के-२ : द सॅव्हेज माऊंटन - १
- Read more about के-२ : द सॅव्हेज माऊंटन - १
- 7 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 9045 views
भारताच्या उत्तरेला हिमालयाच्याच तोडीची पण कमी लांबीची एक पर्वतरांग पसरलेली आहे.
काराकोरम !
काराकोरम पर्वतरांग सुमारे ५०० किमी पसरलेली आहे. पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टीस्तान, भारतातील लडाख आणि चीनच्या झिअॅन्ग्जँग प्रांतात पसरलेल्या या पर्वतश्रेणीत जगातील काही सर्वोच्च शिखरांचा समावेश होतो.
काराकोरमचा सुमारे २८ ते ५०% भाग ग्लेशीयर्सने भरलेला आहे. हिमालय (८-१२%) आणि आल्प्स (२-३%) च्या तुलनेत हे प्रमाण खूपच जास्त आहे. धृवीय प्रदेशांचा अपवाद वगळता जगातील सर्वात मोठी ग्लेशीयर्स इथे पसरलेली आहेत.