पुनर्जन्म
- Read more about पुनर्जन्म
- 11 प्रतिक्रिया
- Log in or register to post comments
- 4050 views
आमच्या कोकणातल्या आजीच्या आयुष्यात दोन वैयक्तिक भूकंप आले, पहिला जेंव्हा आमच्या आईचे वडील गेले व दुसरा जेन्व्हा माझा मामा तरुण वयांत गेला तेंव्हा. तुमच्यापैकी कांहीना 'सारांश' या हिंदी चित्रपटातील रोहिणी हट्टंगडी ची भूमिका आठवत असेल; तिचाहि एकुलता एक मुलगा विदेशी असतांना एका अपघातात गेलेला असतो व तिला सारखं वाटत असतं कि तो पुनर्जन्माने परत येईल. आमच्या आजीचं थोडंफार तसंच होतं.
मामाच्या मृत्त्यू नंतर ज्यांचा जन्म त्या घरांत (घराण्यात या अर्थाने) झाला त्यांना, किंव्हा त्या घराच्या माहेरवाशिणिच्या घरी ती त्याला शोधत असे.
