Welcome to misalpav.com

हे विहगांनो

लेखक: अज्ञातकुल | प्रसिद्ध:
हे विहगांनो चला घेउनी मेघांपलिकडल्या द्वारी खेळ मनस्वी शतरंगांचे फेर धराया गाभारी उणे पुराणे जग वाटे हे कल्प नवा रुजवू देही फुलवू या स्वप्नांचा चोळा दूर करू विवरे सारी रंग बघू प्रमदेचे आणि तृप्त फिरू रत माघारी पुन्हा एकदा तोच शहारा उमलवुनी मन दरबारी ........................अज्ञात


फिमेल बाइटस!

लेखक: स्पंदना | प्रसिद्ध:
"फिमेल बाइटस!" पक्षी विक्रेता सांगत होता. "यु कॅन टेम अ मेल बट नॉट अ फिमेल" त्याने माहिती पुरवली. माझ्या चेहर्‍यावर अनेक भाव, थोडा उपहास, थोड आश्चर्य, थोडा राग... मग तो माझ्या नवर्‍याकडे वळला "माय वाइफ अल्सो बाइटस" हसु, विनोद गिर्‍हाईकाशी थोडी जवळीक "हाउ अबाउट यु?" माझा नवरा मजेशीर हसला मी ही दात काढले मी चावत नाही हे दाखवायला मी चावणार नाही हे पटवायला मी चावरी नाही हे ठसवायला. रात्री अंथरुण काटेरी झालं पुन्हा पुन्हा तेच वाक्य..."फिमेल बाईटस" व्हाय? व्हाय डज शी बाइट? तिथे न विचारु शकलेला प्रश्न आता मनात वादळत होता. काना कोपर्‍यातुन घोंगावत होता. फिमेल बाईटस बाय नेचर नॅचरली शी बाइटस का?


गाकर (हारोळ्या)

लेखक: सचिन कुलकर्णी | प्रसिद्ध:
गाकर हा माझा अत्यंत आवडता पदार्थ. आम्ही देशावरील मंडळी याला हारोळ्या म्हणतो. जाडसर कणिक थोडे मोहन, थोडे जास्त मीठ आणि ओवा घालून भिजवायची. दहा मिनिटे कणिक मुरवायची आणि लाटून साधारण पुरीपेक्षा थोड्या मोठ्या पण चार मिलीमीटर जाडीचा गाकर लाटायचा. एकाबाजूने तव्यावर शेकायचा आणि दुसर्या बाजूने अर्धवट तव्यावरच शेकायचा. नंतर अग्निमध्ये (ग्यासच्या चुलीवर. खर्या चुली तर आता गावात पण नसतील..)मस्त खरपूस हि हारोळी भाजून घ्यायची. वरून भरपूर साजूक तूप टाकायचे आणि तोंड शेकत शेकत खायची. Alternatively तुम्ही हि बटर किंवा घरातल्या ताज्या लोण्याबरोबर पण खाऊ शकता.


आडदांड पाऊस

लेखक: गंगाधर मुटे | प्रसिद्ध:
आडदांड पाऊस

अडदांड बेत ओला शिजवून पावसाने
केला शिवार खच्ची भिजवून पावसाने

गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी
केल्यात पार चिंध्या खिजवून पावसाने

आले मनात जेव्हा तेव्हाच निग्रहाने
केले सपाट डोंगर झिजवून पावसाने

खाण्या-पिण्यात झाला पाऊसही अधाशी
हंगाम फस्त केला निजवून पावसाने

नाही दिले कुणाला थोडे 'अभय' परंतू
खरडून दैव नेले थिजवून पावसाने


आयगरची उत्तरभिंत ... टोनी कुर्झ आणि ऊली स्टेक

लेखक: भडकमकर मास्तर | प्रसिद्ध:
आय्गरची उत्तरभिंत इन्टरलाकेनच्या लेक थुनमधून दिसणारी बर्नीज आल्प्समधली ही डोंगररांग. डावीकडे आय्गर, मध्ये मॉन्ख आणि उजवीकडे युन्ग्फ़्राउ. मॉन्ख आणि युन्ग्फ़्राउला जोडणार्याग खिंडीपर्यंत रेल्वे नेलेली आहे.