Welcome to misalpav.com

शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा 'आप'चा आदेश...

लेखक: विनोद१८ | प्रसिद्ध:
नमस्कार मिपाकरहो....!! मी आत्ता नुकतीच एक बातमी दै. लोकसत्ता'मध्ये वाचली, कदाचित आपणही ती वाचली असेल. 'आप' ने शीला दीक्षितांवर गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे. येत्या दिवसात त्याचे दिल्लीच्या एकन्दरीत राजकारणावर काय परिणाम होतील ?? यावर विचारमन्थन व्हावे असे वाटते, सदर बातमीचा दुवा खाली देत आहे. http://www.loksatta.com/desh-videsh-news/delhi-government-moves-against-... विनोद१८


शेअर बाजारांतील तेजी-मंदी : खेळ मनोव्यापारांचा

लेखक: प्रसाद भागवत | प्रसिद्ध:
शेअर बाजाराचे पार्‍यासारखे चंचल स्वरुप आणि त्यातील सतत हेलकावे खाणारे समभागांचे भाव, हे आपल्या सगळ्यांसाठीच एक अनाकलनीय विश्व आहे. सर्वसामान्यपणाने बाजार मुलतः मागणी-पुरवठा या तत्वावर आधारित असतो हे खरे असले तरी मग मुळांत मागणी वा पुरवठ्याच्या प्रमाणांत सारखे बदल का होतात हा प्रश्न उरतोच, आणि या प्रश्नाची अनेक उत्तरे असली तरी गुंतवणुकदारांची मानसिकता हे या घडामोडींमागील एक प्रबळ कारण आहे हे निश्चित. बाजाराचे खरे तर स्वतःचे असे कोणतेही स्वरुप नसते वा त्याला त्याची अशी स्वतःची दिशाही नसते.


छायागीत ४ - मुड मुडके ना देख मुड मुडके...

लेखक: Atul Thakur | प्रसिद्ध:
लक्ष्मीमंदिरात नेतो म्हणुन जुगाराच्या क्लबात नर्गीसला आणणारा राजकपुर नेमका नादिराच्या हातात सापडतो. आणि ती थंडपणे त्याच्या अब्रुची लक्तरं वेशीवर टांगु लागते. निरागस नर्गीस या अपरीचित वातावरणात अजुन सावरलेली देखिल नसते की कुणीतरी जबरदस्तीने तिच्याशी हात मिळवतात तर कुणी ओळख करुन घ्यायला पाहतात. "श्री ४२०" मात्र तेथेही नर्गीस कुठल्याशा गावाची राजकुमारी आहे अशी थाप ठोकायला मागेपुढे पाहात नाहीत. नादीरा मात्र आता अशी मागे हटणार नसते.


चिमुटभर

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
हूल हीच चाहूल आजवर तीच ओळखीची आळवावरचा थेंब जसा अस्पर्श उजागर त्याची एकेक शहारा आस तयाला ह्या हृदयीची त्या हृदयी झुरे सावली वाटेवरती खंत तिला रात्रीची रोमांकित अनुबंध पोरका धग अशीच जराशी फुंकर हळवी भेट चेतवे निखाराच वैशाखी संधीवरची दूर क्षितीजे स्मरणे आभासाची सुंभ जळाले पीळ खळे ना राख चिमुटभर बाकी ………………अज्ञात


कविता, मीटर आणि मी

लेखक: विवेकपटाईत | प्रसिद्ध:
माझ्या एका मित्राचे म्हणणे आहे, कवी आणि शायर यांच्या घरी कोणी पाहुणे आल्या वर त्यांना अत्यंत आनंद होतो. हा आनंद पाहुणे आल्याचा की कविता ऐकायला एक बऱ्या पैकी बकरा सापडला याचा हे अद्यापही कळले नाही. काही दिवसांपूर्वी माझा एक मित्र भेटावयास घरी आला होता. मित्र आला मला ही ‘आनंद’ झाला. चहा-पाण्या नंतर हळूच कवितेचा विषय काढला,आजकाल आमी बी कविता करतो , असे म्हणत कवितेची चोपडी त्याच्या हातात दिली. (आधीच माहीत असते तर इथे टपकलोच नसतो, असा काहीसा भाव त्याचा चेहऱ्यावर उमटला). पण प्रत्यक्षात, वा-वा, छान, लेका तू पण कवी झालास तर?


