Welcome to misalpav.com

राजस्थानी घीवर विथ मँगो रबडि

लेखक: दिपक.कुवेत | प्रसिद्ध:
णमस्कार लोक्स, सध्या आपल्या 'अन्न हे पूर्णब्रम्ह' ह्या दालनात चालणार्‍या राजस्थानी पाकॄ विषेश मधे हा माझा खारीचा वाटा. घीवर हा एक पारंपारीक राजस्थानी गोड पदार्थ आहे जो खास करुन लग्नात / सणासुदिला करतात. मी स्वःत अजुन घीवर प्रत्यक्षात कधी खाल्ले नव्हते पण जालावर रेसीपी पाहिल्यावर खायची तीव्र ईच्छा झाली त्यामुळे थोडेच का होईना पण करुन पाहिले. तसे हे घीवर नुसते खायलाहि छान क्रिस्पी लागतात पण पारंपारीक पद्धतीत त्यावर प्लेन रबडि + ड्राय फ्रुट्स घालुन सर्व करतात.