१९९६ माऊंट एव्हरेस्ट - ७
- Read more about १९९६ माऊंट एव्हरेस्ट - ७
- 2 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 3206 views
११ मे १९९६
एव्हरेस्टच्या तिबेटच्या बाजूला इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीसांच्या जवळच जपानी मोहीमेचा कँप ६ होता. कोणत्याही परिस्थितीत ११ मे रोजी एव्हरेस्टचा माथा गाठायचाच या निर्णयावर जपानी ठाम होते. १० मे च्या वादळानंतरही त्यांच्या योजनेत कोणताही बदल झालेला नव्हता. पहाटे ४.०० वाजताच जपानी तुकडीतील दोन गिर्यारोहक हिरोशी हनाडा आणि इझुकी शिकेगवा तीन शेर्पांसह अंतिम चढाईसाठी बाहेर पडले होते.
पहाटे ४.४३
रेडीओवर रॉब हॉलचा संदेश आला. त्याचा आवाज जेमतेम ऐकू येत होता.
" माझ्या पायातील संवेदना कमी झाली आहे. मला चालणं अशक्य होतं आहे.
