Welcome to misalpav.com

पनीर आणि मॅगीची (न्युडल्सची) भजी

लेखक: नेहरिन | प्रसिद्ध:
साहित्य :- maggy चे छोटे (५ रु. वाले) पाकिट , १/२ वाटी बेसन , १/२ वाटी किसलेले पनीर , १ हिरवी मिरची , चवीपुरते मीठ आणि तळण्यासाठी तेल . https://lh5.googleusercontent.com/-3P1Ktn41AP4/UXLZWdxJqxI/AAAAAAAABBY/mD_P5htnpyA/s640/20042013%2528007%2529.jpg कृती :- प्रथम नेहमी प्रमाणे maggy शिजवून गार करून घ्यावी .शिजताना मॅगिचे पाकीटातील मसालासुद्धा घालावा. एका बाउल मध्ये बेसन, पनीर , मीठ , एकत्र करावे त्यात मिरची बारिक चिरून घालावी.


माझे ऑफिस

लेखक: Bhagwanta Wayal | प्रसिद्ध:
माझे ऑफिस ऑफिस , कसे दिसते भकास। वाजले दहा तरी...., नाही कुणाचा तपास॥१॥ माझे ऑफिस ऑफिस , आस सेवेची धरावी। ग्राहक देव भव....., सेवा तयाची करावी॥२॥ माझे ऑफिस ऑफिस , कसे वाटेना आपुले। जणु टाटा अंबानीने..., त्याला विकत घेतले॥३॥ माझे ऑफिस ऑफिस , पहा कँप्युटर आलं। नविन तंत्र ज्ञान...., आम्हा शिकाव लागेल॥४॥ माझे ऑफिस ऑफिस , नका घेऊ हो टेन्शन। काम करुन आपले..., रहा नेहमी प्रस न्न॥५॥ माझे ऑफिस ऑफिस , करु उत्तम नोकरी। हेची जाणा श्रीसेवा...., मिळे पोटाला भाक री॥६॥ माझे ऑफिस ऑफिस , करू सारे मेहनत। नका धरू हो अपेक्षा.., फळ देईल समर्थ॥७॥


पनीर मिक्सव्हेज रोल

लेखक: नेहरिन | प्रसिद्ध:
साहित्य :- २०० ग्रॅम पनीर ,१वाटि बारिक चिरलेला फ्लॉवर, १ वाटी बारीक चिरलेला श्रावण घेवडा , १ मध्यम आकाराचे गाजर बारीक चिरून, ८-१० पुदिन्याची पाने , १ वाटि बारिक चिरलेली कोथिंबीर , १वाटि स्वीट कॉर्नचे दाणे , २ टेबलस्पून Cornflower , ८-१० पालकाची पाने , ११/२ टीस्पून बारीक वाटलेले आले ,२ टीस्पून जिरे पावडर, ११/२ टीस्पून मिरे पावडर , ३/४ हिरव्या मिरच्या वाटून , १ लिंबाचा रस .११/२ वाटि ब्रेड crumb , मीठ ,तळण्यासाठी तेल . कृति :- प्रथम गाजर , श्रावण घेवडा , फ्लॉवर, कोर्न थोडेसे वाफवून घ्यावे ( पूर्ण शिजवायचे नाही ).