एक गीत

लेखक: उदय सप्रे | प्रसिद्ध:
सप्रेम नमस्कार रसिक आणि कलाप्रेमी मि.पा.कर, आज बर्‍याच दिवसांनी काही लिहित आहे.मूळ गाणे हिंदी आहे , त्यावरून - अर्थ तोच ठेवून लिहिण्याचा प्रयत्न केलाय.पाहुया कुणी ओळखतय का मूळ गाणे. ना कुणाचा मी ना कोणीच झाले माझे इथे, परके तर जाऊद्या, सख्ख्यांचा आधार नाही जिथे ! एरवी लोक जिथे रडकेही जिणे जगती की, अन् माझ्या हसण्याचा ही लागला निभाव कुठे? हाय मी काय असे प्रेमाखेरीज मागितले? तेव्हढेही का न समाजास झाले मान्य इथे? बघ किती तारका चमचमती तुझ्या ठायी नभा, ना कधी न्हायले हे भाग्य चांदण्यात इथे! पुढील कडवे मात्र नवीन आहे बघ तुझा हात फिरे, आंधळ्यास ये दृष्टी, ये फिरुन परतुनी, डोळ


मुखपृष्ठ

लेखक: अभ्या.. | प्रसिद्ध:
नमस्कार. आपण सर्वांनी मिपाकर जयंत कुलकर्णी म्हणजेच आपले लाडके जकुकाका यांच्या रसाळ अन अभ्यासपूर्ण अशा युध्दकथामालांचा आनंद घेतला असणार. मीहि त्यांच्या लेखनाचा मोठा फॅन आहे. या युध्दकथा त्यांच्या आगामी "युध्दाचे वादळ" या मोठ्या ग्रंथउपक्रमाचा भाग आहे हे त्यांनी नमूद केलेलेच आहे. तसेच या ग्रंथासाठी मुखपृष्ठ कसे असावे किंवा चोखंदळ मिपाकरांकडून काही कल्पना आहेत का यासाठी त्यांनी धागा पण काढलेला होता. त्यालाच प्रतिसाद म्हणून याचे डिझाइन्स मी स्वतः करावे असे वाटले.


सुंबरान - आठवणीतल्या प्रेमकथा - भाग २

लेखक: मराठी कथालेखक | प्रसिद्ध:
भाग १ - http://misalpav.com/node/26930 २) रघूवीर आणि मी सहकारी आणि मित्र होतो. त्याची कुणाशीही सहज ओळख, मैत्री होत असे. अनेक वरिष्ठ अधिका-यांशी त्याचे आपुलकीचे बंध निर्माण होत. त्यावेळी कार्यालयात स्त्री कर्मचारी फारशा नव्हत्त्या. पण बाहेर रघुवीर च्या अनेक मित्र-मैत्रिणी होत्या. त्याच्या कंपुतल्या (मी या कंपूत नव्हतो) एका मित्राने कॉम्प्युटर चा कसलासा क्लास लावला होता. रघूवीर कधी त्याला क्लासजवळ भेटायला जाई. त्यातून क्लास मध्ये शिकवणा-या प्रणिता मॅडमशी त्याचा परिचय झाला. प्रणिता हळूहळू त्याच्या कंपूत सामील झाली. ती त्याच्यापेक्षा ३-४ वर्षांनी मोठी होती.


स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास-भाग ३: राष्ट्रपतींचे अभिभाषण

लेखक: क्लिंटन | प्रसिद्ध:
स्वातंत्रोत्तर भारताचा राजकीय इतिहास-भाग ३: राष्ट्रपतींचे अभिभाषण राज्यघटनेतील तरतुदींप्रमाणे लोकसभा निवडणुक झाल्यानंतर झालेले लोकसभेच्या पहिल्या अधिवेशनाच्या आणि प्रत्येक कॅलेंडर वर्षातील पहिल्या अधिवेशनाच्या सुरवातीला राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीपुढे अभिभाषण करतात.या अभिभाषणाचा मसुदा केंद्रीय मंत्रीमंडळाने बनविलेला असतो आणि राष्ट्रपती ते भाषण केवळ वाचून दाखवितात.अभिभाषणाबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानणारा 'धन्यवाद प्रस्ताव' संसदेकडून पास केला जातो.मुळात अभिभाषणाचा मसुदा केंड्रीय मंत्रीमंडळाने बनविलेला असल्यामुळे त्यात सरकारच्या धोरणांचा अंत