. गेले आठशे आले आठशे - हरवले ते गवसले का?

लेखक: शशिकांत ओक | प्रसिद्ध:
भाग 3 किस्सा कानपुरचा. गेले आठशे आले आठशे
‘कानपूर में पंगा नही लेनेका’
पोस्टींगला पोहोचायच्या आधीच मिळालेला संवैधानिक इशारा ऐकून मी हवाईदलाच्या कानपूर स्टेशनात शिरलो. सिव्हीलियनची युनियन बाजी, सटक्यात सुरे काढून भोसका भोसकीचे प्रकार नेहमीचेच. दारूची सोय लावायला मेडिकलची खोटी बिले भरून लाखो रुपयांची लूट करायला इथल्या कामगार नेत्यांची फूस व खासदाराचा वरदहस्त वगैरे मुळे कानपूर करामाती स्टेशन म्हणून अजुनही मानतात.


तीर्थरूप

लेखक: बिपिन६८ | प्रसिद्ध:
"तीर्थरूप" ८ जून 2012 तीर्थरूप या शब्दाचा अर्थ आहे जन्मदाते म्हणजेच "वडील" तीर्थरूप म्हणजे जे तीर्था समान आहेत ते ! हिंदू धर्मात तीर्थ हे सर्वात पवित्र आणि अनेक जन्माचा उद्धार करणारे मानले जाते, त्याच प्रमाणे वडील हे आपल्या मुलांचा त्या जन्माचा उद्धार करतात म्हणून वडिलांना तीर्थरूप हा शब्द ! पण आज काल या शब्दाचा उपयोग जेंव्हा विनोद निर्मिती करिता होतो आणि ,आणि जेंव्हा या शब्दावरून झालेले विनोद ऐकतो तेंव्हा खरेच काळजात चर्र..होते, असे विनोद करणाऱ्या लोकांच्या अकलेची कीव येते.


पहिला दिवस…महाविद्यालयातला!

लेखक: भाते | प्रसिद्ध:
दहावीचा निकाल लागल्यावर चिंता, काळजी आणि ऊत्सुकता होती ती महाविद्यालयाची. मध्यमवर्गीय कुटुंबांतुन आलेला असल्यामुळे तोपर्यंत माझे जग फक्त शाळा आणि घर इतकेच मर्यादित होते. महाविद्यालयात पाऊल टाकेपर्यंत मला त्या बाहेरून गोंडस पण आतुन भयानक असलेल्या जगाची कल्पनाही नव्हती. बरोबर कोणीही मित्र नसल्याने मी घाबरतच पहिल्यांदा महाविद्यालयात पाऊल ठेवले. माझ्या स्वागतासाठी तिकडे एक चौकडी माझी वाट पहात ऊभी होती. तिन मुलं आणि एक मुलगी. एकाने हसत मला माझे नाव विचारले. घाबरतच मी त्यांना माझे नाव सांगितले. दुसरा, इतरांकडे पहात म्हणाला, "मराठी!" मी काहिही न बोलता फक्त मान डोलावुन होकार दिला.


सकुरा अर्थात जपानचा चेरी ब्लॉसम

लेखक: जातवेद | प्रसिद्ध:
जपान मधले एक मुख्य आकर्षण म्हणजे हनामी. हना म्हणजे फूल आणि हनामी म्हणजे शब्दश: फूल पाहणे. साधरणपणे वसंत ॠतु (स्प्रिंग) च्या सुरुवातीला जेव्हा बर्फ पडायचा बंद होतो आणि चेरीची झाडे नव्याने बहरायला सज्ज होतात, या झाडांना असंख्य फुले येतात. हि फुले फक्त १० ते १५ दिवसच राहतात त्यामुळे याला आणखीनच महत्व प्राप्त होते. यांनाच ईकडे सकुरा म्हणतात. जपान मधे मुळातच बागकाम आणि आकर्षक झाडे यांना महत्व दिले जाते. त्यामुळे फार पुर्वीपासुनच हि झाडे विहंगम दिसावीत अशी मुद्दाम लावण्यात आली आहेत.