Welcome to misalpav.com

न ठहरे किसी मंजिल पर शब होने तक

लेखक: निनाव | प्रसिद्ध:
उर्दू /हिंदी लिहिल्या बद्दल क्षमस्व. गझल हा विषय अजून शिकतो आहे, तेंव्हा चूक असल्या वर माफी असावी न ठहरे किसी मंजिल पर शब होने तक कोई क्या लगाये इल्जाम हम पर सहर होने तक क्यों जीए और कितना बेमक्सद है अब रतीब मालाल ये है कि हुए रुखसत जफर होने तक खंजर भी रोया होगा दिल से गुजरते वक़्त खैर, दोस्त क्या वो जो ना लगा हो सीने तक क्या सोच रहे हो, सोए रहो अब बेनाम न लौटेगी सांस सफर के खतम होने तक


काय आहे आमच्याकडे ?

लेखक: चाणक्य | प्रसिद्ध:
रंग नाही रूप नाही, काय आहे आमच्याकडे सौंदर्याला तुझ्या द्यायला, न्याय आहे आमच्याकडे ओळखीचे असेल तुला ते, हुरहुरणे पावसातले सांगूच का तुला त्याचाही, उपाय आहे आमच्याकडे ना सुगंध ना वारा, ना पाऊस ना गारा शहारण्या तुला या सर्वांना, पर्याय आहे आमच्याकडे मस्तीत तुझिया आम्ही, बेदुंध होऊ ऎसे उधळून टाकू सारे, जे काय आहे आमच्याकडे लिहशील तूही काही, कविता पावसा-धुक्यावर घेशील जेव्हा भरभरून, जे काय आहे आमच्याकडे कुठवर ऎकशील वेडे, गोष्टी तू ज्या अनुभवायच्या ये इष्क कर जरासा समजेल, काय आहे आमच्याकडे


माझी पहिली कविता

लेखक: रसिका तिलेकर | प्रसिद्ध:
माझ्या ओठांच्या कळीवर फुलंलेल हसु म्हणजे तु... माझ्या बंद पापण्या मधे तु.... मी डोळे बंद न करता पाहिलेले स्वप्न म्हणजे तु... माझ्या श्वासात भिनलेला गंध म्हणजे तु... माझी प्रेरणा तु.... माझा आत्मा तु... मी म्हणजे फक्त तु अणि तुच...


लोहगडाची जत्रा

लेखक: वेल्लाभट | प्रसिद्ध:
लो. ह. गड - लोकांमध्य॑ हरवलेला गड. परवा लोहगडाच्या जत्रेला गेलो होतो. दुस-यांदा. पहिल्यांदा गेलो होतो ते मागच्या वर्षी. पावसाळ्याच्या नंतर. पण ती जत्रा नव्हती. तेंव्हा त्याचं ते हिरव्या गार रंगात नटलेलं रूप बघून, चिलखती, दणकट असं रूप बघून भारावून गेलो होतो. खूपच रंजक झाली होती ती भेट. दुस-या भेटीचा अनुभव मात्र वेगळा होता. आम्ही पोहोचलो तेंव्हा प्रथमदर्शनी दिसली ती केवळ गर्दी. एक क्षण वाटलं की आपण बार मधे वगैरे आलो आहोत की काय!, कारण दारूच्या बाटल्या हातात घेऊन टोळकी वावरत होती.


मेंदू

लेखक: drsunilahirrao | प्रसिद्ध:
विचार असे ...मग़ तसे आणि कसेही.. इथे -तिथे ,घऱात , रस्त्यात , ऑफिसात भुणभूण भुणभूण ; मेंदू नुसता ठसठसतो ! कायच्या काय अंतर्बाह्य घुसळण. प्रवास कुठुन कुठे .. कुठेच्या कुठे. कसलेकसले मेंदूइतके क्लिष्ट संदर्भ: धुसर, गडद ,काळे, निळे ,हिऱवे ,भगवे; मिसाईलसारखे धावून येतात अंगावर ! दीर्घ युद्धातली वाताहत झाल्यावर अखेर तू भेटतेस : विचार तिथेच अडतात, गुंततात , विसाव्याला थांबतात ...! मी शिणलेला मेंदु टेबलवऱ काढुन ठेवतो ! - डॉ. सुनील अहिरराव http://aaskmed2.blogspot.in/2013/07/blog-post_8.html


बाळूचे स्वप्न - (बाल कविता)

लेखक: विदेश | प्रसिद्ध:
सशाने धरले सिँहाचे कान गरगर फिरवून मोडली मान । शेळीने घेतला लांडग्याचा चावा लांडगा ओरडला-धावा धावा । मुंगीची ऐकून डरकाळी कानात हत्ती घाबरून पळाला रानात । कासवाने लावली हरणाशी शर्यत हरीण दमले धापा टाकत । उंदराने बोक्याच्या पकडून मिशा काढायला लावल्या दहा उठाबशा । बाळूने मोजले दोन सात चार स्वप्नात बाळू मोजून बेजार ! '