Welcome to misalpav.com

काँग्रेसचे नक्षलवाद्यांशी संधान?

लेखक: मंदार दिलीप जोशी | प्रसिद्ध:
सत्तापिपासू काँग्रेसने आता देशद्रोहाचा मार्ग अवलंबला आहे की काय अशी शंका घेणारी एक बातमी. काँग्रेसचे नक्षलवाद्यांशी संधान? राहुल गांधी यांना पंतप्रधान बनविण्याची घाई झालेल्या काँग्रेसने लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्यासाठी नक्षलवाद्यांची मदत मागितली असल्याची धक्कादायक माहिती 'लोकसत्ता'च्या हाती आली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस दिग्विजय सिंह हे यासाठी नक्षलवाद्यांच्या संपर्कात होते.


रूमानी

लेखक: अनाम | प्रसिद्ध:
देवांचे देव्हारे नेहमीच गच्च असतात अन तुझा हट्ट दूरवर वसलेल्या सिद्धेश्वराचा. दुर वळणावळणाच्या रस्त्यावर वाहत जातो मीच माझ्या गाण्याबरोबर थोडा उथळ होतो. सिद्धेश्वरही तस तसा उदास  होत जातो.


के-२ : द सॅव्हेज माऊंटन - ७

लेखक: स्पार्टाकस | प्रसिद्ध:
के २ वर यशस्वी चढाई करून उतरणा-या गिर्यारोहकांपुढे काय वाढून ठेवलेलं होतं ? रात्री ८.०० मार्को कन्फर्टोला शिखरावर काही मिनीटंच थांबून ताबडतोब परत फिरला होता. त्याच्या बरोबर कॅस वॅन डी गॅवेल होता. डच मोहीमेतील इतर गिर्यारोहक अगोदरच परतीच्या वाटेला लागलेले होते. लार्स नेसाच्या पाठोपाठ खाली उतरत असलेल्या सेसील स्कॉगला रॉल्फ बेई आपली वाट पाहत थांबला असेल याची कल्पना होती. काही अंतर उतरून आल्यावर तिने त्याला हाका मारण्याचा सपाटा लावला, मात्र एकाही हाकेला ओ येईना !


अदलाबदल

लेखक: शुचि | प्रसिद्ध:
वीणा, आनंद दोघांनीही घाईघाईनी नाश्ता उरकला अन पायात कसेबसे बूट्/सँडल्स चढवून दोघेही आपापल्या वाटांनी कचेरीकडे पळाले. वीणा बसमध्ये चढली तरी डोक्यात विचारांच चक्र अव्याहत चालूच होते. - हं पांघ्रुणांच्या घड्या तर केल्यात पण रचून ठेवायला विसरले.- जाऊ देत संध्याकाळी पाहीन. - बरं आज भाजीही भेंडीची, आनंदच्या नावडीची आहे : ( - प्रयत्न तर केला आहे मसालेदार बनवायचा पण त्याला नेहमीप्रमाणे नाहीच आवडणार. - हे अस्सं आहे - कुठे कुठे मी एकटी पुरी पडणार? - उन्नीस्-बीस होणारच पण आपण जरा कमी पडलो की मन कुरतडत रहातं. मनाला कोण समजावणार?


एकटा जगी मी उरलो

लेखक: निलरंजन | प्रसिद्ध:
ज्या नात्यांच्या भरवश्यावर स्वप्नांचे मी बांधले इमले त्या नात्यांचे बंध अलगदच सुटले धरूनी कराशी जयांना जपले मी उराशी माझ्या प्रेमापेक्षा त्यांनी पैश्यांनाच धरिले उराशी ज्यांची होती आस त्यानींच केले जीवन उदास उबदार माझे घरटे आता का रे झाले भकास आधार ज्यांचा धरूनी उठावे ते दोर आधाराचे उठण्या आधीच विरले आपले विश्व तू एकट्या ने विसरावे नातं तुझे माझे एवढ्यातच तोडले विश्वास ठेवावा तरी कुणावर जगी माझे कुणीच नाही उरले आपलेसे केले ज्यांना तेच माझ्या जीवावर उठले जळते निखारे पदरी टाकून हृदय पेटवून ते गेले काडी टाकून अविश्वासाची अपकार कराया न विसरले संपली आशा उद्याची नयनांचेही बांध फुटले खंज


लोचा ए उल्फत

लेखक: आयुर्हित | प्रसिद्ध:
पहाटे पहाटे दारावरची बेल वाजल्याचा आवाज आला आणि जाग आली. बेडवर उठून हाताचे दर्शन घेतले. जमिनीला वंदन करून पाय ठेवला. कोण आले एवढ्या सकाळी? दरवाजा उघडून पहातो तर दुधवाला नुकताच दुध टाकून गेलेला. दुधाची पिशवी सोबत आजचा पेपर घरात आत घेतला.


<पहिली धार>

लेखक: प्यारे१ | प्रसिद्ध:
सोडा नसला तरी चालेल , पण संध्याकाळी एक चपटी असावी ! एकही चुनाडबी नसली तर चालेल , पण खिशात एक तंबाखूची पुडी असावी ! लॉलीपॉप- तंदूरीची सर कोणालाच नाही , पण चखण्यात एक चकली तरी असावी ! हलकट मित्रांनी बिअर मारायला शिकवली , पण वाईन प्यायला सोबत एक तरुणी असावी ! क्रेट संपवायला गँग आहेच , पण शेवटी मारायला एक चिल्ड असावीच ! पाण्याशिवाय सर्वच अपुर्ण , पण किक बसायला एक ऑन द रॉक असावी'च्च' !!! -पिणार ____________________________________________


राधा

लेखक: चिनार | प्रसिद्ध:
गोकुळ नसले तरी चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! एकही गोपीका नसली तर चालेल , पण आयुष्यात एक राधा असावी ! देवकी - वासुदेवाची सर कोणालाच नाही , पण आयुष्यात एक राधा असावी ! पेंद्या नी सुदामानी मैत्री शिकवली , पण प्रेम शिकवायला एक राधा असावी ! गीता ऐकायला अर्जुन आहेच , पण गीता स्फुरायला एक राधा असावी ! कृष्णाशिवाय सर्वच अपुर्ण , पण कृष्ण पुर्ण व्हायला एक राधा असावी !!!


एक काहीतरी……

लेखक: चिनार | प्रसिद्ध:
मामाचं पत्र हरवलंय की पत्र लिहिणारा मामाचं हरवलाय ? एक काहीतरी नक्कीच हरवलंय ! कोंबड्याचं आरवण थांबलंय की ती सकाळ व्हायचीच थांबलीय ? एक काहीतरी नक्कीच थांबलय ! पाटीवर अभ्यास लिहायचा राहिलाय की आमची पाटी कोरीच राहिलीय ? एक काहीतरी नक्कीच राहिलंय ! मऊ वरण-भात करपलाय की आमची जीभच करपलीय ? एक काहीतरी नक्कीच करपलय ! संवाद कमी झालाय की विसंवाद वाढलाय ? एक काहीतरी नक्कीच झालंय आमचं वय वाढलंय की आमच्यातलं अंतर वाढलंय ? एक काहीतरी नक्कीच वाढलंय शुभं करोति म्हणायचं विसरलोय की शुभ म्हणजे काय तेच विसरलोय ?