चिकू,संत्र,मोसंब,द्राक्ष या फळांपेक्षा हटके दिसणारं चवीला आंबट गोड पण मधूनच खाजर असं फळ; अननस! मला कायम या फळाविषयी वेगळंच आकर्षण वाटतं. मुळात शेतामधला त्याचा look खूप attractive असतो. अख्ख्या झुडपाच्या बरोबर मध्ये अननस उगवतो. बऱ्याच जणांना त्याच्या खाजऱ्या चवीमुळे तो आवडत नाही. लहानपणी अननस पाहून नाक मुरडलं तर तो खाण्याचा एक फायदा हमखास कानावर पडे. तो म्हणजे असा की अननस खाल्याने पोटात केस वगैरे गेला असेल तर तो विरघळून जातो.
दक्षिण अमेरिकेमध्ये जन्मलेलं हे फळ कित्तीतरी juices, mocktails मध्ये सर्रास वापरलं जातं. आपण सुद्धा अननसाचा रायता, हलवा किंवा cake, jam, मुरांबे असे विविध पदार्थ करतो.